Wednesday, May 2, 2018

हसत जगावे


फाशी 

शिपाई: चल बाबा, तुझ्या फाशीची वेळ झालीय.
कैदी: पण मला तर फाशी वीस दिवसांनी मिळणार आहे ना?
शिपाई: जेलर साहेब म्हणत होते की, तू त्यांच्या गावचा आहेस,म्हणून तुझं काम पहिल्यांदा घेतलं.

भाजी 
शिक्षिका :  अरे अमोल, जीवनात असं काही तरी काम करून दाखव, जे सगळ्यांपेक्षा वेगळं असायला हवं.
अमोल: बाई, ज्या दिवशी मी काही तरी जबरदस्त आणि मोठे काम करावे म्हणतो, त्या दिवशी नेमके आई  बाजारात जाऊन भाजी आणायला सांगते.

मोटर
मुलगा शहरात शिकून गावाकडे आला.
वडील: रमेश, काय करतोयस?
रमेश:काही नाही बाबा, आंघोळीला चाललोय.
वडील:अरे, तसे नव्हं! पुढं काय करायचं  ठरवलं आहेस?
रमेश: काही नाही, ही बादली भरली की,मोटर बंद करणार?

कर्ज 
एका बँकेच्या बाहेर एक बोर्ड लावला होता." इथे अधिक काही न विचारता पाहिजे तेवढे कर्ज दिले जाईल.पण कर्ज घेणाऱ्या माणसाचे वय 85 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे. आणि त्याने त्याच्या सोबत त्याच्या आई-वडिलांना आणणे आवश्यक आहे.

पंक्चर 
सोनू सायकलवरून बाजारात निघाला होता. अचानक त्याच्या सायकलचे मागचे चाक पंक्चर झाले.सायकल घेऊन तो पंक्चरवाल्याकडे गेला.
पंक्चरवाला: वीस रुपये लागतील.
सोनू: मी डिझिटल पेमेंट केल्यावर मला कॅशबॅक मिळेल का?
पंक्चरवाला: हो मिळेल की, पुढच्या चाकाचीदेखील हवा काढली जाईल.

क्रिकेट
अजय: विज्या, क्रिकेट खेळायला येतोयस का?

विजय:अरे, पहिल्यांदा मला,माझ्या आजोबांची सायकल दुरुस्त करून द्यायची आहे.
अजय: या गोष्टीवरून एक शिकवण लक्षात घे. आयुष्यात आपण असे काम करायचे की, लोकांनी म्हटले पाहिजे की, राहू दे, मी स्वतः करीन.

फेसबूक
मार्क झुकरबर्ग हा जगातला असा एकमेव माणूस आहे,ज्याला त्याची आई म्हणते,बाळा, टाईमपास करायचे सोडून दे आणि फेसबूककडे लक्ष दे.

मेहनत
प्रत्येक डायबटिज रुग्णाने मोठी मेहनत करण्यापासून दूर राहिले पाहिजे. कारण मेहनतीचे  फळ शेवटी गोड असते.

No comments:

Post a Comment