Wednesday, May 3, 2017

इव्हिएम गैरव्यवहारावर उपाय: आधार संलग्न व्होटिंग मशीन

     राज्यातला प्राथमिक शिक्षक आता स्वत: तंत्रज्ञानसमृद्ध होत आहे आणि त्याचा उपयोग आपल्या शाळेतल्या मुलांसाठी अध्ययन-अध्यापनासाठी करत आहे. साहजिकच मुलेदेखील नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेत असून त्याचा चांगला परिणाम राज्यात दिसून येत आहे. शाळा डिजिटल होत आहेत. मुलांना एखाद्या पाठाचे ज्ञान व्हावे,यासाठी शिक्षक मंडळी त्यावर आधारित अॅपची निर्मिती करीत आहेत. राज्यातल्या हजारो शिक्षकांनी विविध विषयांवर अॅप बनवले आहेत आणि त्याचा वापर अध्यापनात करत आहेत. युट्यूब कार्यक्रम बनवत आहेत. त्यामुळे अलिकडच्या काही वर्षात राज्यातील प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र बदल होत आहे. या शिक्षकांच्या प्रयत्नामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात पोहचले आहे. आता एका शिक्षकाने बायोमेट्रिक व्होटिंग मशिनचीच निर्मिती करून आणखी चार पावले मजल मारली आहे. सद्या इव्हिएम गैरव्यवहाराबाबत होत असलेल्या चर्चेला या निर्मितीमुळे पूर्णविराम मिळणार आहे. ही किमया सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या प्राथमिक शिक्षकाने साधली आहे.
     सध्या अख्ख्या देशभरात इव्हिएमच्या गैरवापरासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे, अशा काळात या नव्या व्होटिंग मशीनची निर्मिती नक्कीच मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे.एस. सहारिया यांच्यापुढे या मशीनचे प्रात्यक्षिक झाले आहे. त्यांना ही कल्पना जाम आवडली असून त्यांनी आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक स्तरावर या मशीनच्या माध्यमातून बायोमेट्रिक व्होटिंग करण्याचे मान्य केले आहे. या बायोमेट्रिक मशीनमुळे आधारशी लिंक करुन मतदान झाल्यास या प्रक्रियेत अधिक सुस्पष्टता येण्यास मदत होणार आहे.
     सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांचा परिचय शिक्षण विभागात नवनविन उपक्रम राबविणारे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून सर्वांना आहे. यंदाच्या वर्षी सोलापूरमध्ये झालेल्या निवडणूका झाल्या. यावेळेला त्यांना निवड्णूक ड्युटी सांभाळताना अनेक अडचणी आल्या. यातूनच त्यांना बायोमॅट्रिक्स आधार संलग्न व्होटींग मशीनची कल्पना सुचली आणि चक्क चार महिन्यात त्यांनी ती मूर्त स्वरुपातही आणली.
रणजितसिंह डिसले म्हणाले, शासनाकडे आधीपासूनच असलेल्या माहितीचा उपयोग होत असल्याने सुरुवात करण्यासाठी फार तयारी लागणार नाही. नविन प्रणालीने हे शक्य होणार आहे. आजमितीला भारताकडे आधार क्रमांकाची माहिती आहे. ही माहिती आधीपासूनच आपल्या येथील बायोमेट्रीक प्रणालीशी जोडलेली आहे. त्यामुळे उपलब्ध असणार्या माहितीशी आपण नियोजनपूर्वक जर केवळ माणसांना जोडत गेलो तर व्होटींग होईल अशी कल्पना डोक्यात आली. त्यानुसार त्याचे एक प्रेझेंटेशन तयार केले. ते तयार होताच निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे.एस.सहारिया यांना त्याची माहिती दिली.
बायोमेट्रिक मशीनचा उपयोग
प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी यादी छापण्याऐवजी ती यादी डिजिटल स्वरूपात सहज अपडेट करता येईल. या संकल्पेनुसार डिजिटल मतदार यादी असलेला टॅब थंब स्कॅनरला जोडला जाईल. मतदार त्याचा अनुक्रमांक किंवा आधार क्रमांक सांगेल त्यानंतर ओळख पटविण्यासाठी मतदाराचा अंगठा टॅबला जोडलेल्या थंब स्कॅनर मशीनने स्कॅन केला जाईल. ओळख पटाविण्याच्या या आधुनिक पध्दतीमुळे आयोगाला ओळखपत्रे छापण्याची गरज राहणार नाही. आपला अंगठा हीच आपली ओळख असेल. यामुळे मतदान कक्ष खर्या अर्थाने पेपरलेस होईल.
-रणजितसिंह डिसले, शिक्षक, कदम वस्ती, परितेवाडी

1.   बायोमॅट्रीक्स असल्याने दुबार मतदान व बोगस मतदान टळेल. 2. मनुष्यबळाचा जवळपास निम्मा खर्च वाचेल.3.डिजिटल स्वरुपातच हा डेटा उपलब्ध असल्याने अन्य गोष्टीवरचा खर्चही वाचेल. 4. वेळेची बचत होईल.5.

No comments:

Post a Comment