बाथरूम
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मत मागत होते. त्यांनी एका घराची बेल वाजवली. एका नऊ-दहा वर्षाच्या मुलीने दरवाजा उघडला. उमेदवाराने विचारले," तुझे पप्पा, काँग्रेसमध्ये आहेत का भाजपात?"मुलगी म्हणाली," नाही, ते बाथरूममध्ये आहेत."
मैत्रिणीचा शोध
एका यात्रेत दोघा मित्रांची भेट झाली. दोघेही मोठ्या चिंतेत होते, कारण त्यांच्या मैत्रिणी यात्रेच्या गर्दीत हरवल्या होत्या. शेवटी दोघांनी मिळून त्यांचा शोध घेण्याचे ठरले. एकाने विचारले," तुझी मैत्रिणी दिसायला कशी आहे?"दुसरा म्हणाला," उंची साडेपाच फूट, खांद्यापर्यंत कापलेले केस, निळेभोर डोळे आणि खूपच स्वीट, स्मार्ट!"
पहिला मित्र सल्ला देत म्हणाला," चल, अगोदर तुझ्या मैत्रिणीचा शोध घेऊ."
No comments:
Post a Comment