चीनच्या पर्वतीय भागातील एका गावात एक मुलगी आपल्या आईसोबत राहत होती. तिला भाऊ नव्हता. याचे तिला मोठे दु:ख होते. ती नेहमी लाल रंगाचे कपडे परिधान करत असल्यने तिचे नाव लाली पडले होते. एक दिवस दोघी मायलेकी शेतात काम करत असताना अचानक मोथे वादळ आले. त्यातून एक भयंकर असा ड्रॅगन प्रकट झाला. आणि बघता बघता ड्रॅगन लालीला घेऊन अदृश्य झाला. लालीच्या आईला काही कळायच्या आतच सारा प्रकार घडला. ती पाहतच राहिली.
लाली मोठमोठ्याने ओरड्त होती," आई, माझा धाकटा भाऊ येईल आणि मला सोडवेल्."आई आक्रोश करतच गराकडे निघाली. जाता जाता तिला वाटेत ठेस लागली आणि ती जवळच्या झाडीत पडली. तिथे असलेल्या लाल फळावर तिची नजर पडली. ते फळ खूप तेजवी होते. तिने तोडून तोंडात टाकले. घरी आल्यावर लालीची सुटका करणार्या भावाविषयी विचार करत अंथरुणावर पडून राहिली. इतक्यात तिला तिच्या बाजूला एक नवजात बालक दिसले. ती समजून चुकली की,आपण जे फळ खाल्ले, ते एक दिव्य फळ आहे. आईने त्याचे नाव दिव्यकुमार ठेवले.
थोड्याच दिवसांत तो मोठा झाला. एक दिवस एक कावळा आला आणि घरासमोरच्या झाडावर बसून माणसाच्या आवाजात बोलू लागला,
दिव्यकुमार गावच्या सरपंचांकडे गेला. त्यांना ड्रॅगनविषयी विचारले. सरपंच समोर दिसणार्या प्रचंड अशा पर्वताकडे बोट करून म्हणाले," त्या पर्वताच्या पायथ्याशी गेल्यावर तुला एक पहाडी रस्ता दिसेल. त्या रस्त्याने पर्वाताला वळसा घालून पलिकडे गेलास की तुला ड्रॅगनची गुहा दिसेल." त्याने रात्रभर चालून निम्मा रस्ता पार केला. पण पुढे गेल्यावर त्याला थांबणे भाग पडले. कारण वाटेत प्रचंद मोठा दगड पडला होता. मोठ्या मुश्किलीने तो दगड बाजूला केला. त्याच्या खाली त्याला एक सोनेरी बासरी दिसली.
त्याने बासरी वाजवायला सुरू केली. आणि काय आश्चर्य! आजूबाजूचे सारे पशू-पक्षी नाचू लागले. त्याने बासरी वाजवायची बंद केली, तसे त्यांचे नाचणे बंद झाले. दिव्यकुमारचे डोळे अत्यानंदाने चमकले. त्याला बासरीचे रहस्य उमगले. तो आता ड्रॅगनच्या गुहेच्या दिशेने निघाला. गुहेसमोर जाऊन त्याने ड्रॅगनला आव्हान दिले. ड्रॅगन बाहेर आला. साखळदंडांनी जखडलेली त्याची बहीणसुद्धा बाहेर आली. दिव्यकुमारने जादूची बासरी वाजवायला सुरुवात केली. झटक्यात ड्रॅगन नाचायला लागला. लालीने आपल्या धाकट्या भावाला ओळखले. दिव्यकुमार बासरी वाजवत राहिला तर ड्रॅगन बेहोश होऊन नाचत राहिला. तो नाचून नाचून थकला. त्याचे डोळे लालबूंद झाले. त्याचा श्वास फुलला. तो आता जमिनीवर लोळण घेऊन ओरडू लागला. " बासरी वाजवू नको... बासरी वाजवू नको. बहिणीला घेऊन जा." पण दिव्यकुमार बासरी वाजवतच राहिला. त्याने बहिणीला साखळदंडातून मुक्त केले. तिला आपल्यासोबत घेतले. ड्रॅगनला त्याने आपल्या एका हाताने मागे मागे येण्याचा इशारा केला.
दिव्यकुमार एका विशाल सरोवराच्या दिशेने चालू लागला. मागे ड्रॅगन नाचत नाचत येत होता. सरोवरच्या तटावर आल्यावर दिव्यकुमारने त्याला सरोवरात उडी घेण्याचा इशारा केला. तशी ड्रॅगनने सरोवरात उडी घेतली. धाडकन तो पाण्यात पडला. पण त्याचे नाचणे बंद झाले नाही. कारण बासरी वाजत होती. अशा प्रकारे सात दिवस सात रात्री उलटल्या, तरीही दिव्यकुमार बासरी वाजवायचा थांबला नाही. शेवटी नाचत नाचतच ड्रॅगनने आपला जीव सोडला. दोघा भावा-बहिणीला खूप आनंद झाला. दोघे घरी आले. त्यांना पाहून आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. पुढे दिव्यकुमार, लाली आणि आईसोबत आनंदाने राहू लागला.
लाली मोठमोठ्याने ओरड्त होती," आई, माझा धाकटा भाऊ येईल आणि मला सोडवेल्."आई आक्रोश करतच गराकडे निघाली. जाता जाता तिला वाटेत ठेस लागली आणि ती जवळच्या झाडीत पडली. तिथे असलेल्या लाल फळावर तिची नजर पडली. ते फळ खूप तेजवी होते. तिने तोडून तोंडात टाकले. घरी आल्यावर लालीची सुटका करणार्या भावाविषयी विचार करत अंथरुणावर पडून राहिली. इतक्यात तिला तिच्या बाजूला एक नवजात बालक दिसले. ती समजून चुकली की,आपण जे फळ खाल्ले, ते एक दिव्य फळ आहे. आईने त्याचे नाव दिव्यकुमार ठेवले.
थोड्याच दिवसांत तो मोठा झाला. एक दिवस एक कावळा आला आणि घरासमोरच्या झाडावर बसून माणसाच्या आवाजात बोलू लागला,
ड्रॅगनच्या गुहेत
तुझी बहीण बिच्चारी
रात्रंदिवस रडतेय
बाबा, संकट मोठे भारी
कावळ्याची वाणी ऐकून दिव्यकुमार आईला म्हणाला," मला कोणी बहीण आहे का गं?" त्याच्या आईने घडला सगळा प्रकार त्याला सांगितला. तिथेच दिव्यकुमारने प्रतिज्ञा केली. " माझ्या बहिणीला ड्रॅगनच्या तावडीतून मुक्त करेन आणि गावातल्या सगळ्या लोकांची त्याच्या दहशतीतून सुटका करीन."दिव्यकुमार गावच्या सरपंचांकडे गेला. त्यांना ड्रॅगनविषयी विचारले. सरपंच समोर दिसणार्या प्रचंड अशा पर्वताकडे बोट करून म्हणाले," त्या पर्वताच्या पायथ्याशी गेल्यावर तुला एक पहाडी रस्ता दिसेल. त्या रस्त्याने पर्वाताला वळसा घालून पलिकडे गेलास की तुला ड्रॅगनची गुहा दिसेल." त्याने रात्रभर चालून निम्मा रस्ता पार केला. पण पुढे गेल्यावर त्याला थांबणे भाग पडले. कारण वाटेत प्रचंद मोठा दगड पडला होता. मोठ्या मुश्किलीने तो दगड बाजूला केला. त्याच्या खाली त्याला एक सोनेरी बासरी दिसली.
त्याने बासरी वाजवायला सुरू केली. आणि काय आश्चर्य! आजूबाजूचे सारे पशू-पक्षी नाचू लागले. त्याने बासरी वाजवायची बंद केली, तसे त्यांचे नाचणे बंद झाले. दिव्यकुमारचे डोळे अत्यानंदाने चमकले. त्याला बासरीचे रहस्य उमगले. तो आता ड्रॅगनच्या गुहेच्या दिशेने निघाला. गुहेसमोर जाऊन त्याने ड्रॅगनला आव्हान दिले. ड्रॅगन बाहेर आला. साखळदंडांनी जखडलेली त्याची बहीणसुद्धा बाहेर आली. दिव्यकुमारने जादूची बासरी वाजवायला सुरुवात केली. झटक्यात ड्रॅगन नाचायला लागला. लालीने आपल्या धाकट्या भावाला ओळखले. दिव्यकुमार बासरी वाजवत राहिला तर ड्रॅगन बेहोश होऊन नाचत राहिला. तो नाचून नाचून थकला. त्याचे डोळे लालबूंद झाले. त्याचा श्वास फुलला. तो आता जमिनीवर लोळण घेऊन ओरडू लागला. " बासरी वाजवू नको... बासरी वाजवू नको. बहिणीला घेऊन जा." पण दिव्यकुमार बासरी वाजवतच राहिला. त्याने बहिणीला साखळदंडातून मुक्त केले. तिला आपल्यासोबत घेतले. ड्रॅगनला त्याने आपल्या एका हाताने मागे मागे येण्याचा इशारा केला.
दिव्यकुमार एका विशाल सरोवराच्या दिशेने चालू लागला. मागे ड्रॅगन नाचत नाचत येत होता. सरोवरच्या तटावर आल्यावर दिव्यकुमारने त्याला सरोवरात उडी घेण्याचा इशारा केला. तशी ड्रॅगनने सरोवरात उडी घेतली. धाडकन तो पाण्यात पडला. पण त्याचे नाचणे बंद झाले नाही. कारण बासरी वाजत होती. अशा प्रकारे सात दिवस सात रात्री उलटल्या, तरीही दिव्यकुमार बासरी वाजवायचा थांबला नाही. शेवटी नाचत नाचतच ड्रॅगनने आपला जीव सोडला. दोघा भावा-बहिणीला खूप आनंद झाला. दोघे घरी आले. त्यांना पाहून आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. पुढे दिव्यकुमार, लाली आणि आईसोबत आनंदाने राहू लागला.
No comments:
Post a Comment