भेदभाव का?
आत्माराम 'वर' पोहचले. त्यांना स्वर्गातल्या एका तात्पुरत्या कक्षेत ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत आणखीही काही लोक होते. त्यांना स्वर्गात ठेवायचं की नरकात याचा फैसला दोन-चार महिन्यांनी होणार होता. इथे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री फक्त बिस्किटं आणि चहा दिला जायचा. पण कितीही खा आणि प्या. दोन दिवसांनी त्या कक्षाचा प्रभारी दूत आला, तेव्हा आत्माराम त्याला म्हणाले," मी खिडकीतून रोज पाहतोय, तिकडे त्या नरकवासियांना तीनवेळा मस्तपैकी भरपेट जेवण दिलं जातंय आणि आम्हाला मात्र चहा-बिस्किट? आमच्याशी असा भेदभाव का?"दूत उत्तरादाखल म्हणाला," त्यांची संख्या लाखात आहे, आणि तुम्ही फक्त सहा-सात! आम्ही विचार केला की इतक्या कमी लोकांसाठी दाम आणि श्रम का वाया घालवायचे?'
घाणेरडा फिक्चर
ते आपल्या मुलावर रागावत होते," तुला लाज नाही वाटत, घाणेरडा फिक्चर बघतोस ते."मुलगा म्हणाला," नाही पप्पा, मी गेलो नव्हतो, फिक्चरला. तुम्ही दुसर्याच कुणाला तरी पाहिला असाल."
"गप्प बस गाढवा, मला शहाणपणा शिकवू नकोस. मी तुझ्या मागच्याच सीटवर बसलो होतो. मी या.. या डोळ्यांनी पाहिलं तुला घाणेरडा फिक्चर पाहताना. "
मीच तो जादूगर
एक व्यक्ती गावातल्या एकमेव अशा दुकानात गेला. "तुमच्या दुकानात जे काही सडलेली फळं, टोमॅटो, अंडी आहेत, ते सगळे पॅक करून द्या. पैशाची काही काळजी करू नका."दुकानदार त्याला अपादमस्तक न्याहाळत म्हणाला," आलं लक्षात! आज संध्याकाळी जादूगरचा प्रोग्रॅम आहे ना गावात. कार्यक्रम चांगला झाला नाही तर त्याची चांगलीच खबर घेण्याचा डाव दिसतोय तुमचा. पण साहेब, मी यापूर्वी तुम्हाला या गावात कधी पाहिलं नाही."
तो म्हणाला," मीच तो जादूगर."
नरक
त्यानं आपल्या मित्राला विचारलं," मैत्रिणीखातर तू सिगरेट, दारू आणि मांस-मच्छी सारं काही सोडलंस ना, मग तिच्याशी लग्न का करत नाहीस?"
मित्र म्हणाला," मी खूप विचार केला, मोठ्या मुश्किलीने जिंदगी सुधारली आहे, आता पुन्हा नरकात पडून काय फायदा?"
लग्न
"माझे बाबा म्हणत, बेटा, आपल्या जिंदगानीत असं एकादं काम करावं, जे आपल्या खानदानीत कुणी केलं नसेल." "मग तू काय केलंस?"
" मी लग्न केलं."
गोळी घालीन
एका अफगाणी सैनिकाला त्याच्या एका अधिकार्यानं प्रश्न केला," समज, एखाद्या तालिबान्यानं तुला पकडलं आणि म्हणाला की तुझी बायको माझ्या ताब्यात दे नाही तर बंदूक दे, तेव्हा तू काय करशील?'"माझी बायको देईन."
अधिकार्याला झटकाच बसला. म्हणाला," पण का?''
तो म्हणाला," माझ्या बायकोला घेऊन चालला की त्याला गोळी घालून ठार करीन."
उपवास
लग्नानंतरच्या काही दिवसानंतर एके सकाळी ती नवर्याला म्हणाली," संध्याकाळी येताना एक किलो सफरचंद, एक किलो द्राक्षे, अर्धाडझन केळी, एक किलो संत्री आणि एक नारळ घेऊन या."त्यानं विचारलं," का काही खास बेत?"
ती म्हणाली," उद्या माझा उपवास आहे."
डोकं
तो म्हणाला," तू नेहमी म्हणतेस ना की पुरुषांना डोकंच नसतं. हे बघ, पेपरात काय लिहलंय- पुरुषमंडळींचं डोकं स्त्रियांपेक्षा अधिक चालतं."बायको म्हणली," तुम्ही अजूनसुद्धा तुमचं डोकं चालवत नाही आहात. पेपरमधलं वाचून बोलता आहात." ..
No comments:
Post a Comment