Tuesday, October 23, 2018

(बालकथा) चोर कोण?


राजा कृष्णदेवराय कलाकारांचा सन्मान करायचा. एकदा राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात एक चित्रकार आला. त्याने अनेकांची चित्रे काढली. चित्रे अप्रतिम होती. दरबारातल्या लोकांनी त्याची वाहवा केली. चित्रकारने राजा कृष्णदेवराय यांचेही चित्र बनवले. ते पाहून राजा खूश झाला. चित्रकाराने राजमहालाचे चित्र काढण्याची परवानगीही घेतली. आता तो बेधडक राजमहालात कुठेही प्रवेश करत असे. राजाने परवानगी दिली असल्याने कुणीच त्याला अडवत नव्हते. लवकरच राजमहालाचे चित्र पूर्ण झाले.
राजमहालाचे चित्र खरोखरच अप्रतिम काढले होते. आता चित्रकाराने जायची परवानगी मागितली. राजा कृष्णदेवराय म्हणाला, “ तू उत्तम चित्रकार आहेस. तुझा आम्हाला सन्मान करायचा आहे. आणखी दोन दिवस रहा. मग जा. ”
चित्रकाराच्या सन्माचा दिवस निश्चित झाला. पण त्याच्या आदल्या रात्रीच चित्रकाराच्या साहित्याची चोरी झाली. दुसर्या दिवशी सेनापतीने राजाला सांगितले.
महाराज चोर सापडला आणि साहित्यही. ”
राजाने विचारले, “  कोण आहे तो चोर? ”
महाराज, हे सगळे आता तेनालीराम सांगेल. ”  सेनापती म्हणाला.
राजाने आश्चर्याने तेनालीरामकडे पाहिले.
तेनालीराम हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, “  महाराज, मीच चोर आहे. हे त्याचे सामान. ”
दरबारात चुळबूळ सुरू झाली. प्रत्येकजण म्हणत होता, “ तेनालीरामने अतिथीचा अपमान केला.ङ्घ
तेव्हा तेनालीराम म्हणाला, “  महाराज, हा चित्रकार नाही, शत्रूचा जासूस आहे. राजमहालाचे चित्र बनवता बनवता याने सर्व गुप्त मार्गांचा नकाशा बनवला आहे. मला याच्यावर संशय आल्याने याचे साहित्य उचलले. आपल्याकडून हा सन्मान घेऊन निघून गेला असता,पण आपली संपूर्ण गुप्त माहिती त्याने शत्रू राजाला पुरवली असती. ”
राजाने चित्रकाराला तुरुंगात टाकले. चित्रकाराऐवजी राजाने तेनालीरामचा सन्मान केला.

No comments:

Post a Comment