एक होता यश. मम्मी-पप्पांचा लाडका. क्लासमध्ये नेहमीच फर्स्ट. सगळेच म्हणत, यश मोठा स्मार्ट आहे. पण अलिकडे त्याला एक वाईट खोड लागली होती. मम्मीबरोबर मार्केटला जायचा ना तेव्हा, एखाद्या गोष्टीवर हटकून हट्टाला बसायचा. उडणारे विमान दिसले की, घे म्हणून दंगायोट करायचा. आइस्क्रीम पाहिलं की जाग्यावर नाचायला लागायचा. मम्मीकडून 'नाही' शब्द आला की, याची आदळापट सुरू ... कधी कधी रस्त्यावरच आडवा पडायचा. पाय खुडायचा. शेवटी वैतागून मम्मी तो मागेल ती वस्तू घेऊन द्यायची नंतर मम्मी फार समजावून सांगायची, कधी रागवायची. असा हट्ट बरा नव्हे म्हणायची. मग त्याला मम्मीचा राग यायचा. म्हणायचा,' सगळी मुलं हट्ट धरतात. त्यांची मम्मी त्यांना रागावत नाही. राजू, दिनू, बानू, मिनी सगळे ममी-पप्पांकडे हट्ट धरतात आणि ते त्यांच्या पसंदीच्या वस्तू खरेदी करतात. ते त्यांना रागावत नाहीत. तू मात्र रागावतेस!'![](https://encrypted-tbn0.google.com/images?q=tbn:ANd9GcTrnEFzzYHQSR1ym3cAu1u91acxA7A3k1x1nAuXznpxglaciSJkvQ)
एक दिवस मम्मी रागाने म्हणाली, " यश, तू दिवसेंदिवस बिघडत चाललायस. बाकींच्या पोरांचं मला माहित नाही. पण तू ही सवय सुधार! तुझे पप्पा आणि मी तुझ्यासाठी किती खेळणी घेतो, खायच्या चिजा घेतो. पण तरीही तू पुन्हा पुन्हा नव्या वस्तूंसाठी हट्ट धरतोस. ही वाईट सवय आहे. यापुढं काहीएक मागायचं नाही. गप्प होमवर्क करीत बस जा." असे म्हणून मम्मी किचनमध्ये निघून गेली.
काही दिवसांनंतरची गोष्ट! यशच्या मित्राला-राजूला त्याच्या पप्पाने सायकल घेऊन दिली. यश बागेत खेळायला गेला तेव्हा राजूने मोठ्या ऐटीत आपली सायकल त्याला दाखवली आणि म्हणाला," बघ, माझ्या पप्पांनी माझ्यासाठी किती छान सायकल आणलीय. दुकानात गेल्यावर मी हीच सायकल पाहिजे असा हट्ट धरला. मग काय! मम्मी -पप्पांनी घेतली सायकल विकत." यशलाही खूप वाटलं, खरंच! पप्पांनी माझ्यासाठीसुद्धा सायकल विकत घेऊन दिली असती तर मीसुद्धा पार्कमध्ये सायकल आणून खेळलो असतो.
संध्याकाली पप्पा ऑफिसमधून घरी आल्या आल्या यश त्यांना सामोरे गेला आणि त्यांच्या पायांना हातांनी वेटोळे घातले. पप्पांनी त्याला उचलून घेतलं. मग पुढ्यात बसवून घेऊन टीव्ही पाहू लागले. यश पप्पांना म्हणाला," पप्पा, मला सयाकल घेऊन द्या ना! राजूच्या मम्मी-पप्पांनी त्याला नवीन सायकल घेऊन दिलीय. मलाही नवीन सायकल पाहिजे."
तेवढ्यात मम्मी रागावत म्हणाली," यश, तुला कितीदा सांगितलं, हट्ट करायचा नाही म्हणून.. दुसर्याशी बरोबरी ती काय करायची? " यश पप्पांच्या पुढ्यातून उठला आणि रडायला लागला. " मला सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्यावर तुमचं प्रेमच नाही, नाही तर असं वागला नसता." असे म्हनून तो रड्त रड्त बाहेर निघून गेला.
पप्पा मम्मीला म्हणाले," कशाला रागावलीस त्याला. घेऊन देऊ सायकल."
हा दिवसेंदिवस मुलखाचा हट्टी बनत चाललाय. त्याचा आपण प्रत्येक हट्ट पूर्ण करू शकत नाही आहोत. पाहताय ना पैशाशिवाय कसे हाल चालले आहेत ते! ..."
"पण हरकत नाही, मला कपडे घ्यायला ठेवलेले पैसे आहेत. त्यातून आणि आणखी काही तरी उलाढाल करून घेऊ सायकल."
मम्मी हळूच म्हणाली," अहो पण, तुमच्या कंपनीची अनिवर्सरी आहे ना या मंथ एंडला. समारंभाला जुनेच कपडे घालून जाणार का?''
"असू दे गं, त्याचा आनंद म्हणजे आपला आनंद. कपडे काय नंतरही घेता येतील. आणि जुने कपडे घालून गेल्यावर काय फरक पडणार आहे?"
यश दाराआडून मम्मी-पप्पांचे बोलणे लपून ऐकत होता. त्याला खूप वाईट वाटले. पटकन त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याला वाटले होते, रडून , गोंधळ घालून सायकल मिळवता येईल. पण आपल्यासाठी मम्मी-पप्पांना त्यांच्या गरजांवर मुरड घालावी लागत आहे, हे कळल्यावर त्याला फार दु:ख झाले.
आता यशला पश्चाताप झाला. त्याची त्यालाच लाज वाटू लागली. 'मी किती मूर्ख! मम्मी-पप्पा माझ्यावर किती प्रेम करतात. मी मात्र दुसर्यांचे पाहून उगाचच हट्ट धरून त्यांना त्रास देतो.' तो धावतच त्यांच्याजवळ गेला," सॉरी मम्मी-पप्पा! आता मी कधीच हट्ट धरणार नाही मला सायकल नको. " असे म्हणून यश पप्पांना मिठी मारून रडू लागला. मम्मी-पप्पांनी त्याला गप्प बसवले आणि म्हणाले," "आज आमचा यश समजूतदार बनला."

No comments:
Post a Comment