एक चोर एका साधू महाराजांकडे नेहमी जा - ये करत असे. अर्थात त्यामागे एक कारण होते. त्याला परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावयाचे होते. ज्या ज्या वेळी साधूंकडे येई, त्या त्या वेळी तो महाराजांना नम्र विनंती करी की, ' महाराज, मला परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडवा.' साधू मात्र काहीबाही सांगून त्याची नेहमी बोळवण करीत.
एक दिवस मात्र चोर हट्टालाच पेटला. परमेश्वराची भेट घालून दिल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा आपला निर्धार त्याने महाराजांकडे व्यक्त केला. साधूंनाही आता कुठले बहाणे चालणार नाहीत, याची खात्री पटली. ते आपल्या झोपडीतून बाहेर येत चोराला म्हणाले," तो समोरचा उंच डोंगर दिसतो का तुला ? जर तू माझ्यासोबत डोक्यावर सहा मोठे दगड घेऊन त्या डोंगरमाथ्यापर्यंत येऊ शकलास तर तुला नक्की परमेश्वराचे दर्शन घडेल.
चोर आनंदाने तयार झाला. साधूने त्याच्या डोक्यावर सहा मोठे दगड ठेवले. साधू महाराज पुढे पुढे चालू लागले नी चोर त्यांच्या मागे मागे चालू लागला. थोडे अंतर चालून गेल्यावर चोराला धाप लागली. त्याचा श्वास फुलू लागला. दम लागला. तो साधू महाराजांना म्हणाला," महाराज, माझ्या डोक्यावर काहीसं जादाच ओझं आहे. इतकं ओझं घेऊन डोंगरमाथा चढणं कठीण जाईल. एक दगड काढलात तर बरे होईल."
साधू महाराजांनी चोराच्या डोक्यावरचा एक दगड उतरवला. चोर पुन्हा चालू लागला. पण काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा त्याला त्रास व्हायला लागला. पाय लटपटायला लागले. त्याच्या डोक्यावरून आणखी एक दगड उतरवावा लागला. डोंगराची चढण चढताना एकेक दगड त्याच्या डोक्यावरून उतरवण्यात आले.असे करता करता त्याच्या डोक्यावरून सगळे दगड उतरवण्यात आले.
शेवटी दोघे डोंगरमाथ्यावर पोहोचले. तेव्हा त्याच्या डोक्यावर एकही दगड शिल्लक नव्हता. साधू महाराज म्हणाले," मित्रा, ज्या प्रकारे तू सहा दगड डोक्यावर घेऊन डोंगरमाथा चढण्यास असमर्थ ठरलास, त्याप्रकारे जो पर्यंत माणसांमधले काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर हे सहा मनोविकार दूर होत नाहीत, तोपर्यंत त्याला परमेश्वराचे दर्शन होणे मोठे कठीण आहे. मात्र सहा मनोविकार दूर झाल्यावर माणसाला आपोआप परमेश्वराची अनुभूती होईल. त्यासाठी या षडरिपुंचे दगड मनातून दूर लोटायला हवेत."

No comments:
Post a Comment