Friday, April 13, 2018

त्याने टॅक्सीलाच बनवली बाग!


     पर्यावरणाचा होत असलेला र्हास पाहून अनेकांना या पृथ्वीचे काय होणार अशी चिंता सतावत असतेयातूनच मग पर्यावरण वाचवण्यासाठी काही तरी करायचेअसे वाटून जातेआणि त्यातले काहीजण त्याच्यामागे अगदी झपाटून लागतातकोणी हजारो झाडे लावतातकाहीजण बी-बियानं लोकांमध्ये वाटतातकाहीजण मैलो न मैल खांद्यावरून पाणी वाहून झाडं जगवतातकोणी पर्यावरण वाचवण्याविषयी सांगणारी पत्रकं वाटतात.काही जण मुलांमध्येतरुणांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी,यासाठी विविध स्पर्धा आयोजित करतातआज पर्यावरणाचा जो स्तर बिघडत चालला आहे,त्यामुळे लोक चिंतेत आहेपण काहीजण केवळ चिंता करून थांबत नाहीततर आपल्या परीने पर्यावरण अबाधित राहण्यासाठी खारीचा उचलतातत्यासाठी कामाला लागतातअसाच एक पर्यावरणवेडा युवक आहे धनंजय चक्रवर्तीहा टॅक्सी ड्रायव्हर आहेत्याने आपली टॅक्सीच पर्यावरणपूरक केली आहेकोलकात्यात तो एक चर्चेचा विषय बनला आहेलोकांनी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आपल्या बागरुपी टॅक्सीत बसवून प्रवाशांना हिरवीगार सहल करवतोच शिवाय त्यांना रोपं आणि बिया देऊन झाडं लावूनत्याचे संगोपन करण्याची विनंती करतो.

