Wednesday, August 2, 2017

काम करायचं वय

काम करायचं एक वय असतं, असं म्हटलं जातं.पण हे एक असं खोटं आहे,जे खर्यासारखं आपल्या मनात घट्ट बसलं आहे.आपण चाळिशी पार करता करता लक्षात येतं की, अरे आपल्याला काम तर करावं लागणारच आहे. संपलं तर काहीच नाही. पुढ्यात अजून बरंच काही वाढून ठेवलेलं आहे. मात्र काही माणसं वयापुढं सपशेल हार मानून बसलेली असतात. आता काय कितीसं राहिलं आहे. पण काही माणसे वयाला अगदी आकड्यासारखं जगतात. कामाविषयी इतके उत्साही असतात की, वयाकडे त्यांचं लक्षच नसतं. मॅककोर्ट असंच करायचे, त्यांनी अनेक प्रकारची कामं केली. तार पोहचवण्यापासून शाळेत शिकवण्यापर्यंत. मग त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी एक पुस्तक लिहिले. एंगेलाज एशेज. या पुस्तकाची इतकी चर्चा झाली की, त्याच्या तब्बल 50 लाख प्रती खपल्या. त्यांना साहित्याचा पुलित्जर पुरस्कारदेखील मिळाला.
मॅककोर्ट म्हणतात- माझ्या शेवटच्या दिवशीदेखील जो सूर्य उगवेल,तो माझ्याकडून तितकीच आशा करेल, जो त्याने माझ्या वयाच्या पहिल्यादिवशी ठेवली होती. मग मी का त्याची आशा तोडू?
वयाच्याबाबतीत आपले जे विचार आहेत, त्याकडे जॉर्ज बर्नाड शॉ या गोष्टीकडे कटाक्ष टाकतात की, आपण यासाठी खेळायचं सोडत नाही की, आपण म्हातारे होत जातो, तर आपण यासाठी म्हातारे होतो कारण, आपण खेळायचे सोडून देतो. आपण असे समजतो की, कोणतेही नवीन काम युवावस्थेतच सुरु करायला हवं, तर हेही मानायला हवं की, युवा कुठल्या वयाचं नाव नाही तर ते शक्तीचं नाव आहे. ज्यांनी आपल्या मन आणि आत्म्याच्या शक्तीला जागवळ आहे, तोच युवा आहे. जपानचे हिडकिची मियाजाकीसारखं. त्यांनी 42 सेकंदात ज्यावेळेला 100 मीटरची शर्यत पार करून विक्रम केला, तेव्हा त्यांना उसेन बोल्ट यानेदेखील सॅल्यूट केला. तेव्हा हिडकिची यांचे वय होते, 105. त्यांना पदक मिळालं तेव्हा ते अगदी लहान मुलासारखे उड्या मारत होते.


No comments:

Post a Comment