पांडू आणि सोपान एका छोट्याशा गावात
राहात होते. दोघेही शेतकरी होते. एके दिवशी पांडूने पेपरात वाचले की,मध्यप्रदेशातल्या
एका शेतकर्याने पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा
शोध लावला आहे. त्याने त्या तंत्रज्ञानावर भरघोस उत्पन्न घेतल्याची
बातमीही त्यात होती. पांडूने विचार केला, जर मलाही असे तंत्रज्ञान मिळाले तर मीदेखील चांगले उत्पादन घेऊ शकतो.
पांडूने सोपानला मध्यप्रदेशला जायसाठी तयार केले. दोघेही एक चार दिवसाची सवड काढून निघाले. रेल्वेत त्यांना
एक माणूस भेटला. तो बर्याचदा त्या प्रगत
शेतकर्याच्या गावी गेला होता. तो बोलण्यात
वाकबगार होता. पांडू गुपचूप आपल्या सीटवर जाऊन झोपला.
पण सोपान वेळ दवडण्यासाठी त्या माणसाशी गप्पा मारत राहिला. त्या माणसाने आपले काही अनुभव सोपानला सांगितले.
दुसर्यादिवशी सोपान पांडूला परत जाण्याविषयी आग्रह धरू लागला.
मात्र पांडूने त्याच्या बोलण्याकडे कानाडोळा केला. तो म्हणाला, अरे, आपण इथवर आलो
आहोत तर त्याला भेटूनच जाऊ. स्टेशनवर पोहचल्यावर दोघेही रेल्वेतून
उतरले,पण सोपान त्याच्यासोबत यायला तयार झाला नाही. त्याने आपण इथेच थांबणार असल्याचे सांगितले. शेवटी एकटाच
पांडू त्या शेतकर्याला भेटायला गेला. भेट
झाली.चर्चा झाली. अनुभवांचे अदानप्रदान
झाले आणि पांडू माघारी परतला. स्टेशनवरून दोघेही एकत्र परत आपल्या
गावी आले.
पुढच्या वर्षी पीक काढणीला आले. सोपानने पांडूने जोमदार आलेले पीक पाहून चकीत झाला.
रास केली तेव्हा गतवर्षापेक्षा धनधान्य दुप्पट झाले. सोपानने न राहून एक दिवस विचारले, काय जादू केलीस रे?
यावर पांडू म्हणाला, त्या मध्य प्रदेशातल्या शेतकर्याचे तंत्रज्ञान वापरले आणि भरघोस पीक घेतले. तंत्रज्ञान
माझ्या रानात यशस्वी झाले. पांडू पुढे म्हणाला, सगळ्यांचा अनुभव एकसारखा नसतो. पण आपण नेहमी दुसर्याचा अनुभव आपला समजून वागत असतो. आणि अगदी तू तसेच केलेस.
आपण अनेक लोकांना भेट असतो.त्या लोकांच्या बोलण्याचा
प्रभाव आपल्यावर पडत असतो. पण शेवटी आपण सत्य काय आहे,
याचा शोध घेतला पाहिजे. अनुभव घेतल्याशिवाय खरी
परिस्थिती काय आहे, हे समजत नाही. या सगळ्या
गोष्टी तुला मी परत येताना सांगणार होतो. पण तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता. तुझ्यावर त्या रेल्वेतल्या माणसाच्या
बोलण्याचा प्रभाव पडला होता. आणि माझ्याकडे सिद्ध करण्यासारखे
काही नव्हते.
बोध-प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि अनुभव वेगळा असतो.
No comments:
Post a Comment