Tuesday, February 21, 2012

राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका सहा महिन्यावर

    भारतीय राज्यघटनेच्या ६३ व्या कलमात नमूद केल्याप्रमाणे उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तींची निवड केली जाते. घटनेच्या कलम ६४ व ८९ (१) नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे पद प्रशासनाचे अंग असले तरीही राज्यसभेच्या अध्यक्षपदामुळे ते संसदेचेही अंग होते. त्यामुळे या पदावरील व्यक्ती दोन्ही कार्यकक्षांमध्ये काम करते.
     राष्ट्रपतीपद हे देशातले सर्वोच्च प्रशासकीय पद आहे. या पदावर येणारी व्यक्ती ही देशाची घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखली जाते. उपराष्ट्रपतीपद हे त्यानंतरचे २०१२ च्या ऑगस्ट महिन्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर लगेच उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणूक पार पडते. या लेखात आपल्याला उपराष्ट्रपतीपदाबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची आहे.
२६ जानेवारी १९५० रोजी भारत सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि पहिल्याच राष्ट्रपतीपदासाठी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड करण्यात आली. तब्बल १२ वर्षांचा म्हणजे दोन वेळा ते राष्ट्रपतीपदावर विराजमान होते. याच काळात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळली. त्यांना तर दोनवेळा उपराष्ट्रपतीपद आणि त्यानंतर एकदा राष्ट्रपतीपद उपभोगण्याची संधी मिळाली. एवढा प्रदीर्घ कालावधी आणि अशी दोन- दोनदा त्याच पदावर काम करण्याची संधी त्यानंतर कुणालाच लाभली नाही.
डॉ. झाकीर हुसेन, व्ही.व्ही. गिरी, आर. व्यंकटरमण आणि डॉ. शंकरद्याळ शर्मा यांना दोन्ही पदे उपभोगण्यास मिळाली. पण त्या दोन्ही पदावर ते एकेक वेळाच पदावर राहिले. डॉ. झाकीर हुसेन यांचे राष्ट्रपतीपदावर असतानाच निधन झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी झालेल्या निवडणुकीत हंगामी राष्ट्रपतीपदी असणारे गिरी विधिवत राष्ट्रपती बनले. त्यांच्यानंतर आलेले डॉ. फक्रुद्दिन अली अहमदसुद्धा पदावर असतानाच अल्लाला प्यार झाले. त्यामुळे अवघ्या तीन वर्षातच राष्ट्रपतीपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागली. नीलम संजीव रेड्डी हे त्या निवडणुकीत नाट्यमयरित्या निवडून आले.डॉ. राजेंद्रप्रसाद आणि राधाकृष्णन यांच्यानम्तर बिनविरोध निवडून येणारे तसे ते पहिलेच राष्ट्रपती. त्यांच्या पुढच्या ग्यानी झैलसिंग यांना राष्ट्रपती पदाचा पूर्ण कालावधी उपभोगण्यास मिळाला. व्यंकटरमण, शर्मा आणि नारायणन यांना त्यांच्यानंतर दोन्ही पदावर काम करण्याची संधी या मम्डळींना मिळाली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील या सध्याच्या बाराव्या राष्ट्रपती. येत्या ऑगस्ट महिन्यात तेराव्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे.
      याआधी सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, वराहगिरी व्यंकटगिरी, गोपालस्वरुप पाठक, बसप्पा दानप्पा जत्ती, महंमद हिदाययुल्ला, रामस्वामी व्यंकटरमण, शंकर दयाळ शर्मा, कोचेरिल रामन नारायणन, कृष्णकांत आणि भैरोसिंह शेखावत हे आतापर्यंतचे उपराष्ट्रपती.
     यातल्या सहा जणांना पुढे राष्ट्रपती पद भूषविण्याची संधी मिळाली. भैरोसिंह यांनी मोठ्या आत्मविश्वासाने निवडणूक लढविली पण त्यांना यश आले नाही. पराभव होताच त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजिनामा दिला. त्यामुळे त्यांच्या जागी के रहमान खान यांनी सूत्रे स्वीकारली. के. रहमान यांची नियुक्ती ही कार्यवाहक स्वरुपाचीच होती.
     उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक ही देशातील आमदार-  खासदारांनी मतदान करण्याची निवडणूक नव्हे. या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार असतो तो फक्त राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांना. यंदा हा अधिकार आहे तो राज्यसभेच्या २४५ आणि लोकसभेच्या ५४५ अशा एकूण ७९० सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवड्णुकीसाठी केल्या जाणार्‍या मतांचे मूल्य राज्यानुसार वेगवेगळे असते. परंतु, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मात्र ते एकच राहणार आहे. एकूण ७९० मतांपैकी निम्मी म्हणजे ३९५ मते ज्याला पडतील, तो उमदेवार पहिल्या पसंद्ती क्रमावर निवडून येईल.
     राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीकरिता कुणाही मतदाराला कुठल्याही राज्यातून मतदान करण्याची जी मुभा उपलब्ध असते, तशी ती उपराष्ट्रपतीपदासाठी असत नाही. संसद भवनातील निनिर्दिष्ट ठिकाणी जाऊनच मतदारांना मतदान करावे लागते. या दोन्ही निवडणुका ६७ साली एकदाच एकाचवेळेला झाल्या होत्या. राष्ट्रपतीपदासाठी कुठेही मतदान करण्याची सवलत उपभोगणार्‍या ६१ सदस्यांना त्या खेपेस उपराष्ट्रपतीपदासाठीचे मतदान करण्यासाठी तिसर्‍याच ठिकाणी जावे लागणार होते. ती तरतूद ठाऊक नसल्याने हे सर्वच्या सर्व ६१ सदस्य मतदानास मुकले, अपात्र ठरले. ७४ साली संसदेने एक नवा कायदा केला आणि ५२ च्या राष्ट्रपती- उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकविषयक कायद्यात महत्त्वाचे फेरबदल केले. उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरताना त्यावर किमान ५ संसद सदस्य प्रस्तावक म्हणून आणि ५ सदस्य अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करण्यास अनिवार्य करण्यात आले. शिवाय निवडणुकीसाठी अनामत रक्कम २५०० रुपये करण्यात आली. या निवडणुकीस, निवडणूक निकालास हरकत घ्यायची असल्यास ती केवळ सर्वोच्च न्यायालयात घेता येईल आणि किमान १० सदस्य मतदारांनी तशी मागणी केलेली असावी, असे ठरविण्यात आले.
     घटनेच्या कलम ६६( ३) अनुसार या पदाची निवडणूक लढविणार्‍या व्यक्तीने वयाची ३५ वर्षे पूर्ण केली असली पाहिजेत व ती राज्यसभेची सदस्य होण्यास पात्र असली पाहिजे. पाच वर्षाच्या कालावधीसाठी ही निवडणूक होत असते. उपराष्ट्रपतींना राजीनामा देता येतो, तसेच राज्यसभेत बहुमताने पारित केलेल्या व लोकसभेने मान्यता दिलेल्या ठरावने त्यांना या पदावरून दूरही करता येते.
यंदाच्या वर्षातील ही निवडणूक आता या पार्श्वभूमीवर होत आहे. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक हरल्यानम्तर उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने के. रहमान खान यांची त्या जागी हंगामी उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आताच्या उपराष्ट्रपती महमद हमीद अन्सारी यांची मुदत संपत आहे.
राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदासाठीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांची राष्ट्रपती व केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपराष्ट्रपतीपदासाठी नावे पुढे आली आहेत्.पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग येईल, असे बोलले जात आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकालाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपत आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती महंमद अन्सारी यांचीही मुदत संपत आहे.
यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी ए. के. अँथनी, लोकसभा अध्यक्षा मीराकुमार आणि सुशिलकुमार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र विद्यमान राष्ट्रपती महिला असल्याने मीराकुमार यांचा पत्ता कट झाला तर प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या असल्याने राज्याला संधी दिली गेल्याने सुशिलकुमार यांच्या नावाचीही चर्चा मागे पडली आहे, अशी चर्चा ऐकायला येत आहे. मात्र सुशिलकुमार यांचे नाव उपराष्ट्रपतीपदासाठी मात्र कायम राहिले आहे.
राहता राहिला प्रश्न तो ए.के.अँथनी यांचा. ते काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून नेहरू गांधी परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार प्राधान्याने सुरू आहे. मात्र हा सगळा मामला पाच राज्यातल्या निवडणुका पार पडल्यावर पुढे येणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असे सध्या तरी सांगण्यात आले आहे.

