चिकू-मिकू बेटा, चला मी आज तुम्हाला उडायला शिकवते. तुम्ही दोघे मोठे झालात, आता तुम्हाला उडायला यायला हवं." मिनू चिमणीने आपल्या बाळांना आवाज दिला.
"मोठे! आणि आम्ही!" एकदम दोघेही ओरडले.
" हो... हो.. आता तुम्ही मोठे झालात. चला उडण्याचा प्रयत्न करा. आता तुमचे पंख उडण्याइतके मोठे आणि सक्षम झाले आहेत."
" पण मम्मी, काल तर तू म्हणालीस की आम्ही दोघे अजून लहान आहोत म्हणून..."
" हो मी म्हणाले होते, पण माझ्या लबाड आणि आळशी पिल्यांनो! तुम्ही घरट्याबाहेर जाऊ का विचारत होतात. तेव्हा म्हणाले, उडायला आल्याबिगर बाहेर जाणार कसे?" उडायला शिकायचं म्हणजे भारी कष्टाचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं. दोघेही बहाणा करताहेत, हे मिनूनं ताडलं होतं.
"बरं चला, काही बहाणा सांगायचा नाही मला. मी जशी उडते, तसे पाहून उडायला शिकायचे. "
चिकू म्हणाला," मम्मी, आम्ही दाणे कसे टिपायचे शिकलो आहोत ना, मग तसेच शिकू. त्यात काय अवघड आहे."
"हो मम्मी, चिकू म्हणतोय ते खरंय." मिकू चिकूच्या स्वरात स्वर मिसळत म्हणाला.
"खायला काही शिकवावं लागत नाही. जन्मताच काय आणि कसं खायचं आपोआप सगळे शिकतात. उडायला मात्र शिकावं लागतं."
"आमची स्वीट स्वीट मम्मी, आज नाही उद्यापासून.... उद्या शिकव ना उडायला!" दोघंही मिनूच्या गळ्याभोवती जाऊन झुलू लागले. शेवटी मम्मीने हार पत्करली.
" ठीक आहे, पण उद्या नक्की!"
" हो, नक्की!" दोघांनी विश्वास दिला.
दुसर्यादिवशी मिनूने पुन्हा उडण्यासाठी त्यांना उठवलं, पण पुन्हा दोघांनी बहाणा केला.अशा प्रकारे दिवस जात राहिले.पण ते काही उडायला शिकले नाहीत.
एक दिवस चिकू आणि मिकू घरट्यात दोघेच होते. मम्मी खाऊ आणायला बाहेर गेली होती. दोघांना एकटे पाहून दबा धरून बसलेला साप त्यांच्या दिशेने हळूहळू सरकत होता. दोघांनीही सापाला पाहिले. दोघे घाबरून गट्ट झाले. त्यांना मम्मीने सांगितलं होतं, साप आपला शत्रू आहे. संधी मिळताच आपली लहाने बाळे आणि अंडी गिळंकृत करतो. चिकू म्हणाला," मिकू, आता हा साप आपल्याला खाणार. आपण काय करायचं रे?"
" चिकू, ही विचार करत बसण्याची वेळ नव्हे. चल उड..." मिकूने चिकूचा हात पकडला आणि दोघांनीही घरट्याबाहेर उडी घेतली. दोघे उडण्याचा प्रयत्न करू लागले. पण उडायला शिकले नसल्याने दोघेही धप्पकन खाली पडले. जोराचा मार बसल्याने त्यांचे डोळे बंद झालेले...!
डोळे उघडले तेव्हा, ते दोघे एका घराच्या अंगणात होते. भलं हो त्या माणसांचे! ज्यांनी त्यांना पाहिलं नि सुरक्षित ठिकाणी ठेवलं. त्यांनी दवा-पाणीही केलं. दोघे घाबरल्याने थरथर कापत होते. चिकू तर रडायलाच लागला. रडत रडत म्हणाला," मिकू, आपण मम्मीचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आता आपण जिवंत राहणार नाही. सापापासून तर बचावलो, पण इथे एखादे मांजर आपल्याला गट्टम करून टाकील."
"चिकू, तू म्हणतोयसं ते खरंय. आपल्याला आपला आळस नडला. मम्मीचं ऐकलं नाही, म्हणून ही शिक्षा मिळाली. पण रडू नकोस. आपन काही तरी करू..."
दोघांचं बोलणं सुरू होतं, तेवढ्यात एका लहान बाळाच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज कानावर आला. दोघांनीही त्या दिशेने पाहिलं, तर तिथे एक लहान मूल आईचा हात धरून हळूहळू चालायला शिकत होतं.
ते दृश्य पाहून चिकू आणि मिकूची भीती कुठल्या कुठे पळून गेली. त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यांनी खाणाखुणा केल्या आणि मग दोघांनीही मोठ्या धैर्याने हवेत झेप घेतली, मम्मीकडे जाण्यासाठी! कारण तिच्याकडून उडण्याचे उत्तम उत्तम धडे घ्यायचे होते.

No comments:
Post a Comment