Sunday, September 12, 2021

माता मनसा देवी


उत्तराखंडमध्ये शिवबरोबरच शक्तीची उपासनादेखील अत्यंत महत्वाची आहे. शक्ती शिवशिवाय अपूर्ण आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे.  म्हणूनच जिथे शिवाची पूजा केली जाते, तिथे शक्तीही उपासना खूप महत्वाची आहे.  तरच ती पूजा पूर्ण मानली जाते.

देवतांचा देव असलेल्या महादेवाला प्राप्त करण्यासाठी सतीने हिमालयातील कन्या पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म घेतला.  आणि पार्वतीने शिव प्राप्त करण्यासाठी हरिद्वार या तीर्थक्षेत्रात गंगेच्या काठावर असलेल्या शिवालिक पर्वतावर कित्येक हजार वर्षे पूजा केली आणि फक्त विल्व-पत्रांचं सेवन केलं. म्हणूनच येथे स्थापन केलेल्या शिवलिंगाला बिलकेश्वर महादेवाचे नाव मिळाले.  या विल्वा पर्वताच्या पायथ्याशी बिलकेश्वर मंदिराची स्थापना झाली आहे.  त्याच वेळी शिवालिक पर्वतरांगाच्या विल्व नावाच्या पर्वतावर माता मनसा देवीचे प्राचीन मंदिर स्थापित आहे.  जिथे माता भक्तांच्या इच्छा पूर्ण करते.

 मनसा देवी मंदिराजवळ एक वृक्ष प्राचीन काळापासून आहे.  त्याला लाल धागा बांधल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. माता मनसा देवीचे भक्त मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येतात, तेव्हा ते त्यांच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी या वृक्षाला लाल धागा बांधतात आणि जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते, तेव्हा ते हा धागा सोडवण्यासाठी पुन्हा येतात आणि ते माता मनसा देवीच्या चरणी नतमस्तक होतात. भाविक माता मनसा देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

स्कंद पुराणात माता मनसा देवीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे.  माता मनसा देवीला नाग कन्या रूपातही मानले जाते.शिवाय शिवाची शिष्याच्या रूपातदेखील तिचे नाव शेवी म्हणून प्रसिद्ध आहे.  माता मनसा देवी बंगालमध्ये मनसा मंगल म्हणून तर बिहारमध्ये विषहरी म्हणून प्रसिद्ध आहेत.पौराणिक श्रद्धा अशी आहे की देवाच्या मनातून जन्मलेली देवी म्हणून मानसा देवी नावाने ओळखली जाते.  जिचे नाव आहे वैष्णवी सिद्ध योगिनी असे आहे. माता मनसा देवीने भगवान श्रीकृष्णाला तीन युगांची तपश्चर्या करून प्रसन्न केले.

माता मनसा देवीची स्वर्ग लोक, नाग लोक आणि पृथ्वी लोक या तीन जगात पूजा केली जाते.  जगद गौरीच्या नावाने तिची सर्वत्र पूजा केली जाते.  भगवान विष्णूची माता मनसा हिने अत्यंत भक्तिभावाने पूजा केली तेव्हा तिचे नाव वैष्णवी पडले.  राजा जन्मेजयच्या यज्ञात नागांचे प्राण रक्षण करण्याने ती नागेश्वरीच्या नावाने प्रसिद्ध पावली. ही विषहरण करणारी आहे, म्हणूनच माता मनसाला विषहरीही म्हटले जाते. ही तपस्वी महर्षी आस्तिकाची माता आणि मुनी जरत्कारुची पत्नी आहे.

श्री माता मनसा देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत श्री रवींद्र पुरी महाराज सांगतात की अशा प्रकारे पुराणात माता मनसा देवीची बारा नावे आहेत.  म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी माता मनसा देवीच्या 12 नावांनी पूजा केली जाते.  असे मानले जाते की माता मनसा देवीची पूजा केल्याने सापांविषयीची भीती दूर होते.  मनसा देवीचे स्तोत्र सिद्ध केल्याने मनुष्य महासिद्ध होतो आणि मोक्ष प्राप्ती मिळवतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment