इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.9) रोजी वृत्तपत्र पत्रलेखकांचा मेळावा व उत्कृष्ट पत्रलेखन पुरस्कार वितरण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी ही माहिती दिली.प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्रौढ व निरंतर विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. भालबा विभूते उपस्थित राहणार आहेत. पत्रलेखनासाठी पत्रलेखकांना प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या अकरा वर्षापासून संघाच्या माध्यमातून प्रतिमहिना प्रसिद्ध झालेल्या एका पत्राला उत्कृष्ट पत्रलेखनाचा पुरस्कार दिला जातो. तेरा पत्रलेखकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जयश्री मांडवकर, अशोक आफळे, आसमा मुजावर, प्रकाश चौगुले, अतुल देसाई, स्वाती पाटील-निंबाळकर, ज्योती पाटील, हणमंत शिंदे, प्रा. एम. बी. देशमुख, मच्छिंद्र ऐनापुरे, सुनीता जाधव, विजय रवंदे, मनोज खेतमर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment