एक वृद्ध महिला आपल्या विधवा सुनेसह मदतीसाठी दरबारात पोहचली. तिने बिरबलला विनंती केली," माझा मुलगा वीस वर्षे शाही सेनेत नोकरीला होता. युद्धात त्याला वीरमरण आले. त्याच्या मृत्यूनंतर आम्ही निराश्रीत झालो आहोत. आम्हाला काही मदत मिळाली तर बरे होईल."
"आई, तुम्ही निश्चिंत रहा," असा धीर देत बिरबल पुढे म्हणाला," शहंनशहा फार द्याळू आहेत. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. फक्त मी सांगतो तसे करा आणि उद्या सकाळी दरबारात वेळेवर या."
दुसर्यादिवशी सकाळी वृद्ध महिला दरबारात पोहचली. तिने बादशहापुढे आपले गार्हाणे मांडले आणि आपल्या मुलाची तलवार बादशहाला दाखवत म्हणाली," आलमपनाह, याच तलवारीने माझ्या मुलाने आपल्यासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. त्याने युद्धात कधीच पाथ दाखवली नाही. हुजूर, या तलवारीला आपल्या शस्त्रागारात स्थान द्यावे, एवढी विनंती आहे."
"द्या पाहू इकडे, ती तलवार!" बादशहा अकबर म्हणाला. महिलेने ती तलवार बादशहाकडे सोपवली. बादशहाने तलवार न्याहळली आणि विचार करू लागला,' ही गंजलेली तलवार माझ्या काय कामाची?' बादशहा तलवार सैनिकाकडे सोपवत म्हणाला," ही तलवार त्यांना परत करा आणि सोबत सोन्याच्या पाच मोहराही द्या."
बादशहाचे बोलणे ऐकून बिरबलला धक्काच बसला. 'फक्त पाच मोहरा!' आश्चर्याने त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मग तो बादशहाला म्हणाला," आलमपनाह, मी ही तलवार पाहू शकतो का?" बिरबलाने ती तलवार हातात घेऊन खालवर करून न्याहळली. आणि पुन्हा ती तलवार सैनिकाकडे सोपवून काही एक न बोलता निमूटपणे उभा राहिला.
बिरबल गप्प राहिलेला पाहून बादशहाने त्याला विचारले," बिरबल, तू असा गप्प का, तुला काही सांगायचं नाही का?"
बिरबल लगेच म्हणाला," काही नाही आलमपनाह! पण मला ही तलवार सोन्याची होईल, असं खात्रीने वाटलं होतं."
"सोन्याची!" अकबर चकीत हो ऊन म्हणाला.
बादशहा बिरबरलला काय म्हणायचे आहे, ते समजला. त्याने लगेच वृद्ध महिलेला त्या तलवारीच्या वजनाइतके सोने देण्याची आज्ञा केली. दोन्ही गरीब महिला अकबर आणि बिरबलला दुवा देत तेथून बाहेर पडल्या.
"आई, तुम्ही निश्चिंत रहा," असा धीर देत बिरबल पुढे म्हणाला," शहंनशहा फार द्याळू आहेत. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. फक्त मी सांगतो तसे करा आणि उद्या सकाळी दरबारात वेळेवर या."
दुसर्यादिवशी सकाळी वृद्ध महिला दरबारात पोहचली. तिने बादशहापुढे आपले गार्हाणे मांडले आणि आपल्या मुलाची तलवार बादशहाला दाखवत म्हणाली," आलमपनाह, याच तलवारीने माझ्या मुलाने आपल्यासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. त्याने युद्धात कधीच पाथ दाखवली नाही. हुजूर, या तलवारीला आपल्या शस्त्रागारात स्थान द्यावे, एवढी विनंती आहे."
"द्या पाहू इकडे, ती तलवार!" बादशहा अकबर म्हणाला. महिलेने ती तलवार बादशहाकडे सोपवली. बादशहाने तलवार न्याहळली आणि विचार करू लागला,' ही गंजलेली तलवार माझ्या काय कामाची?' बादशहा तलवार सैनिकाकडे सोपवत म्हणाला," ही तलवार त्यांना परत करा आणि सोबत सोन्याच्या पाच मोहराही द्या."
बादशहाचे बोलणे ऐकून बिरबलला धक्काच बसला. 'फक्त पाच मोहरा!' आश्चर्याने त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मग तो बादशहाला म्हणाला," आलमपनाह, मी ही तलवार पाहू शकतो का?" बिरबलाने ती तलवार हातात घेऊन खालवर करून न्याहळली. आणि पुन्हा ती तलवार सैनिकाकडे सोपवून काही एक न बोलता निमूटपणे उभा राहिला.
बिरबल गप्प राहिलेला पाहून बादशहाने त्याला विचारले," बिरबल, तू असा गप्प का, तुला काही सांगायचं नाही का?"
बिरबल लगेच म्हणाला," काही नाही आलमपनाह! पण मला ही तलवार सोन्याची होईल, असं खात्रीने वाटलं होतं."
"सोन्याची!" अकबर चकीत हो ऊन म्हणाला.
" हो, जहांपनाह." बिरबल ठामपणे म्हणाला.
बिरबल म्हणाला," जहांपनाह, एक छोटासा परिस नावाचा दगड लोखंडाचंही सोनंकरतो. मी मात्र या विवंचनेत आहे, ही लोखंडी तलवार आपल्या पवित्र हातात आल्यावरसुद्धा साधारणच कशी राहिली?" बादशहा बिरबरलला काय म्हणायचे आहे, ते समजला. त्याने लगेच वृद्ध महिलेला त्या तलवारीच्या वजनाइतके सोने देण्याची आज्ञा केली. दोन्ही गरीब महिला अकबर आणि बिरबलला दुवा देत तेथून बाहेर पडल्या.
No comments:
Post a Comment