जेव्हा निशाचा जन्म झाला तेव्हा कुटुंबातील कोणीही आनंदी झाले नाही. कदाचित मुलाची इच्छा पूर्ण न झाल्याने निराश झाले.
निशा पाच वर्षांची असताना तिच्या प्रिय भावाचा जन्म झाला. घरातील प्रत्येकजण खूप आनंदी होता. काही दिवसांनी निशाला तिची उपेक्षा लक्षात आली. तिचे
बाबादेखील ऑफिसमधून परतल्यावर भावावर प्रेम करायचे. प्रतिकूल परिस्थितीतही निशाने मन लावून अभ्यास सुरू ठेवला. बीएच्या परीक्षेत ती संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
आजोबांनी निशाचे अभिनंदन केले पण वडिलांना बोलावून सांगितले- 'मुला, शिक्षण झाले, आता तिचे हात पिवळे करण्याचा विचार कर.'
निशाला अजून लग्न करायचे नव्हते. तिला पुढे अभ्यास करायचा होता. तिला कुटुंब आणि समाजाच्या रूढीवादी विचारांसमोर हार मानायची नव्हती. ती तिच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित होती.
सरकारकडून मिळालेल्या प्रोत्साहन रकमेने निशाला तिचा अभ्यास सुरू ठेवण्यास खूप मदत केली. शेवटी, विजय धैर्याचा झाला. तिची साधना पूर्ण झाली आणि यु.पी.एस.सी नागरी सेवा परीक्षेत तिची निवड कुटुंबाला अभिमानास्पद बनवत होती. मुलीच्या प्रतिभेने संकोचिंतपणाची बेडी तोडली.- विनोद प्रसाद
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
(लघुकथा) चित आणि पट
'हलो, गर्विता! तुला इथून जाऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तुला परत यायचं आहे की नाही का तिथेच माहेरात बसून राहणार आहेस?"
'तुला माहित आहे, निमित! आई आणि वडील दोघेही कोरोनामुळे त्रस्त आहेत. ते पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत मी येणार नाही. '
त्याचे न ऐकल्याने निमितचा पारा सातव्या आस्मानाला पोहोचला. यावेळी तो कठोर स्वरात म्हणाला- 'आई-वडिलांवर खूप प्रेम होते, मग लग्न करण्याची काय गरज होती. तुला अजून एक बहीण आहे, ती सुद्धा आईवडिलांची सेवा करायला येऊ शकते, सगळा ठेका तूच घेतला आहेस का? तुला तुझ्या घरची अजिबात काळजी नाही. '
हे ऐकल्यावर गर्विताच्या मनाचा बांध फुटला," 'निमित! मला माझे घर कसे चालवायचे ते चांगले माहित आहे, परंतु घर कसे चालवायचे हे तुला माहित नाही. एक महिन्यापूर्वी, मला माझ्या माहेरी घरी यायचे नव्हते पण तू मला माझा सामान्य खोकला पाहूनच येथे जबरदस्तीने येण्यास भाग पाडले…."- मीरा जैन
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment