Sunday, October 28, 2018

अनुभव शिकवून जातात आपल्याला खास धडे


जीवन ही एक शाळा आहे आणि अनुभव सर्वात चांगला शिक्षक. अनुभव आपले असोत किंवा दुसर्यांचे, आपण नेहमी त्यातून शिकत असतो. अनुभवी लोकांचे सल्ले आणि गोष्टी मोठ्या कामाच्या असतात. भलेही तुम्ही एकाद्यासारखे शिक्षण घेतले नाही अथवा कसल्याच डिगर्या घेतल्या नसतील तुम्ही, पण काही धडे असे असतात की, जे फक्त आपल्या जीवनातल्या अनुभवातून शिकू शकतात. पुस्तकी ज्ञानाने ते मिळू शकत नाही.
ध्येयाची आवश्यकता
फ्रेडरिक नीत्शेंचं म्हणणं असं की, ‘ज्याच्याजवळ जीवन जगण्याचे ध्येय आहे, ते कोणत्याही प्रकारे काहीही मिळवू शकतात.’आपण निवडलेल्या करिअरमधून आपल्याला फक्त समाधान मिळायला हवे, असे नाही. यासाठी जीवनात एक मोठे ध्येय असणं महत्त्वाचं आहे.
कसे राहाल आत्मनिर्भर
सुकरात म्हणाले आहेत, ‘स्वत:ला शोधण्यासाठी स्वत:विषयी विचार करायला शिका.’ आपण शिकतो, आपल्याला स्वत:च्या पायांवर उभे राहायला आणि स्वत:ची देखभाल स्वत: करायला. आई-वडील आणि गुरूवर्य आपल्याला नेहमी मार्ग दाखवू शकत नाहीत. त्यामुळे आपण जगाबरोबर चालण्यासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याशिवाय चांगल्याप्रकारे कोणीच देऊ शकत नाही.
वेळेवर नियंत्रण नाही
ऑप्रो विन्फ्रे म्हणतात, ‘तुमच्याजवळ सर्व काही असू शकते, पण सर्व काही एकाच वेळी असू शकत नाही.’ जीवन आपल्याला एक गोष्ट शिकवते, ती म्हणजे आपल्याला नेहमी पाहिजे ती गोष्ट मिळत नाही हेच! आपण वेळेवर नियंत्रण मिळवू शकत नाही. त्याच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. साहजिकच  आपल्याला भविष्याचा अंदाज लागू शकत नाही. जर आपली वेळ आली नसेल तर आपण लाचार होतो.
अपयशातून वर कसे यायचे
विन्स्टन एस. चर्चिल म्हणाले आहेत, ‘यश म्हणजे काही आयुष्याचा शेवट नाही, अपयश काही घातक नसतो, सतत प्रयत्न करत राहण्याचे धाडस हेच सर्वोपरी महत्त्वाचे आहे.’ शाळेत असताना एकाद्या वर्गात अपयश आले तरी पुढच्या वर्गात मोठी मेहनत घेऊन ते यश पुन्हा प्राप्त करू शकतो. पण जीवनात अपयश आपल्याला मोडून टाकू शकते किंवा आयुष्याचे दिशाच बदलून जाऊ शकते. अपयश आपल्या जीवनाचा एक हिस्सा आहे. पराभवानंतरच यश नशिबी पडतं. अपयश आपल्या प्रवासाचा एक भाग आहे. यातून उठून फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली पाहिजे.
संयम ठेवायला शिका
अरस्तूंचे प्रसिद्ध वाक्य आहे,’सब्र कडवा होता है,लेकिन इसका फल मीठा होता है।’ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम ठेवायला शिकले पाहिजे. जीवनातल्या घटना निश्चित आणि कालबद्ध नसतात. आपल्यावर आपण स्वत: धैर्य आणि विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. शेवटी वेळ आल्यावर आपल्याला यश मिळतेच. आपण शेवटी आपल्याला हव्या त्या ध्येयापर्यंत पोहचतो.
