अलिकडे पाण्याचा आणि रासायनिक
खतांचा अतिवापर वाढला आहे. त्यातच सेंद्रिय खतांचा विसर पडत चालल्यामुळे पिकांसाठी
महत्त्वाचा घटक असलेल्या जमिनी पानथळ आणि क्षारयुक्त बनल्या असून त्यामुळे
जमिनीच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वी सेंद्रीय
पदार्थांचा शेतात सर्रास वापर व्हायचा. साहजिकच त्यामुळे जमिनीचा पोत राखला जायचा.
मात्र अन्नधान्याची जसजशी गरज वाढू लागली,तसतशी
पाणी आणि रासायनिक खतांचा मात्रा वाढू लागली. कुपनलिका,कालवे,विहिरी यांची संख्या वाढू लागली आणि सिंचनाचे प्रमाण वाढले. जमिनी पाणीदार
होऊ लागल्या. अधिक पीक उत्पादन घेण्याच्या नावाखाली एक पीक पद्धत अस्तित्वात आली.
एकुणच जमिनीची कार्यक्षमता धोक्यात आली असून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत
चालली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेचे मोठे संकट उभारण्याची शक्यता निर्माण झाली
आहे.
सध्याच्या परिस्थिती जमिनीच्या
आरोग्याची समस्या मोठी जटील समस्या बनत चालली आहे. नदीकाठच्या,कालव्याने पाणी पुरवल्या जात असलेल्या जमिनी क्षारयुक्त
झाल्या आहेत. इथल्या जमिनीत पिकेच येत नाहीत, अशी अवस्था
निर्माण झाली आहे. अशा जमिनीची सुपिकता वाढवायची असेल तर जमिनीच्या सुपिकतेवर
परिणाम करणार्या सर्व गोष्टींवर कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्रमाणे
सुपिक जमिनीतही पाण्याची उपलब्धता व रासायनिक खतांचा संतुलित वापर जेवढा महत्वाचा
आहे, तितकाच नव्हे त्याहून अधिक सेंद्रिय पदार्थांचा व
सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे.बाजारात मिळणारी सेंद्रिय खते, भुसंवर्धके, तसेच सुक्ष्म अन्न द्रव्य खते सेंद्रिय
खतांना पर्याय ठरू शकत नाहीत.त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर ही सध्याला
काळाची गरज बनली आहे. सेंद्रिय पदार्थाचे विघटन हे काही महत्वाच्या बाबींवर आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांचा अथवा खतांचा प्रकार कुजविणार्या
जिवाणुंचे सख्या ,पाणी व तापमान यांचा समावेश होतो. ज्या
प्रमाणे सेंद्रिय पदार्थांचे जैविक रित्या विघटन होत असते. त्याचप्रमाणे रासायनिक
रित्या हि त्यांचे विघटन होते. जसे -जसे तापमान वाढत जाते. तसा तसा सेंद्रिय
पदार्थांच्या विघटनाचा वेग वाढतो. बर्याच वेळा सेंद्रिय खते नांगरणी नंतर वापरली
जातात. त्यामुळे ती जमिनीच्या पृष्ठभागावर तशीच पडुन राहिल्याने त्याचे लवकर विघटन
होते.व पिकासाठी हवा तेवढा उपयोग होत नाही. ही परिस्थिती सेंद्रिय खते माती आड न
ढकलल्याने उदभवते.
आपल्याला विक्रमी उत्पादन
घ्यायचे असेल तर जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी एक टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्याची
गरज आहे. सेंद्रिय खतांमध्ये वनस्पती व प्राणी यांच्या अवषेशा पासुन तयार झालेल्या
सर्व प्रकारच्या खतांचा समावेश होतो. सेंद्रिय खतांमध्ये भरखते व जोडखते, असे योग्य भाग करतात, भरखतांमध्ये
रासायनिक अन्न द्रव्यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात वापरावी
लागतात. ही खते पिकास सावकाशपणे ,परंतु दिर्घ कालापर्यंत
उपयोगी ठरतात. यामुळे जमिनीची जडण घडण ,पोत, जलधारणा,शक्ती, व विद्युत
वाहकता वाढते. या खतांमध्ये शेणखत , लेंडीखत, पोल्ट्रीखत, इ.चा समावेश होतो. तर जोड खतांमध्ये
पोषण अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात वापरावी
लागतात .यामध्ये सर्व खतांची पेंडी,खतांची भुकटी,हाडांचा चुरा, मासळी, खत यांचा
समावेश होतो.