     कोलकात्याच्या रस्त्यावरून धावणारी ही टॅक्सी सगळ्यांच्याच आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली आहेमात्र यासाठी लोकांनी केलेला अपमान,टर त्याला सहन करावी लागली आहे.पण आज इतक्या वर्षांनी त्याचा पर्यावरण वाचवण्यासाठी चाललेली धडपड पाहून तीच मंडळी त्याचे कौतुक करताना थकत नाहीआपली टॅक्सी पर्यावरणपूरक करण्यासाठी त्याला एक कारण कारणीभूत ठरलेतो टॅक्सी चालवत असताना त्याला मागच्या सीटवर एक रिकामी दारुची बाटली पडलेली दिसलीत्या बाटलीचा आकार मोठा आकर्षक होतात्याने त्याचा उपयोग करायचे ठरवताना त्यात एक छोटे सजावटीचे रोपटे लावले आणि मागच्या सीटच्या मागे ठेवून दिलेकाही दिवसांतच त्या रोपटे वाढून त्याच्या फांद्या खिडकीपर्यंत आल्यात्याला वाटलं कीयाचा प्रवाशांना त्रास होईलत्यापेक्षा काढून टाकावे,पण प्रवाशांना ते आवडलेत्यांनी तो मनीप्लांट न काढण्याचा सल्ला दिला.
     प्रवाशांच्या या आग्रहामुळे त्याला आणखी प्रोत्साहन मिळालेआणि मग त्याने टॅक्सीत आणखी काही रोपं लावलीहळूहळू सीटमागची बाजू मोठी आकर्षक बनलीछोट्या छोट्या सजलेल्या कुंड्या ठेवल्यात्यामुळे तो भाग सर्वानांच छान वाटू लागलाअर्थात त्याच्या टॅक्सीचालक असलेल्या साथीदारांना मात्र ते आवडले नाहीते त्याची चेष्टा-मस्करी करू लागलेयामुळे त्याच्या टॅक्सीला मागणीही चांगली वाढल्याने इर्ष्या  वाढलीअरे एवढे करण्यापेक्षा तुझ्या डोक्यावरच का गवत उगवत नाहीसअशी मस्करी त्याचे सहकारी करू लागलेअर्थात हा त्याला मारलेला टोमणा होता,परंतु हीच गोष्ट त्याने मनावर घेऊन टॅक्सीच्यावर गवत उगवण्याचे ठरवलेएक नवा विचार त्याच्या डोक्यात घुसलात्याच्याजवळ बचत फारशी होत नव्हतीकसे तरी करून त्याने पंचवीस हजार रुपयांची व्यवस्था केली आणि टॅक्सीच्या टपावर ट्रे ठेवून त्यात गवत लावलेगवताच्या ट्रेचे वजन 65 किलो होतेयामुळे गाडीचे वजन वाढलेसाहजिकच अधिक इंधन जळू लागलेपण महत्त्वाचे म्हणजे  यामुळे टॅक्सीच्या टपाचे काही नुकसान झाले नाही.त्याने टॅक्सीत आतल्या चोहोबाजूलाही छोटी छोटी रोपे लावली आहेत.
     टॅक्सी पर्यावरणपूरक करण्यामागे दोन कारणे होतीएक म्हणजे लोकांनी त्याच्या टॅक्सीकडे आकर्षित व्हावे आणि लोकांंमध्ये पर्यावरणाविषयी जागृती व्हावीत्याने टपावर गवत लावल्याने त्याला आणखी एक फायदा झालातो म्हणजे आतील माणसांना एसी गाडीत बसल्याचा अनुभव येऊ लागलाआतील तापमान थंड राहू लागल्याने प्रवाशी लोक समाधान व्यक्त करू लागलेसगळे छान चालले असताना काही कारणामुळे त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलायात त्याला त्याची स्वत:ची टॅक्सी विकावी लागलीआता त्प भाड्याची टॅक्सी चालवतो.त्याच्या मालकाला त्याचा छंद माहित होतात्याने त्याच्या गाडीत रोपे लावण्यास परवानगी दिली.
तो लहानपणापासूनच आजूबाजूला झाडे लावण्याचा कार्यक्रम पाहात आला आहेत्यात त्याचा सहभाग राहिला आहेत्यामुळे झाडांची गरजत्यांचे महत्त्व याची चांगलीच कल्पना आली होतीझाडे तर लोक भरपूर लावतात.पण त्यांचे संगोपन मात्र कोणी करत नाहीत्यामुळे धनंजय आपल्या प्रवाशांना फक्त झाडे लावू नका तर त्यांची देखभाल करात्याला वाढवाअसे आवाहन करत असतोतो प्रवाशांना पर्यावरण रक्षणासंबंधीत स्लोगन लिहिलेली पत्रके वाटतोया पत्रकांमध्ये कवितेच्या रुपात संदेशही लिहिलेली असतातत्याने सांगितलेल्या गोष्टी जे प्रवाशी गांभिर्याने घेतातत्यांना तो रोपे आणि बियांचेही वाटप करतो.  त्याने सांगितलेल्या लाखमोलाच्या गोष्टी लोकांनी मनावर घेऊन पर्यावरणाविषयी जागृत राहावेअसा त्याचा आग्रह असतोप्रवाशाकडून अधिक भाडे घेऊन त्यांना लुटणारे त्याचे सहकारी त्याला वेड्यात काढायचेलोकांना तो वेडा आहे,असे सांगायचेपण तो काम करीत असलेल्या कामाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनीच त्याचे पुन्हा कौतुक करायला सुरुवात केली.
     आमरा सबुज साथी म्हणजेच आपण हिरवळीचे मित्र या नावाने धनंजय एक एनजीओदेखील  चालवतोयाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये कोणीही,कुठेही एकादे झाड लावावेअसा आहेयासाठी विशाल मोठ्या बागेची गरज नाहीनिसर्ग आपला सर्वात चांगला मित्र आहेहा नष्ट करू नका.संपूर्ण मानव जातीच्या लाभासाठी निसर्ग वाचवाअसा संदेश तो देत असतोत्याच्या या कार्याला त्याला भरपूर यश मिळो आणि त्याचा लाभ सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला मिळोहीच सदिच्छा!

No comments:

Post a Comment