राष्ट्रपती कार्यकाळ
१) डॉ. राजेंद्रप्रसाद ( २६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२)
२) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ( १३ मे १९६२ते १३ मे १९६७)
३) डॉ. झाकीर हुसेन (१३ मे १९६७ ते ३ मे १९६९)
४) वराहगिरी वेंकटगिरी - कार्यवाहक ( ३ मे १९६९ ते २० जुलै १९६९)
५) महंमद हिदायतुल्ला - कार्यवाहक (२० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९)
६) वराहगिरी वेंकटगिरी (२४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४)
७) फक्रुद्दीन अली अहमद (२४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७)
८) बसप्पा दानप्पा जत्ती कार्यवाहक (२५ जुलै १९७७  ते २५ जुलै १९७७)
९) नीलम संजीव रेड्डी ( २५ जुलै १९७७  ते २५ जुलै १९८२)
१०) ग्यानी झैलसिंग (२५ जुलै १९८२  ते २५ जुलै १९८७)
११) रामस्वामी व्यंकटरामन (२५ जुलै १९८७  ते २५ जुलै १९९२)
१२) शंकरद्याळ शर्मा (२५ जुलै १९९२  ते २५ जुलै १९९७)
१३) कोचेदिल रामन नारायण्न (२५ जुलै १९९७  ते २५ जुलै २००२)
१४) एपीजे अब्दुल कलाम (२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७)
१५) प्रतिभाताई पाटील ( २५ जुलै २००७ पासून)
उपराष्ट्रपती कार्यकाल
१)डॉ. सर्वपल्ली राहाकृष्णन ( १३ मे १९५२ ते १२ मे १९६२)
२) डॉ. झाकीर हुसेन (१३ मे १९६२ ते १२ मे १९६७)
३) वराहगिरी वेंकटगिरी ( १३ मे १९६७ ते ३ मे १९६९)
४) गोपालस्वरुप पाठक (  ३१ ऑगस्ट १९६९ ते ३० ऑगस्ट १९७४)
५) बसप्पा दानप्पा जत्ती ( ३१ ऑगस्ट १९७४ ते ३० ऑगस्ट १९७९)
६) महमद हिदायतुल्ला ( ३१ ऑगस्ट १९७९ ते ३० ऑगस्ट १९८४)
७) रामस्वामी व्यंकटरामन ( ३१ ऑगस्ट १९८४ ते २७ जुलै १९८७)
८) शंकरद्याळ शर्मा ( ३ सप्टेंबर १९८७ ते २४ जुलै १९९२)
९) के.आर. नारायणन ( २१ ऑगस्ट १९९२ ते २४ जुलै १९९७ )
१०) कृष्णकांत ( २१ ऑगस्ट १९९७ ते २७ जुलै २००२)
११) भैरोसिंग शेखावत ( १९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७ )
१२) के रहमान खान कार्यवाहक (२१ जुलै २००७ ते २१ ऑगस्ट २००७)
१३) महमद हमीद अन्सारी ( २१ ऑगस्ट २००७ पासून) 

1 comment:

  1. तुमचा ब्लॉग किंवा तुमचे एक क्लिक तुम्हाला पैसे देतो का ? मला देतो..एक छदाम सुद्धा न गुंतवता..!!

    अधिक माहितीसाठी हे पहा.

    डिजीटल मराठी वाचनालय



    http://tinyurl.com/MARATHI-MONEY

    ReplyDelete