सर्वांनाच प्रेमाची गरज असते
लाओ जू यांनी म्हटले आहे की,‘ कुणाचे तरी खरे प्रेम मिळाल्यावर एकप्रकारची ताकद येते, शक्ती येते आणि कुणाला तितकेच नि:स्सीम प्रेम दिल्यावर आपल्यात धाडस येते.’ आपल्याला खरे तर खर्या प्रेमाची गरज असते. आपण त्याचा भुकेला असतो. त्यामुळे असे खरे प्रेम  दुसर्याच्यात धाडस निर्माण करते. त्याच्याने आपले आयुष्य सुंदरच होईल. आपण कोणावर प्रेम करावं, कसं प्रेम करावं, या गोष्टी आपल्याला शिकवल्या  जात नाहीत. आपल्याला जीवनातल्या अनुभवातूनच त्या शिकाव्या लागतात. पण यासाठी संयम आणि समर्पणाचा धडादेखील आपल्याला शिकायला मिळतो.
जीवनाची वाटचाल फारच कठीण
एम. स्कॉट पेक यांनी म्हटले आहे की, ज्यावेळेला आपण खरोखरच जाणून घेतो की, जीवनाची वाट्चाल खडतर आहे. पण ते पार केल्यावर आपल्या लक्षात येते के,याच्यापुढे जीवन अवघड नाही. कारण त्याचा आपल्याला सराव झालेला असतो. साहजिकच यानंतरचे जीवन कठीण जात नाही. जीवनात आपण अनेक गोष्टी शिकत असतो. जसजशी जबाबदारी वाढते, तसतशी जीवनातल्या नफ्यात वाढ होत जाते. जीवन आपल्याला याच्या चढ-उताराबरोबरच ताळमेळ ठेवायला शिकवते.
सर्वांनाच हवी मदत
जोशिलीन जॅक्सन म्हणतात, ‘परमेश्वराने आपल्याला रडण्याचे कौशल्य दिले आहे. रडण्याने ज्यावेळेला मदतीची गरज असते, त्यावेळेला ती मिळून जाते. कारण ते रडणे पाहून लोक मदतीसाठी धावून येतात.’ कितीही आपण स्वत:वर अवलंबून असलो तरी कधी ना कधी व कधीही आपल्याला मदतीची गरज भासते. पैशांनेच सर्व काही मिळू शकत नाही. या जगात कोणतीही अशी व्यक्ती नाही,जी निराश नसते किंवा त्याचे हृदय तुटलेले नसते. जीवन आपल्याला शिकवून जातं की, आपण कितीही प्रयत्न केला तरी एकट्याने काही करू शकत नाही.
काहीच अशक्य नाही
शेल सिल्वरस्टीन यांचे म्हणणे असे की, ‘कठीण गोष्टींविषयी जाणून घ्या, ऐकून घ्या. शक्य होणार नाहीत, अशा गोष्टी समजून घ्या, जे कधीच काही घडले नाही, त्याच्याविषयी ऐका, मग माझ्याजवळ या. सर्व काही शक्य आहे. काहीही होऊ शकते आणि काहीही आपण करू शकतो.’आपले जीवन कठीण आहे. तसेच ते आकर्षकही आहे. डोळ्यांची पापणी झाकल्याबरोबरच आपल्यासमोर शानदार संधी येऊ शकतात. अशी संधी जी आपले जीवनच बदलून टाकेल. ही गोष्ट आपल्याला आवडत्या नोकरी किंवा चांगल्या पार्टनरजवळ घेऊन जाऊ शकते. जीवन आपले कोणतेही स्वप्न पूर्ण करण्याची सक्षमता बाळगून असते. जीवन अस्थीर आहे. त्यामुळे सर्वकाही चांगले असेल तर त्याची मजा लुटता येते. ज्यावेळेला वाईट काळ चालू असतो, त्यावेळेला काळजी करत बसू नका, कारण हा काळदेखील फार काळ टिकू शकत नाही.

No comments:

Post a Comment