एका घनदाट जंगलात बसू नावाचे एक गाढव राहत होते. ते मोठे हुशार, धाडशी आणि समजूतदार होते. त्याच्या या गुणांमुळे तो जंगलातल्या सर्व प्राणी-पक्ष्यांचा आवडता होता. एक दिवस बसू गाढव गवत खाण्यात मग्न होते. तेवढ्यात तो तेथून निघालेल्या धोब्याच्या दृष्टीस पडला. गाढवाला पाहून त्याच्या मनात लड्डू फुटले. "अरे व्वा! काय सुंदर, तगडे गाढव आहे. हा चाळीस गाढवाचे काम एकटा करू शकेल. याला पकडून आपण शहरात घेऊन जाऊ. चांगली किंमत येईल."
मग तो बसूजवळ गेला. त्याला दमात घेत म्हणाला," ये गाढवा, चल माझ्याबरोबर. मी तुला शहरी गाढव बनवतो."
"अरे चल हट, मोठा आला शहरी गाढव बनवणारा. " बसू त्याच्यावर डोळे वटारत म्हणाला.
" बर्या बोलानं चल, नाहीतर कान पकडून ओढत नेईन. समजलास!"
"अरे जा रे, तू कोण एवढा लागून गेलास...?" गाढव म्हणाले.
गाढव आपले ऐकत नाही म्हटल्यावर धोबी संतापला. "थांब आता, मी कोण आहे ते दाखवतो." असे म्हणत तो बसू गाढवाजवळ गेला. त्याचा कान पकडणार तोच बसूने गर्र्कन गिरकी घेतली आणि एक झाडून लाथ मारली. धोबी तिकडे लांब झुडपात जाऊन पडला. छातीवर चांगलाच मार बसल्याने आणि झुडपात अडकल्याने त्याला उठता येईना. " अरे देवा, काय जोराची लाथ मारली रे. बरखडया मोडल्या की माझ्या ..." असा विव्हळत- कण्हत धोबी झाडा-झुडपांमध्येच गडप झाला. पण तो कमालीचा जिद्दी होता. तो पळून जाण्यापेक्षा जंगलातच लपून बसला आणि बसू गाढवावर लक्ष ठेवू राहिला. त्याला पकडून शहरात नेण्याचा त्याने चंगच बांधला होता.
बसू मात्र अगदी मजेत गवतावर ताव मारत होता. पोट भरल्यावर तो नदीला गेला. पोटभर पाणी प्याला. आता त्याला सुस्ती येऊ लागली. तिथेच एका डेरेदार वडाच्या गार झाडाखाली लवंडला. आणि लगेचच त्याला गाढ झोप लागली.
गाढ झोपलेल्या गाढवाला पाहून धोब्याने संधीचा फायदा उठवायचे ठरवले. तो हळूच त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या गळ्यात जाम दोरी बांधली. "अरे हे काय, माझ्या गळ्याला फास कशाचा?" असे म्हणत बसू गाढव उठले. पाहतो तर समोर धोबी आणि गळ्यात दोरी बांधलेली. "या धूर्त माणसाने मला पकडले तर.." तो मनातल्या मनात म्हणाला.
"हा.. हा" धोबी मोठ्याने हसत म्हणाला," आली का नाही अक्कल ठिकाण्यावर? मला लाथाडतोस काय? आता मुकाट्याने माझ्याबरोबर चल." असे म्हणत धोबी त्याला ओढत शहराकडे घेऊन चालू लागला. बिच्चारा बसू, करणार काय? मुकाट्याने त्याच्यामागे चालू लागला. बसू गाढवाच्या लक्षात आले, की आता काही तरी आयडिया केल्याशिवाय आपली सुटका नाही. तो हळूच डोळे मिचकावत म्हणाला," धोबीदादा, माझी चूकच झाली. मी तुला लाथाडायला नको होतं. कृपया, मला माफ कर. मी तुला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाईन."
" आता कसा वठणीवर आलास? मला माहित होतं तू ताळ्यावर येणार ते." असे म्हणून तो गाढवाच्या पाठीवर बसला. बसूला हेच पाहिजे होतं. धोबी पाठीवर बसताच त्याने धूम ठोकली. त्याचा वेग पाहून धोब्याला घाम फुटला. आता आपली काही धडगत नाही, हे धोब्याने ओळखले. आता तो बसूची विणवणी करू लागला. " माझ्या मित्रा, माझी चूक झाली. पुन्हा कधी असा वागणार नाही. मला सोड."
आता गाढव मोठमोठ्याने हसू लागले. " आता स्वतः च्या जीवावर बेतल्यावर माफी मागतोस काय? थांब आता, तुला असली शिक्षा देतो की तू ती आयुष्यभर विसरणार नाही." असे म्हणून ते आणखी वेगाने धावू लागले. " मित्रा, तुझ्या पाया पडतो.पण मला सोड. पुन्हा कधी कुठल्या गाढवाच्या वाटेला जाणार नाही. मी सगळी गाढवं सोडून देईन. पण मला सोड.'' धोबी त्याच्यापुढे गडगडू लागला. रडू लागला.
पण बसू ऐकतोय कुठे! त्याने आणखी वेग वाढवला. सुसाट वार्यासारखा धावत सुटला. तो दाट जंगलात शिरला. आणि तो थेट वनराजाच्या गुहेजवळ जाऊन थांबला. तिथे त्याने धोब्याला खाली आपटले आणि म्हणाला," महाराज, तुम्हाला नोकराची गरज होती ना? हा घ्या, मी नोकर आणला आहे."
वनराज बाहेर आला. माणसाला पाहून हरकला. " व्वा बसू, तू तर कमालच केलीस. माणूस माझा नोकर. माणसाला नोकर म्हणून ठेवणारा मी जगातला एकमेव राजा असेन. या बदली तुला त्या नदीकाठची गवताळ जमीन बक्षीस म्हणून देतो. जा ऐश कर." वनराज नोकर पाहून खूश झाला.
बसू गाढव धोब्याकडे पाहत हसत-हसत निघून गेले. इकडे वनराजाच्या तावडीत सापडलेल्या धोब्याची पाचावर धारण बसली. त्याची शिट्टी-बिट्ती गूल झाली होती. वनराजाने त्याला नोकर म्हणून ठेवले. राणी त्याच्याकडून सगळी कामे करवून घेऊ लागली. धोब्याला मोठा पश्चाताप झाला आणि... आणि एक दिवस संधी साधून डोक्याला पाय लावून शहराकडे पळत सुटला.

No comments:
Post a Comment