Sunday, September 23, 2018

महिलेशिवाय जग शक्य आहे काय?


     वॉल्टर बेसेंट यांचे द रिवॉट ऑफ मॅन हे पुस्तक 1882 मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकात त्यांनी भविष्यात इंग्लड कसा असेल, याची कल्पना केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, एक काळ असा येईल की त्यावेळेला परंपरेनुसार जुन्या वस्तू पुन्हा वापरात येतील. मोठ्या बदलानुसार समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती सर्व शक्तीशाली पदांवर राज्य करेल.
     राजेशाही व्यवस्थेचा शेवट होईल आणि नवा राजधर्म उदयास येईल, ज्यात आदर्श महिलेची पूजा होईल. अर्थात असे अनंतकाळापासून चालत आले आहे. भविष्यात पुरुषांना आपल्या अकडूपणावर आवर घालावा लागेल किंवा त्यात सौम्यपणा आणावा लागेल. त्यांना सरळ व्यवहार स्वीकारावा लागेल.घरातल्या आपल्या मुलांची काळजी करावी लागेल.त्यांची देखभाल करावी लागेल. या पुस्तकातील एक भाग समकालिन कला प्रदर्शनाच्या दिशेने घेऊन जाते. यात सर्वात अधिक पेंटिंग एथलीट, रनर्स, रेसलर्स, जंपर्स आणि क्रिकेट प्लेयर्स यांची छायाचित्रे आहेत. मात्र महिलांचे फोटो अधिक दिसतात. या पुस्तकात असेही लिहिले आहे की, समाजाची अशी धारणा आहे, स्त्रियांनी वयाच्या 40 वर्षांपूर्वी लग्न करायला हवे. आपले करिअरदेखील बनवायला हवे. याचा अर्थ असा होतो की, महिला पुरुषांपेक्षा लवकर वृद्ध होतात?
     आपण असे ऐकले आहे किंवा पाहिले आहे की, पुरुष मोठ्या पदावर चिकटून राहण्यासाठी लांड्यालबाड्या करतो. कुरघोड्या करतो. अर्थात कटकारस्थान करतो. कारण मिळालेल्या पदाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर राहावा. महिला मात्र असे काही पाहिले की, उग्र रूप धारण करतात. त्यांच्या अंगी जगदंबा अवतरते. असे घडले तर एक क्रांतिकारी निर्णय जन्माला येतो. हा इतिहास आहे.
इतिहास साक्षी आहे, महिलांनी ज्या क्रांतीची सुरुवात केली आहे, त्या त्याच्या शेवटापर्यंत पोहचल्याशिवाय राहत नाहीत. क्रांतीचा परिणाम असा होतो की, महिला नेतृत्व करतात तेव्हा, पुरुष तिला आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न करीत असतो. यातच महिला आणि पुरुषांचा संघर्ष होईल. संपूर्ण जग याला साक्षी असेल. पुस्तकाच्या शेवटी एक प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे महिलेशिवाय या जगाची कल्पना केली जाऊ शकते काय? असा समाज बनेल काय? आणि नाही तर का नाही?

No comments:

Post a Comment