Wednesday, September 29, 2021

स्वाभिमानी गीतकार मजरुह सुलतानापुरी


गीतकार मजरूह सुलतानपुरी हकीमदेखील होते. ते एका तरुणीच्या प्रेमात पडले होते पण त्याचे प्रेम टिकले नाही.  तुटलेल्या अंतःकरणाने मजरूह कविता करू लागले.  मग जेव्हा त्यांना चित्रपटांमध्ये गाणी लिहावी लागली, तेव्हा त्याचे पहिले गाणे जे प्रसिद्ध झाले ते 'दिल ही तूट गया हम जी कर क्या करेंगे ...' (शाहजहाँ) होते.  हे गाणे कुंदनलाल सहगल यांनी गायले होते. कुंदनलाल यांना हे गाणे इतके भावले होते की त्यांनी हे गाणे त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी वाजवण्यात यावे ,असे सांगितले होते.

मजरुह सुल्तानपुरी यंचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात झाला.  काही लोक आजमगड जिल्ह्यातिल निजामाबादमध्ये जन्म झाल्याचे सांगतात. मजरुह अर्थात लखनौच्य तक्मिल-उल-तिब महाविद्यालयातून युनानी पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण घेतले होते आणि पुढे त्यांनी फैजाबादमध्ये हकीम म्हणून काम करायला सुरुवात केली. याच दरम्यान ते एका तरुणीच्या प्रेमात पडले.  पण ते प्रेम अल्पायुषी ठरले. असता, तुटलेल्या हृदयासह मजरुह यांनी शायरीच्या जगतात उडी घेतली. मजरूह सुलतानपूर येथे आयोजित होत असलेल्या मुशायरां'मध्ये भाग घेत असत.

मजरुह 1945 मध्ये एका मुशायरा कार्यक्रमात सहभागी घेण्यासाठी मुंबईला गेले. तिथे निर्माता ए.आर. कारदार यांनी त्यांची शायरी ऐकून त्यावर प्रभावित झाले. तिथेच कारदार यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटांसाठी गाणी लिहिण्यास सांगितले. मात्र मजरुह यांना चित्रपटासाठी गाणी लिहिणं योग्य वाटत नव्हतं,त्यामुळे त्यांनी गाणी लिहायला नकार दिला.   जिगर मोरादाबादी यांच्या सांगण्यावरून शेवटी मजरुह सुलतानापुरी गाणी लिहायला तयार झाले. संगीतकार नौशाद यांनी 'शाहजहाँ' (1946) साठी गाणी लिहिण्यासाठी ऑफर दिली.  'शाहजहां'मधील के. एल. सहगल यांनी गायलेल्या  'जब दिल ही तूट गया ...' या गाण्याने कमालच केली. सेहगल यांनी इथपर्यंत सांगितलं की त्यांच्या शेवटच्या अंत्यसंस्कार यात्रेत हेच गाणे वाजवण्यात यावे.

मजरुह यांनी एकदा मुंबईतल्या कामगारांच्या संपादरम्यान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात  'माज़-ए-साथी जाने न पाए…' ही कविता वाचली होती. त्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.  मजरुह यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली.  राज कपूर यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला  नकार दिला.  मग राज कपूर यांनी त्याला एक गाणे लिहायला दिले.  मजरूह यांनी ‘एक दिन बिक जाएगा माटी के मोल…’  हे गाणे लिहिले.  त्याबदल्यात राज कपूरने मजरूहच्या कुटुंबाला एक हजार रुपये दिले.

राज कपूर यांनी 1975 च्या त्यांच्या 'धरम-करम' या चित्रपटात हे गाणे वापरले.  तुरुंगातून सुटल्यानंतर मजरूह पुन्हा गीतलेखनात सक्रिय झाले.  1953 च्या 'फुटपाथ' चित्रपटातील गाण्यांच्या यशाने हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांचे नाणे चालले. त्यांचे 'शाम-ए-गम की कसम ...' हे गाणे आजपर्यंत कोणीही विसरू शकलेले नाही.  मजरूह यांची संगीतकार एस.डी. बर्मन यांच्यासोबत  चांगली जोडी जमली.  या जोडीने 'पेइंग गेस्ट', 'नौ दो ग्यारह', 'सोलवा साल', 'काला पानी', 'चलती का नाम गाडी', 'सुजाता', 'बंबई का बाबू', 'बात एक रात की', 'तीन देवीयां', 'ज्वेलथीफ' आणि 'अभिमान' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एक नवी यशोगाथा लिहिली.

1964 मधील 'दोस्ती' चित्रपटातील 'चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे ...' या गाण्यासाठी मजरूह यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.  मजरूह सुलतानपुरी यांना 1993 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  या पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले बॉलिवूड गीतकार होते.  त्यांनी 24 मे 2000 रोजी जगाचा निरोप घेतला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment