मोबाईल वरदानपेक्षा शाप अधिक
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. मोबाईलचेही तसेच झाले आहे. दूरसंचार क्षेत्रात गेल्या दशका - दोन दशकामध्ये विलक्षण अशी संवाद क्रांती झाली. अद्याप क्रांतिची परिसीमा बरीच दूर असली तरी आताच त्याच्या बरे-वाईटपणाचे फटके बसू लागले आहेत. मोबाईलने इतके वेड लावून टाकले आहे की, तो कुठे असावा आणि कुठे नसावा याचे अजिबात तारतम्य राहिलेले नाही. कुणाशी कुठेही , केव्हाही आणि कशाही ( एसएमएस, व्हिडीओद्वारा ) प्रकारे संवाद साधला जाऊ लागल्याने सुविधेबरोबरच दुष्परिणामाचे फटकेही बसू लागले आहेत. तो आता वरदान नव्हे, शाप अधिक वाटू लागला आहे. तारतम्य न ठेवल्याने तो कुठे चालू ठेवावा, याचा कुठलाच धरबंध राहिलेला दिसत नाही. मंदिर, स्माशान, शौचालय अथवा महत्त्वाची , गंभीर विषयावरच्या विचारमंथनासारख्या ठिकाणी मोबाईलची घंटी वाजतेच. सिनेमा, थिएटरसारख्या करमणुकीच्या ठिकाणीही घंटी वाजवून मोबाईल माणसाचा रसभंग करीत आहे. व्याख्यानांमध्येसुद्धा हा मोबाईल वक्त्याची आणि श्रोत्याची बोलण्या-ऐकण्याची तार तोडून टाकतो. कुठल्या ना कुठल्या मोबाईलवेड्याचा कुठे ना कुठे मोबाईल घंटी वाजवून " पचका" करून टाकतोच. आजची 'यंग इंडिया' तर त्याच्या पार अधिन गेली आहे. त्याच्या वेडापायी होत असलेल्या एकाग्रताभंग, रसभंग आणि गंभीर व शांततेचा भंग यामुळे नाईलाजास्तव शेवटी सरकारला शाळा-महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरण्यावर बंदी घालावी लागली. इतका त्याचा वापर आणि त्रास वाढला आहे. बरे! कायदे करून ते पाळले जातात थोडेच. आपल्या देशात तर कायदे पाळण्यासाठी नाही तर तोडण्या- मोडण्यासाठी केले जातात, असे कधी कधी उद्वेगाने वाटते. विशेष म्हणजे काही महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे, पण त्याच्या निर्बंधाची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी ज्याच्यावर टाकण्यात आली आहे, त्याला ती मोठी डोकेदुखी वाटते. कारवाई करून अथवा त्याची शिफारस करून विनाकारण का कोणाशी पंगा घ्या, असे बहुतांशजणांना वाटते. भिड, भीतीमुळे मोबाईलवेड्यांचे अधिकच फावले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सगळीकडेच आनंदी आनंद आहे. यावर स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय असला तरी ती पाळण्याचा समजूतदारपणा तर कोण दाखवतो?
धुम्रपानबंदी कायदा कागदोपत्रीच
विविध कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्यावर बंदी असतानासुद्धा त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना अजिबात दिसत नाही. धुम्रपान करणारा वर्ग व्यसनाच्या अधीन गेलेला असल्यामुळे तो काळ, वेळ व ठिकाण याची पर्वा न करता आपला कार्यभार उरकरण्याचा प्रयत्न करीत असतो. उपाहारगृहे, कार्यालये, पब्ज, बार आदी ठिकाणी धुम्रपानाची संधी माणसे अजिबात सोडत नाहीत. वास्तविक विडी, सिगरेट, गुटखा अथवा अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो व आरोग्याला ते घातक असतात, अशी जाहिरात करून किंवा वैधानिक इशारे देऊनही त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. उलट त्यात वाढ होताना दिसत आहे. विशेषतः किशोर व युवावयीन वर्ग याकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहे. १३ वर्षांखालील १४ टक्के विद्यार्थी तंबाकूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचा सर्व्हे सांगतो. अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये धुम्रपान करणार्याचे प्रमाण कमी होत असताना आपल्या देशात मात्र त्यात वाढ होत आहे. ही बाब मोठी चिंताजनक आहे. धुम्रपान करणार्यांना आपल्यामुळे दुसर्यांना त्रास होत असतो, याची कल्पना असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. धुम्रपानाच्या अधीन असलेल्यांवर निव्वळ कायद्याने काही होणार नाही किंवा फरक पडणार नाही. कारण आज कायद्याचा धाकच उरला नाही. कायद्याचे पाईकसुद्धा करवाई तर सोडाच पण स्वतःच त्यात मश्गुल असल्याची उदाहरणे उजेडात आली आहेत. यासाठी काही प्रमाणात प्रबोधनाचा मार्ग परिणामकारक ठरू शकतो. स्वयंसेवी संस्था, समाजसेवकांनी ही जबाबदारी पेलायला हवी. पण अलिकडेच्या बेसुमार वाढलेल्या विविध स्वयंसेवी संस्थां आणि त्याचे चालक बहुधा स्वत;ला मिरवण्याचा आणि शासकीय अनुदान लाटण्यातच अधिक धन्यता मानताना दिसत आहेत. वृत्तपत्रांमध्ये फोटो- बातमी छापून समाजसेवेचा आव आणून शासनाची एकप्रकारची फसवणूक करून लुटणार्या या संस्था काय कामाच्या?

भाववाढीपेक्षा पेट्रोल भेसळ घातक
पेट्रोलच्या भाववाढीने ग्राहकाचे कबंरडे मोडून निघाले असताना त्यातल्या भेसळीच्या कहरीने ग्राहकाला रुग्णशय्येवर टाकले आहे. छोट्या-छोट्या गावांमध्ये पान टपर्या, हॉटेल चालवणारे ग्राहकांची सोय करीत असल्याचा आव आणत भेसळीचा धंदा बेमालुमपणे करीत आहेतच, पण वर त्यात जादा दर लावून टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार संताप आणणारा आहे. वास्तविक असे बेकायदा पेट्रोल पंप व चालवणारे हे आजचे नाहीत. गावागावात- पावलोपावली कित्येक वर्षांपासून ठिय्या देऊन आहेत. वाहनधारकांची लूट तर होत असतेच्,पण भेसळीचे तेल वापरल्याने वाहन हळूहळू भंगाराची वाट धरत असते. याकाळात मिस्त्री नावाचा प्राणीही आपला डाव साधून घेत असतो. जिथे जाईल तिथे लूटीशिवाय काही नाही. पेट्रोलमध्येसुद्धा एकाच जागी भेसळ होते म्हणणे धाडसाचे ठरावे. म्हटलं जातं की, विकासाचा एक रुपाया खाली येईपर्यंत १० पैशाएवढा उरतो. त्याचप्रमाणे पेट्रोलचे आहे. पेट्रोलसुद्धा झिरपत्-झिरपत ग्राहकापर्यंत पोहोचते तेव्हा त्याचे घासलेट झलेले असते. पेट्रोल भांडारातूनच निघताना भेसळीने निघते. वाटेत टँकर अडवून त्यात आणखी भेसळीची भर पडते. पेट्रोलपंप चालक आणि शेवटी गावठी पंपवाले या सगळ्यांच्या तावडीतून मग पेट्रोलमध्ये पेट्रोल उरतेच कुठे? भेसळ पकडली तरी संबंधितांना शिक्षा झाल्याच्या अशा किती घटना ग्राहकाला दिलासा देणार्या किंवा भेसळ करणार्याला वचक ठेवणार्या घडल्या आहेत ?
No comments:
Post a Comment