ऊस जास्त पैसा मिळवून देणारे
पीक आहे. मात्र या पिकाला पाण्याची अधिक गरज आहे. पाण्याची उपलब्धता जशी झाली तशी
ओलिता खालील क्षेत्रात वाढ झाली.व्यापारी असलेल्या या ऊसाचे क्षेत्र वाढले.
दरम्यानच्या काळात सेंद्रिय खतांच्या किंमती वाढल्याने खतांच्या उपलब्धतेवर
मोठा प्रश्न उभा राहिला. अशा परिस्थितीत शेतातील वाया जाणार्या सेंद्रिय
पदार्थांचा (काडी कचरा) सेंद्रिय खतासाठी वापर वाढवणे गरजेचे आहे. जमीनीतील
उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतून पिकांनी घेतलेली अन्नद्रव्ये परत करणे
गरजेचे आहे.त्यामुळे जमिनीतून निघालेला सेंद्रिय भाग शक्य तितका जमिनीत परत करणे
हे उत्तम शेतीचे महत्वाचे अंग आहे. सेंद्रिय पदार्थांमध्ये पालापाचोळा,उसाचे पाचट,साखर कारखान्यातील प्रेसमड
इ.न कुजवता शेतात वापरणे शक्य आहे. असे न कुजलेले पदार्थ शेतात वापरल्या मुळे
नत्राची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून नत्रासह स्फुरद युक्त खतांची जास्त
मात्रा पिकांना द्यावी लागते. म्हणुन सेंद्रियपदार्थ कुजविण्यासाठी एकटन वाढलेल्या
सेंद्रिय पदार्था साठी 10 किलो युरिया,10 किलो सिंगल सुपरफोस्फेट, व 1
किलो कुविणारे जिवाणु वापरावेत ह4 सेंद्रिय पदार्थ माती आड
केल्यास कुजविण्याची क्रिया लवकर होते. न कुजलेले पदार्थ जमिनीच्या पृष्ठभागावर
जरी राहिले तरी त्यापासुन नुकसान न होता फायदा होतो .इतकेच नव्हे तर त्याच्या
कुजण्याचा वेग कमी होतो. अशा पृष्ठभागावर राहिलेल्या सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन
म्हणून उपयोग होतो.याचा परिणाम असा होतो की, जमिनीतून
पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो त्यामुळे पिकांना उन्हाळ्यात पाण्याचा ताण
बसला तरी उत्पादनात घट येत नाही. तसेच सेंद्रिय पदार्थ कुजत असतांना त्यातील कर्ब
प्रणित वायु बाहेर पडत असतो. वनस्पतीला या वायुचा उपयोग प्रकाश संस्लेशणात क्रियेत
होतो. त्यामुळे पानांमध्ये पिष्टमय पदार्थ तयार होण्याचा वेग वाढतो आणि पर्यायाने
पिकांची जोमदार वाढ होते.
ऊसाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे
असल्यास शेतातील कर्ब प्रणीत वायुचेप्रमाण वाढविले पाहिजे. त्यासाठी न कुजलेल्या
सेंद्रीय पदार्थांचा वापर महत्वाचा ठरतो. ऊसाचे उत्पादन घटण्या मागे जी अनेक कारणे
आहेत त्यापैकी जमिनीचे बिघडलेले आरोग्य व खोडवा पिकाचे कमी उत्पादन ही प्रमुख
कारणे आहेत. उसाच्या उत्पादनाबरोबर मोठ्या उसाचे अवशेष मिळतात .सर्वसाधारणपणे
हेक्टरी8 ते 10 टन पाचट
व 4 ते 5 टन खोडकि मिळते, उस तोडणी नंतर शेतातील सर्व पाचट शेतकरी जाळून टाकतात. उसाच्या पाचटात 0.5नत्र 0.2टक्के स्फुरद, 0.7 ते 1टक्कापर्यंत पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रीय कर्ब असते. तर उसाच्या बोडकित 0.4टक्के
नत्र,0.2टक्के स्फुरद, व 0.2 टक्के पालाश असते. असे पाचत व खोडकी जाळल्यास सेंद्रीय कर्बाचा पुर्णता
नाश होतो. पाचटातील नत्र व स्फुरदचा 90टक्के पेक्षा अधिक भाग
जळून जातो. क्वळ पालाश शिल्लक राहते. एक हेक्टर क्षेत्रातून अनुक्रमे 50 किलो नत्र ,20 किलो स्फुरद , 75 ते 100 किलो पालाश तर 3 ते 4
हजार किलो सेंद्रीय कर्ब तर खोडकितून 50 किलो
नत्र ,20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश,
जमिनीत घातले जावे.
No comments:
Post a Comment