खाताना हातात मोबाईल. कुठं जायचं म्हटलं तर हातात मोबाईल.
झोपताना हातात मोबाईल. तुम्ही कुठेही असा,कोणतेही काम करत असाल, तुमचा मोबाईल,तुमच्या हातातून काही जात नाही. फेव्हिकॉलप्रमाणे तो
तुमच्या हाताला चिकटलेला असतो. दिवस-रात्र,जागेपणी-झोपेत, तुमची बोटे आणि
तुमची दृष्टी फक्त मोबाईलवरच खिळलेली असते.तुम्ही कितीही थकला
असाल, तरीही मोबाईल चेक करायचे सोडत नाही. अर्थात, या तंत्रज्ञानाने आयुष्य अगदी सोपं करून टाकलं
आहे,पण आपल्या शरीरासाठी ते तितकेच धोकादायकदेखील आहे.मोबाईलचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी पाडू
शकतो. अनेक संशोधन आणि शोधांमध्ये या गोष्टीला पुष्ठीच मिळाली
आहे. मोबाईलचा मर्यादेपेक्षा अधिक वापर कॅन्सरसारख्या जीवघेण्या
आजाराला कारण बनू शकतो.
रात्रीच्यावेळी
झोप नाही: अनेक अभ्यास आणि संशोधन यांमध्ये
कळून चुकले आहे की, मोबाईलचा अधिक वापर हा झोपेचे खोबरे करतो.
झोपेसंबंधीच्या समस्या निर्माण करतो. याला सर्वात
मोठे कारण म्हणजे मध्यरात्रीच्यावेळी वाजणारा मोबाईल! उशीरापर्यंत
मोबाईलवरचे बोलणे, चॅटिंग. रात्री उशीरापर्यंत
मोबाईलचा वापर करणे म्हणजे स्लीप डिसऑर्डरसारख्या समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
हृदयासाठी धोकादायक: सेलफोनच्या रेडिएशनमुळे फक्त कॅन्सर
होण्याचा धोका वाढत नाही तर क्रोनिक डिजीजसारख्या हृदयाच्या समस्याही निर्माण होतात.
युरोपियन जनरल ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार
मोबाईल आणि कॉर्डलेस फोनमधून निघणारे रेडिएशन हृदयाच्या कार्यप्रणालीमध्ये अडचणी निर्माण
करतात.
वाढू शकते इनफर्टिलिटी: जे पुरुष प्रमाणापेक्षा अधिक मोबाईलचा
वापर करतात, त्यांना सावध होण्याची गरज आहे. एका संशोधनानुसार पुरुषांच्या एका समुहाचा यांमध्ये समावेश करण्यात आला होता,
जे मोबाईलचा अधिक वापर करत होते.मोबाईल फोनच्या
रेडिएशनमुळे त्यांच्या वीर्यात स्पर्म सेल काउंटमध्ये कमतरता दिसून आली.
ऐकायला अडचणी: आज आपण बघतोय, रस्त्यावरून चालणार्या प्रत्येकाच्या कानात इयरफोन अडकवलेला
असतो. फक्त इयरफोन अडकवून मोठ्या आवाजात गाणे ऐकणे ,एवढेच तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण
करत नाही तर मोबाईल रेडिएशनदेखील याचे एक मोठे कारण आहे. एका
अभ्यासात साम्गितले गेले आहे की,रोज जवळपास दोन तासांपेक्षा अधिक
काळ फोनवर बोलत राहणार्या लोकांना कमी ऐकायला येण्याच्या समस्येला
तोंड द्यावे लागत आहे.
डोळे होतील कमकुवत: बहुतांश लोक ई-बुक्स वाचणे, वेब सर्फिंग करणे इत्यादी गोष्टींसाठी मोबाईलचा
वापर करतात. विशेष करून रात्रीच्या आंधारात मोबाईलच्या चमकदार
स्क्रीनवर लहान फॉन्ट्स पापण्यांची उघडझाप न करता वाचले जाते, तेव्हा मोबाईलमधून निघणारे रेडिएशन तुमच्या डोळ्यांना शुष्क आणि लाल करण्याबरोबरच
खाजदेखील निर्माण करतात. यामुळे डोळे हळूहळू कमकुवत होत जातात.
त्वचेवर परिणाम: मोबाईल फोनला आणखी आकर्षक बनवण्यासाठी
विशेष प्रकारच्या चमकदार धातू जसे की, निकल, क्रोमियम आणि कोबाल्टचा वापर केला जातो. हे सेल फोन डमेंटाइटिसचे
सर्वात मोठे कारण आहे.
संक्रमण: तुम्ही मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण
डाटाबरोबरच लाखो संक्रमण जीव-जंतूंना सोबत घेऊन वावरत असता.
जे लोक टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करतात, त्यांचे
मोबाईल मूळ स्वरुपात इकोली जीवाणूच्या मलाने दूषित होतात. यामुळे
उलटी,जुलाब आणि त्वचा सम्क्रमण होण्याचा धोका अधिक असतो.
2013 मध्ये झालेल्या
एका शोधानुसार मोबाईलच्या अधिक वापरामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो.
यामुळे हृदयरोगाचा धोका संभवतो. शिवाय थंब अर्थराइटिससुद्धा
होऊ शकतो. यामुळे तुमच्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला दुखायला
लागते तसेच सूजसुद्धा येते.
आज मोबाईलशिवाय
आपलं आयुष्य अपूर्ण आहे. इतका तो आपल्या जवळ आला आहे. पण त्याच्या अधिक वापरामुळे
आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागणार आहे. यात आपले मोठे
नुकसान आहे. डोकेदुखी,डोळ्यांमध्ये जळजळ,
ताणतणावसारख्या आजारांना एकप्रकारे निमंत्रणच देत आहोत. या सगळ्या समस्या कुठे ना कुठे
मोबाईलशीच जोडल्या गेल्या आहेत. मेट्रो
शहरात राहणारे आणि संपूर्ण पोषणाशी सामना करणारे लोक या समस्यांना लवकर बळी पडतात,
असे यातले जाणकार सांगतात. जर या शारीरिक आणि मनसिक
समस्यांना लांब ठेवायचे असेल तर आपल्याला मोबाईलचा वापर कमी करावा लागेल.त्यामुळे मित्रांनो, ही बाब गंभीरपणे घ्या आणि मोबाईलचा
वापर हवा तेवढा आणि हवा तेवढाच करा आणि तंदुरुस्त रहा.
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत..धन्यवाद
ReplyDelete