Tuesday, September 25, 2018

इयरफोनमुळे होऊ शकते संक्रमण

इयरफोनसारख्या एक्सेसरीज शिवाय स्मार्टफोन अपूर्ण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण मोबाईल चार्जरनंतर इयरफोन हाच एक एक्सेसरीज सर्वाधिक गरजेचा आहे. नेहमी आपण आपल्या मित्रांसोबत,कुटुंबातील सदस्यांसोबत आणि ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत हा इयरफोन शेयर करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का, की अशा प्रकारे एकमेकांचा इयरफोन वापरल्याने गंभीर संक्रमणाचे कारण बनू शकते ते? पण अलिकडच्या संशोधनानुसार अनेक बाबतीत एकमेकांचा इयरफोन वापरल्याने घातक ठरू शकतो.
एरिजोना विश्वविद्यालयातील एसोसिएट प्रोफेसर केली रेनॉल्डस यांच्या मतानुसार कानाच्या आत तयार होणारे मेण (वॅक्स) नुकसानकारक जीवाणुंपासून आपल्याला कानांचे संरक्षण करते. पण बॅक्टिरिया या वॅक्सच्यामाध्यमातून एका कानातून दुसर्या कानात या आइयरफोनमुळे पोहचू शकतात. आपला इयरफोन दुसर्याशी शेयर करणार्या लोकांमध्ये संक्रमणाचा धोका दुप्पटीने होऊ शकतो. संक्रमणामुळे कानात फंगस होऊ शकतो, त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेला आणि कानाच्या आतील  भागाला धोका पोहचू शकतो. बिझनेस इनसायडरच्या सर्व्हेक्षणानुसार खाज, सूज आणि कानाच्या तवचेचे संक्रमण होऊ शकते.त्यामुळे इयरफोन दुसर्यासोबत शेयर न केलेलेच बरे! त्याचबरोबर नियमितपणे याची स्वच्छता, साफसफाईदेखील करायला हवी.

No comments:

Post a Comment