गेल्या मार्च महिन्यात एअरबस या
विमानांचे उत्पादन करणार्या कंपनीने त्यांची पहिलीच कार तीही उडती कार पॉप डॉट अप
या नावाने जिनेव्हा येथे ऑटो शोमध्ये सादर केली. ऑटो शो मध्ये जगभरातील वाहन
कंपन्या त्यांची नवी मॉडेल्स नव्या कनसेप्टस सादर करत असतात.या एअरबसने प्रथमच
कसेप्ट कार मध्ये भाग घेतला. या कारचे डिझाईन तयार करण्यासाठी इटलीच्या इटलडिझाईन
या कंपनीशी करार केला आहे. ही हायब्रिड कॉनसेप्ट कार जमिनीवर चालेल तसेच आकाशात
उडेल. दोन प्रवासी बसू शकतील एवढ्या आकाराची ही कार पॅसेंजर कॅप्सूलप्रमाणे आहे.
त्याचप्रमाणे गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनीही उडती कार विकसित केल्याचे
सांगितले जाते. यासाठी गेल्या सहा वर्षांपासून एक गुप्त प्रकल्प वैयक्तीकरित्या
राबविला जात होता. २०१० पासून लॅरीने हा प्रकल्प सुरू केला आहे व त्यासाठी
स्वतःच्या कमाईचे ६७० कोटी रूपये आत्तापर्यंत खर्च केले आहेत. स्टार्टअप झी एरो या
नावाचा हा प्रकल्प आत्तापर्यंत लॅरी ने गुप्त ठेवला होता. या प्रकल्पात ट्रान्समिशन
फ्लाईंग कार डेव्हलप केली जात आहे. टीएफएक्स एअरक्राफ्ट नावाच्या या कारमध्ये चार
जणांची बसण्याची व्यवस्था आहे. ही कार काँम्प्युटरने नियंत्रित करता येते. म्हणजे
ऑपरेटर त्याच्या इच्छेनुसार यात अगोदरच टेक ऑफ, लँडींग
व डेस्टीनेशन घालू शकणार आहे.
या हायब्रिड इलेक्ट्रीक फ्लाईंग
कारला पंख आहेत व ते ट्विन इलेक्ट्रीक मोटर पॉडशी जोडलेले आहेत. हे पंख दुमडू
शकतात व मोटरपॉडमुळे कारची बॅटरी चार्ज होऊ शकते. ही कार व्हर्टिकल व हॉरिझाँटल
पोझिशन घेऊ शकते. तिचा कमाल वेग आहे ताशी ८०६ किमी. ही कार ऑटो लँडिग करू शकते तसेच
यात ऑपरेटरला लँडींग रद्द करण्याची सुविधाही आहे. त्यात व्हीकलर पॅराशूट सिस्टीम
आहे. इमर्जन्सी मध्ये ऑपरेटर ती अॅक्टीव्हेट करू शकतो. व समजा ऑपरेटरने ती कार्यान्वित
केली नाही तरीही कार जवळच्या एअरपोर्टवर ऑटो लँडींग करू शकते असे समजते.
सिलीकॉन व्हॅलीतील स्टार्टअप
कंपनीच्या किटी हॉक यांनीही फ्लायर ही उडती कार बनविली असून ही कार
उडत असतानाचे व्हीडीओ प्रसारित केली आहे. यामुळे एकच धूम माजली असून
एक्स्पर्ट सिमेरन मॉरिस यांनीही या फ्लाईंग कारची टेस्ट घेतली आहे. मॉरिस म्हणतो, ही कार उडविताना मला फारच मजा वाटली. यापूर्वी मी खेळातले
हेलिकॉप्टरही कधी उडविलेले नाही मात्र ही कार शिकण्यासाठी मला कांही तासच सराव
करावा लागला. मॉरिस यांच्याप्रमाणेच अन्य
काही लोकांनीही ही कार उडविली.१०० टक्के इलेक्ट्रीक पॉवरवरची ही कार
हेलिकॉप्टरप्रमाणे व्हर्टिकल उडते व तशीच लँड करते. व्हिडीओ गेम खेळताना कंट्रोल
करायला जितका वेळ लागतो, तेवढ्यात वेळात ती शिकता येते. ८
रॉटर्सच्या मदतीने ती उडते व पाण्यातही उतरू शकते.
या तीन घटना पाहिल्या तर आपल्या
लक्षात येईल की,उडती कार बनवण्यासाठी किती उत्सुकता
आणि प्रयत्न चालले आहेत हे लक्षात येते. चालकाशिवाय कार रस्त्यावर
उतरवण्याचे काम गुगल आणि ऊबरने केले आहे. या कारची यशस्वी चाचणी झाली असली तरी
व्यावसायिकरित्या त्याचे उत्पादन सुरू झालेले नाही. मात्र ती वेळ फार लांब नाही.
त्यामुळे आता उडत्या कारचे आकर्षण आणि उत्सुकताही जगाला लागली आहे. पण
खरेच ही उडती कार लवकरात लवकर सत्यात येईल का,असा प्रश्न
आहे.कारण प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक समस्या आणि अडचणी आहेत. त्यांचे निराकरण
करण्यास कंपन्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.
हेलिक्प्टर उडवताना आणि
उतरवताणा अजूनही सोयीस्कर झालेले नाही.त्यासाठी हेलिपेडची गरज लागते.कार तर भर
रस्त्यावरून उडवायची आहे.हे काम अर्थातच मोठ्या जिकिरीचे आणि प्रचंड खर्चिक
आहे.यात लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.उडत्या कारची निर्मिती ही
जलद वाहनसेवा ही आहे.लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहचण्यासाठी आणि वाहतूक अडथळा
टाळण्यासाठी आहे.हवाई उड्डाणाचेही काही नियम आहेत.त्यात शिथिलता आणण्याची गरज
आहे.गाडीचा वेग ,गाडीच्या हवेतल्या उड्डाणाची ऊँची,शिवाय त्याला इंधन कोणत्या प्रकारचे लागेल या गोष्टी स्पष्ट व्हावया
लागणार आहेत.सध्या जॉय राईडसाठी उड्डाण कारची निर्मिती झाली आहे.कीटटी हॉक यांनी
केलेल्या वाहनासाठी बॅटरीचा उपयोग करण्यात आला. सध्या त्याचा पाण्यावरून उड्डाणाचा
प्रयत्न झाला आहे.रस्त्यावरची चाचणी अजून व्हायची आहे.त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उडत्या कारची निर्मिती जसजशी
यशस्वी होईल ,तसतसे त्याबाबतच्या वापराचे नियम
प्रत्यक्षात येत राहतील.
भारतात ही उडती कार यायला बराच
कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत परदेशात कारच्या रस्त्यावरील आणि हवेतील
वावराचे नियम स्पष्ट होत जातील.सध्या मानवरहित ड्रॉनबाबत काही कडक नियम
आहेत.त्यामुळे उडत्या कारलादेखील वेगळ्या परवानगीची गरज भासणार आहे.म्हणजे उडती
कार प्रत्यक्षात येण्यास अनेक अडचणी आहेत.त्याचा कार निर्मात्यांना सामना करावा
लागणार आहे.मात्र निर्मितीचा वेग आणि प्रयत्न पाहता काही वर्षेच या कारची प्रतीक्षा
करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment