ती कृष्णवर्णीय होती,पण सुपरमॉडल बनली. पण तिला अफाट
यशाबरोबरच तितकेच दु:खही मिळाले. तिचं नाव
आहे, नाओमी कँपबेल. एक सुपर मॉडेल,
अभिनेत्री! तिने अपार मेहनत घेऊन आपली प्रतिभा
सिद्ध केली. कृष्णवर्णीय असल्याचा फटका, टीका-टिपणी यांना सामोरे जातानाच त्यांच्या विरोधात आवाज
उठवत राहिली. यशाच्या शिखरावर असतानादेखील तिचे पाय जमिनीवरच
आहेत. ती आजही आफ्रिका आणि ब्राझीलमधल्या कृष्णवर्णीय मुले आणि
गरीब महिलांसाठी काम करीत आहे. या तिच्या समाजकार्याबद्दल तिला
अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
तिचे बालपणीचे आयुष्य दु:खमय आहे. ती आईच्या गर्भात असतानाच
तिचे वडील तिच्या आईला सोडून गेले.तिच्या जन्म प्रमाणपत्रात वडिलांचा
कॉलम रिकामा होता. आईने एकटीने तिचा सांभाळ केला. तिच्या मुलीच्या नावापुढे तिच्या जैविक बापाचे नाव लावले जावू नये,
अशी तिच्या आईची इच्छा होती. नाओमीने तिच्या इच्छेला
मान दिला. कँपबेल हे आडनाव तिच्या सावत्र बापाकडून मिळाले.
आई डान्सर होती. तिला कार्यक्रमासाठी सतत बाहेर
जावे लागायचे. ती ज्या ज्या वेळेला बाहेर जायची, त्या त्या ती नाओमीला तिच्या नातेवाईकांकडे सोडून जायची. आई सतत आपल्याजवळ असावी, असे तिला वाटायचे.
पाच वर्षांची असताना ती लंडनमधल्या बार्बरा
स्पीक स्टेज स्कूलमध्ये शिकू लागली. शाळा
खूप लांब होती. तिचे घर दक्षिण लंडनच्या स्टॉकवेलमध्ये होते,
तर शाळा पश्चिम लंडनमध्ये! शाळेला पोहचण्यासाठी तिला पहिल्यांदा बस आणि नंतर दोन ट्रेन बदलून जावे लागायचे.
आई डान्सर असल्या कारणाने तिला लवकरच मनोरंजन जगतामध्ये काम करण्याची
संधी मिळाली. नओमी शाळा शिकत असतानाच म्युझिक व्हिडिओमध्ये काम
करू लागली. प्रसिद्ध रॉक स्टार बॉब मारलेसोबतचा तिचा इज दिस लव
हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला. ती त्यावेळेला फक्त सात वर्षांची
होती आणि बॉब मारले कोण होती आणि त्याची पात्रता काय होती, याची
काहीच माहिती तिला नव्हती. कारण ते कळण्याइतके तिचे वयदेखील नव्हते.
तेरा वर्षांची असताना तिने पहिला फॅशन
शो पाहिला. तिच्या आईचा त्यात सहभाग होता.
आईला स्टेजवर कॅटवॉक करताना ती फारच रोमांचित झाली होती. पण त्यावेळेला तिने विचारदेखील केला नव्हता की, आपण एक
दिवस सुपर मॉडल बनू. आईची इच्छा होती, तिने
अभ्यासाकडे लक्षकेंद्रित करावे आणि मोठी झाल्यावर दुसरा कोणता तरी पेशा स्वीकारावा.
एक दिवस वेगळेच घडले. तो एप्रिलचा महिना होता. शाळा सुटल्यानंतर
ती मैत्रिणींसोबत रस्त्यावरून दंगामस्ती करत घरी परतत होती. शाळेच्या
युनिफॉर्ममध्ये असलेल्या नाओमीजवळ अचानक एक महिला आली आणि तिने विचारले, मॉडलिंग करणार का? काय उत्तर द्यावं,ते तिला समजलंच नाही. तिने घरी आल्यावर आईला सांगितले.
आई म्हणाली,मन लावून अभ्यास कर.मॉडलिंग करण्याचं हे वय नाही.
त्यावेळेला नाओमीने आईचे ऐकले,पण दुसर्यादिवशी शाळेला गेल्यावर
आणखीन तिचे मन बदलले. ती मॉडलिंगचाच विचार करू लागली.
