Monday, June 5, 2017

आनंदी जीवन जगण्यासाठी...

      जीवनात खूप काही असे आहे की,जे तुम्ही करता स्वत:साठी,पण त्याचा परिणाम तुमच्याबरोबरच दुसर्यांवरही होत असतो.त्यामुळे या काही टिप्स आहेत,त्याचे अनुसरण करा आणि आनंदी जीवन जगा.
सात तास झोप घ्या,सुंदर दिसण्यासाठी
विविध प्रकारच्या संशोधनांनी हे सिद्ध झाले आहे की, तुमच्या आयुष्यात तुमच्या झोपेचा प्रोब्लेम झाला असेल. तुमच्या झोपेचे खोबरे झाले असेल तर तुम्ही अकाली म्हातारे दिसायला लागता.30 ते 49 दरम्यानच्या वयाच्या महिलांच्या झोपेसंदर्भात एक शोध घेतला गेला,त्यानुसार ज्या महिला पूर्ण झोप घेत नाहीत, त्यांच्या चेहर्यावर सुरकुत्या,डाग-धब्बे दिसायला लागतात. चेहर्यावर अकाली वृद्धत्व दिसायला लागतं. त्वचेवरचा मुलायमपणाही कमी व्हायला लागतो.वास्तविक झोप चेहर्याच्या दुरुस्तीचे काम करते.त्यामुळे पूर्ण सात तास झोप घ्या आणि सुंदर दिसा.
अंघोळ करा, राग शांत करण्यासाठी
राग काहींना आवरता आवरत नाही. त्यामुळे त्याचा स्वत:ला तर त्रास होतोच शिवाय दुसर्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यावर अंघोळ करणे, हा एक चांगला उपाय आहे. अंघोळ केल्याने चिंतामुक्त व्हायला आणि रांग शांत करायला मदत होते.पाणी तणावपूर्ण मांसपेशींना रिलॅक्स करण्याचे काम करते. या अंघोळ करण्याबरोबरच तुम्ही गुणगुणतसुद्धा त्याचा आणखी चांगला परिणाम होऊन तणाव कमी करणारे हार्मोन हायड्रोकॉर्टिसोन उत्तेजित होतात. त्यामुळे रिलॅक्स व्हायला होतं.
सकारात्मक रहा, वैवाहिक जीवनासाठी
माणूस सुखासाठी सतत धडपडत असतो. काहींच्या सुखी कुटुंबाच्या काही कल्पना असतात. मात्र आपले वैवाहिक जीवन आंनदी आणि मस्त मजेत ठेवायचं असेल तर आपण आपल्या जोडीदारासोबत सकारात्मक व्यवहार करायला हवं. दोघांदरम्यानचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जीवनातला कडवटपणा कमी करण्यास मदत करतो.त्यामुळे सकारात्मकता जीवनात ठेवण्याचा प्रयत्न करा.
हसा, आनंद विखुरण्यासाठी
आनंद वाटल्याने आनंद वाढतो, याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे एखाद्याला आनंदी ठेवायचे असेल तर त्याला सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे त्याच्यासमोर तुम्ही खूश रहा, आनंदी रहा. दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असलात तरी  एक हास्य दोघांमधला दुरावा कमी करतं आणि दोघांमध्ये  मैत्री धागा विणायला  मदत करतं.
मदत करा, दीर्घ आयुष्यासाठी
एकमेकाला मदत केल्याने अनेक गोष्टी साध्य होतात. दीर्घायुष्यासाठी ही मदत उपयोगी ठरते. जर तुम्ही नि:स्वार्थ भावनेने एखाद्याला मदत करत असाल किंवा एखाद्याला त्याच्या  कामात हातभार लावत असाल तर ही गोष्ट तुमच्या दोघांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी चांगली असते. ही गोष्ट 30 पेक्षा अधिक संशोधनाने सिद्ध झालेली आहे.



No comments:

Post a Comment