Saturday, October 13, 2018

योग्य वेळी योग्य निर्णय, तुम्हाला मिळेल सक्सेस


     जीवन म्हणजेच चढौतार. सुख-दु:ख जीवनात दिवस-रात्र, ऊन-सावलीप्रमाणे येत राहतात. जीवनात यशापयश येत राहतं. संधी येतात, मनाची चलबिचल होते. पण तेच लोक यशस्वी होतात, जे प्रत्येक परस्थितीला धैर्याने तोंड देतात आणि योग्य संधीचा योग्य फायदा उठवतात. मग ते जीवन असेल,शिक्षण असेल. योग्य वेळेला योग्य प्रश्न विचारणाराच पुढे जातो. याचाच अर्थ यशासाठी आपल्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. जर याचा अभाव असेल तर खूप मेहनत करूनही काही उपयोग होत नाही.

भितीला पळवून लावा
प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे त्याच्यात असलेली भिती. या भितीमुळेच माणूस निर्णय घ्यायला वेळ लावतो. जो चुकला तो संपला, हे तुम्हाला माहित आहे. निर्णय घेण्यात उशिर लावलात,याचाच अर्थ वेळेचे नुकसान आणि डोक्यातल्या काळज्यांना प्रोत्साहन. चिंताग्रस्त असलेले मन, डोके कधीही पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. क्षमतेचा भरपूर उपयोग करू शकत नाही. आजच्या तरुण पिढीला प्रत्येक वेळेला स्वत: स्वत:ला कोणता ना कोणता निर्णय घ्यावा लागतो. काही लोक खूप दिवस विचार करतात आणि मग निर्णय घेतात. तरीही त्यांचा निर्णय चुकलेला असतो. याचे कारण म्हणजे मनातील भिती. विज्ञानशास्त्र आणि विश्लेषणयुक्त दृष्टिकोनयुक्त विचाराचा अभाव.
सार्थक जीवन
जगात अशी असंख्य काही उदाहरणे आहेत,ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं, पण आपला आत्मविश्वास कदापि ढळू दिला नाही. योग्य वेळेची प्रतीक्षा आणि प्रामाणिक काम तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाते. एक दिवस संधी मिळते आणि त्यांना जीवनात जबरदस्त यश मिळून जातं. असं म्हटलं जातं की,तप्त लोखंडावर घाव घातल्यावर त्याला पाहिजे असा आकार देता येतो. मात्र तेच थंड लोखंडावर कितीही घाव घातलात तरी तुम्हा हवी ती वस्तू तयार होऊन मिळत नाही. धैर्याबरोबरच काम करत असताना आपल्या मार्गावरून जाता जाता आपल्याला एक ना एक दिवस अशी संधी मिळून जाते आणि आपल्या जीवनाचे सार्थक होते.
विचाराला बनवा शास्त्रज्ञ
निर्णयाला विलंब म्हणजे आपला आपल्यावर विश्वास नसणं.वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आणि भिती.माणसाला सर्वात पहिल्यांदा आपल्या विचाराला वैज्ञानिक आणि विश्लेषणयुक्त बनवणं. मनात घर करून राहिलेल्या भितीला पळवून लावलं पाहिजे. आताच्या तरुण पिढीला विचार करायला भाग पाडून वैज्ञानिक दृष्टीकोनातून सक्षम बनवलं पाहिजे. तरुणांनी समाजातील बर्या-वाईट गोष्टींचा अभ्यास करायला हवा. माणसाने स्व्त:ला प्रत्येक वाईट गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवलं पाहिजे. मानवी जीवनात शिक्षणाचा मुख्य स्त्रोत हा आपला निसर्गच आहे. जर माणसाने या निसर्गाच्या नियमों पालन करत जगला तर त्याचे विचार पूर्णपणे वैज्ञानिक होऊन जातात.
निसर्ग समजून घ्या
या निसर्गातील कुठलीच गोष्ट टाकाऊ, बेकार नाही. प्रत्येकाला आपले असे महत्त्व आहे. या सर्व कार्य आणि उपयोगितांना समजून घेतले पाहिजे. ओळखले पाहिजे. आपण प्रकृतीकडून शिक्षण घेतले पाहिजे. जर आपण निसर्गाच्या नियमांना समजून घेतले तर मनातील भिती दूर होते. आणि मनातील भिती दूर होणे म्हणजे योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे होय. योग्य वेळी, योग्य निर्णय माणसाला उन्नतीचा मार्ग दाखवतात.
नोकरी न मिळाल्यास, नापास झाल्यावर, नोकरी सुटल्यावर माणसाच्या मनात नकारात्मक भाव जमा व्हायला लागतात. अशा वेळी माणसाने स्वत:ला माझ्याच बाबतीत असे का घडले, असा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचे उत्तर मिळून जाते.

No comments:

Post a Comment