मग एक दिवस आईला काही न सांगता ती एका फॅशन कंपनीच्या ऑफिसमध्ये गेली.
फोटो शूट झाले आणि तिची निवड झाली. तिच्या आईला
ही गोष्ट कळली. ती खूप नाराज झाली,पण तिने
काम करायला मनाईही केली नाही.ती म्हणाली,मॉडलिंग कर,पण याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही,याची काळजी घे. नाओमीने तिला खात्री दिली की,
अभ्यासाच्याबाबतीत तडजोड नाही.
तीन महिन्यानंतर एका मोठ्या कंपनीने
तिला साईन केले. लवकरच तिची मिडियामध्ये चर्चा होऊ
लागली.16 व्या वर्षीच तिला फ्रान्सच्या एका फॅशन शोमध्ये सहभाग
घेण्याची संधी मिळाली. बघता बघता फॅशनच्या जगात सावळ्या रंगाच्या
या सुंदर मॉडलने आपले नाव कमावले. तिला कित्येक मोठ्या फॅशन ब्रांडसोबत
काम करण्याची संधी मिळाली. असे यश मिळत असतानाच तिला कृष्णवर्णीय
म्हणून हेटाळणीचा दंशदेखील सहन करावा लागला. मेकअप रूमध्ये वंशविद्वेष
टीकांना सामोरे जावे लागले.काही लोक समोर बोलायचे तर काही मागे.
एकदा तर एका एका मेकअप आर्टिस्टने हे सांगून तिचा मेकअप करण्यास नकार
दिला की, तिच्या त्वचेवर कोणत्या प्रकारचे फौंडेशनचा वापर करू,
हेच समजेनासे झाले आहे. तिच्या केसांबाबतही असेच
प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे
तिला स्वत:ला मेकअपचे साहित्य सोबत घेऊन जावे लागायचे.
कारण स्टायलिस्ट तिचा मेकअप करायला कचरायचे. कृष्णवर्णीय
मॉडलला सजवण्याचा अनुभव नाही, असे कारण पुढे करायचे. मात्र श्वेत मॉडलच्याबाबतीत त्यांची वृत्ती काही वेगळीच
होती.
अनेक अडचणी असतानादेखील नाओमीने सिद्ध
करून दाखवले की, स्टाइलच्याबाबतीत ती गोर्या मुलींपेक्षा कुठेच मागे नाही. 18 वर्षांच्या वयात
वोग या नियतकालिकेच्या मुखपृष्ठावर झळकणारी ती पहिली कृष्णवर्णीय मॉडल बनली.
नंट्अऋा टाइमच्या मुखपृष्ठावरही झळकली. आणि लवकरच
ती सुपर मॉडल बनली. तिने म्युझिक व्हिडिओ आणि अभिनयातही हात आजमावला
आणि त्यातही ती यशस्वी झाली. तिचा लव एंड टियर्स व्हिडिओ अल्बम
खूप गाजला. 2013 मध्ये तिने टीव्हीवर तिचा रियालिटी शो द फेस
सुरू केला. 2015 मध्ये एंपायर या हिट अमेरिकी नाटकातदेखील दिसली.
प्रसिद्धी आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतानादेखील तिने आपले गरिबीचे
दिवस आणि कृष्णवर्णीय समाजाचे दु:ख विसरली नाही. तिने आफ्रिकेतील मुले आणि ब्राझीलमधल्या गरीब महिलांच्या विकासासाठी काम केले.
2007 आणि 2010 मध्ये तिला सामाजिक कार्यासाठी अनेक
सन्मान मिळाले आहेत.
तिने 2013 मध्ये काही हाइ प्रोफाइल फॅशन डिझाइनरांच्या विरोधात आवाज उठवला, जे कृष्णवर्णीय मॉडल लोकांना आपल्या शोमध्ये घ्यायला कचरायचे. ती सुपर मॉडल जरी असली तरी तिला गोर्या मॉडलपेक्षा कमी
पैसे मिळायचे. सौंदर्य प्रसाधन कंपन्यादेखील त्यांच्याबाबतीत
भेदभाव करत आहेत. पण तिचा लढा त्यांच्याविरोधात सुरूच राहणार
आहे.
No comments:
Post a Comment