Sunday, September 12, 2021

मठ परंपरा भाग 1- चेन्नईतील बैरागी मठ


दक्षिण भारतीय राज्याच्या तामिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या  चेन्नई शहराच्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर बैरागी मठ आहे. हा वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आणि विश्वातील सर्वात प्राचीन असे धार्मिक केंद्र आहे.  या मठाची निर्मिती 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात चार वैष्णव पंथांपैकी रामानंदी पंथाचे एक महान संत बाबा लाल दास बैरागी यांनी केली होती.

बाबा लाल दास हे स्वामी रामानंदांच्या पाचव्या पिढीचे संत होते.  स्वामी रामानंद यांच्यानंतर अनंतानंद, कृष्णदास पायोहरी, चेतन दास आणि त्यांचे शिष्य बाबा लाल दास आले.  बाबा लाल दास यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील कसूरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या एका गावात झाला.  गुरु नानक यांचे चुलत भाऊ बाबा राम थमन हेही रामानंदी बैरागी पंथातील होते आणि बाबा लाल दास यांचा जन्म त्यांच्याच कुटुंबात झाला होता.

17 व्या शतकाच्या पूर्वार्धात बाबा लाल दास हे सनातन धर्माचे पूर्ण संत मानले जात होते.  अगदी शहाजहान आणि त्याचा मोठा मुलगा दारा शिकोहही बाबा लाल दासकडे येत असत.  बाबा लाल दास आणि दारा शिकोह यांच्यातील संभाषणावर आधारित दारा शिकोह यांचे 'मुकलम-ए-बाबा लाल ओ दारा शिकोह' हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे.  जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये या विषयावर दोन डझनहून अधिक पीएचडी पातळीचे संशोधन झाले आहे.

हे मंदिर 1600 मध्ये पूर्ण झाले.  बाबा लाल दास बैरागी यांनी 1604 साली पंजाबमधील अमृतसरपासून 50 किमी अंतरावर असलेल्या गुरदासपूर जिल्ह्यातील ध्यानपूर येथेही एक मठ बांधले आणि ते त्यांच्या शेवटच्या वेळेपर्यंत तेथेच राहिले.  इथेच त्याची समाधी देखील आहे.  पण बाबा लाल दास यांनी भारतात, सध्याचे पाकिस्तान, नंतर भारत आणि अफगाणिस्तान अशा अनेक ठिकाणी मठ आणि मंदिरे बांधली.

असे म्हटले जाते की बाबा लाल दास बराच काळ चेन्नईत राहत होते.  ते तिरुपती बालाजीचे भक्त होते आणि तिरुपतीतील हथीराम मठाचे संस्थापक भगवा बालाजी यांचे कट्टर भक्त बाबा हथीराम बैरागी यांच्याबद्दलही त्यांना नितांत प्रेम होते.  बाबा हथीराम बैरागी आणि बाबा लाल दास बैरागी हे दोघेही रामानंदी पंथाचे होते.

हथीराम यांचा जन्म राजस्थानातील नागपूर नावाच्या ठिकाणी झाला असला तरी, ते आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात पंजाब, हरियाणा या भागात बराच काळ वास्तव्यास राहिले.बाबा लाल दास चेन्नईमध्ये बराच काळ राहिले.  या मठात तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही ते करत असत.

मंदिराचे तीन भाग आहेत आणि त्यात वसवलेल्या पांढऱ्या संगमरवरी मूर्ती उत्तर भारतीय शैलीच्या आहेत.  मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे.  पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या सर्वात सुंदर मूर्तींपैकी भगवान रामाचा उजव्या बाजूला असलेल्या लक्ष्मणची आहे, जी सामान्य परंपरेपेक्षा हटके आहे, कारण सहसा भगवान रामाचा उजव्या बाजूला सीता माई असते. इथे राम कुटुंबा व्यतिरिक्त भगवान विष्णू आणि त्यांच्या तीन पत्नींच्या काळ्या संगमरवरी मूर्तीदेखील आहेत.

सामान्यतः सर्वत्र भगवान विष्णूच्या मूर्तींसोबत त्यांची पत्नी श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या मूर्तीच असतात, परंतु त्यांची तिसरी पत्नी नीला देवी यांची मूर्तीदेखील या मंदिरात आहेत.  या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे दोन हात आहेत, ज्यात त्यांनी शंख आणि चक्र धारण केले आहे.  भगवान विष्णू उभ्या अवस्थेत आहेत तर त्यांच्या तिन्ही पत्नी बसलेल्या अवस्थेत आहेत.

काळ्या संगमरवरी दगडाने बनवलेली श्रीकृष्णाची मूर्तीही मंदिरात आहे.  श्रीकृष्णाच्या कांस्य मूर्तीही मंदिरात आहेत.  मठाच्या भिंतींवर हनुमान जीच्या लाल रंगाने बनवलेली चित्रेदेखील आहेत.  मठाच्या अंगणात तुळशीचे रोप आहे, जे चेन्नईतील सर्वात जुने तुळशीचे रोप मानले जाते.

वास्तुकलेचा अद्भुत नजराणा असलेले हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे.  उत्तर भारतीय शैलीचे आणखी एक मंदिर देखील मंदिर परिसरात तलावाजवळ आहे.  त्याला स्वतःचे छोटे गेट आहे.  असे मानले जाते की भगवान विष्णू स्वतः येथे आले आणि त्यांनी बाबा लाल दास बैरागी यांना दर्शन दिले.  म्हणून या पवित्र स्थानाला स्थानिक लोक बैरागी व्यंकटेश पेरुमल कोइल म्हणून ओळखतात.  मंदिराचे व्यवस्थापन बैरागी पंथाद्वारे केले जाते आणि मंदिर परंपरेनुसार केवळ उत्तर भारतीय वैष्णव ब्राह्मण मंदिराचे महंत असू शकतात.  दक्षिणेला असूनही या मंदिराला पंजाबची झलक दिसते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment