Friday, August 11, 2017

प्रदूषणमुक्त हरित शहरांची संकल्पना

     आपल्या देशातल्या दिल्लीसह अनेक प्रमुख शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडली आहेइतकेच नव्हे तर सांगली,कोल्हापूरसारखी छोटी शहरेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेतइथल्या लोकांचे जगणे मुश्किल बनत चालले आहे.  त्यामुळे या गोष्टीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहेया अनुषंगाने हरित शहरांच्या (ग्रीन सिटीसंकल्पनेचा विचार होण्याची गरज आहेहरित शहर म्हणजे पर्यावरणाला अनुकूल असे शहरशहराचे आकारमानलोकसंख्या यांनुसार शहर आणि परिसरातील झाडांची संख्या असणे म्हणजे हरित शहर किंवा ‘गीन सिटी’ होयअशा शहरांमध्ये लोकसंख्या आणि वाहने तसेच कार्बन उत्सर्जन याच्या प्रमाणात प्रदूषणावर उतरा ठरणारी झाडांची लागवड करणे अपेक्षित असतेलोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या असेल तर त्या शहरांमध्ये राहणार्या नागरिकांना स्वच्छ हवेचा आनंद घेता येऊ शकेलस्वच्छ हवा नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम टाळता येऊ शकतातवृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असणे म्हणजे पक्षीकीटकछोटे प्राणी यांचीही संख्या वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासारखे आहे.

      एखाद्या शहरावर झाडांच्या रूपाने हिरवे आच्छादन असेल तर तेथे पर्यावरणाचे संतुलन साधले जाते आणि जैववैविधतेचे संरक्षणही केले जाते.  देशातील सध्याची शहरे पाहिली तर या शहरांचा श्वास वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे आणि वाहनातून बाहेर पडणार्या धुरामुळे कोंडला गेला आहेवाहनांच्या प्रचंड संख्येमुळे आणि वाहनांमधून तसेच अन्य मार्गाने होणार्या कार्बन उत्सर्जनामुळे शहरांमध्ये प्राणवायूचे भरपूर प्रमाण असलेली शुद्ध हवा मिळणे मुश्किल झाले आहेगेल्या काही वर्षांत उद्योगीकरणाबरोबरच शहरीकरणाचा वेगही झपाट्याने वाढलाशहराने आपल्या आसपासची छोटी खेडी गिळंकृत करणे चालू केले आहेअनेक शहरांच्या आसपास पूर्वी खेडी होती असे आता सांगावे लागते आहेया खेड्यांमध्ये टोलेजंग इमारतींची शेती केली जाऊ लागली आहेशहरांभोवतींच्या खेड्यांमधील जमिनीला सोन्यापेक्षाही अधिक भाव आला आहे तो शहरीकरणाच्या अफाट वेगामुळेशहरांमधील मोकळी मैदानेबागाशहराबाहेरच्या देवरायांवर सर्रास कुर्हाड चालविली जाऊ लागली आहेरस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हमरस्त्यांवरील वडाच्या शेकडो झाडांची कत्तल होत आहेशहरांमध्ये पावलो पावली भौतिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्यामुळे खेड्यातून शहरात स्थलांतरित होणार्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे
     एकदा शहरात आलेला खेड्यातला माणूस पुन्हा आपल्या गावी जात नाहीपरिणामी शहरांमध्ये बेकायदा झोपडपट्ट्याअवैध वसाहती वाढू लागल्या आहेतशहराच्या वाढत्या लोकसंख्येची निवासाची गरज पूर्ण करण्यासाठी आसपासच्या खेड्यांमधील जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत.  शहर आणि परिसरामधील झाडांची संख्या वेगाने कमी होत असल्यामुळे पर्यावरणाचे असंतुलन निर्माण झाले आहेशहरांच्या अनैसर्गिक वाढीमध्ये पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहेशहरांच्या वाढीला कोणी हरकत घेणार नाहीमात्र शहरे वाढताना त्या शहरांमधील आणि शहरांभोवतालच्या भागात पर्याप्त प्रमाणात झाडांची संख्या असली पाहिजे याकडे सत्ताधारी आणि प्रशासन कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीया स्थिती विरोधात मूठभर पर्यावरणवादी आपला क्षीण आवाज उठवताना दिसतातमात्र या आवाजाची दखल घेण्याचे सौजन्य शहरांचा कारभार सांभाळणार्या महापालिका दाखवत नाहीत आणि राज्य सरकारही दाखवत नाहीतत्यांच्या दृष्टीने शहराचे पर्यावरणशहरांमधील झाडांची संख्याशुद्ध हवेचा पुरवठा करणारी झाडे लावणे हे विषय अत्यंत गौण आहेत.
      शहरांच्या अक्राळविक्राळ वाढीमुळे वातावरणात वाढलेले कार्बनचे प्रमाण पाहताशहरांमध्ये ग्रीन बेल्टची निर्मिती करणे अत्यावश्यक होऊन बसले आहे.  शहरांच्या वाढीमध्ये उद्योगधंद्यांचाही हातभार लागतो आहेमाहिती तंत्रज्ञानावर आधारित अनेक उद्योग शहरांमध्ये येत आहेतउद्योगधंदे,कारखाने यासाठी शहरांमधील विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहेशहरांमध्ये ज्या इमारती बांधल्या जातात त्या इमारती बांधताना प्रकाशाची व्यवस्थाव्हेन्टिलेशनतापमान नियंत्रण या गोष्टींचा विचारच केला जात नाहीत्यामुळे अशा इमारतींमध्ये प्रकाशहवा यासाठी 24 तास विजेचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहेकारखानेबँकासरकारी कार्यालयेखाजगी कंपन्यांची कार्यालयेआयटी कंपन्या या ठिकाणी एअरकंडीशनरचा वापर मर्यादेबाहेर केला जात आहेविजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने शहरांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण प्रचंड झाले आहेया सार्याचा एकत्रित परिणाम शहरांमधील पर्यावरणचा समतोल ढासळण्यात झाला आहेयाचे दुष्परिणाम शहरांमध्ये राहणार्यांना भोगावे लागत आहेतहे टाळण्यासाठी शहरात झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड महत्त्वाची आहेशाळामहापालिका,बँकाखासगी उद्योगकारखानेसरकारी कार्यालये या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावली जायला हवीत आणि ती वाढवली आणि संगोपली जायला हवीत.नागरिकांनीही आपल्या राहत्या घरासमोर,परसबागेत हमखास झाडे लावून हरित शहरासाठी पावले उचलायला हवीत.


No comments:

Post a Comment