संतानेश्वर महादेव देतो पुत्रसौख्य
आपल्या भारत देशात
अशी काही मंदिरे आहेत, जी आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. म्हणजे अशी प्रचलित मान्यता आहे.भक्तांची जी काही मनोकामना
आहे, ती परमेश्वर पूर्ण करत असतो.
असेच एक मंदिर काशी म्हणजेच वाराणशीमध्ये आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथे मुलाची इच्छा घेऊन पती-पत्नी दाम्पत्य येत असतात. जे कोणी पती-पत्नी दाम्पत्य सच्ची श्रद्धा ठेवून मंदिरात पूजापाठ करतात, त्यांच्यासाठी लवकरच मूल होण्याचा योग येऊ शकतो. अशी
भक्तांची धारणा आहे. दर सोमवारी इथे खास रुद्राभिषेक होत असतो.
दररोज मोठ्या संख्येने शिवाचे भक्त संतानेश्वर
महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. खास करून सोमवारी या मंदिरात
मूलाची इच्छा बाळगून असलेले भक्त येत असतात. इथे असे मानले जाते
की, एकाद्या स्त्रीचा गर्भ राहत नसेल आणि आई होण्याचे चान्सेस
कमी असतील अथवा अन्य काही कारणांनी मुलाचे सुख मिळत नसेल तर इथे येऊन रुद्राभिषेक घातल्याने
आणि रोज दर्शन घेतल्याने ही समस्या दूर होऊ शकते. वाराणशीला काशीही
म्हटले जाते. हे शहर जगातले सर्वात जुने शहर असल्याचे मानले जाते.
हे शहर गंगा नदीच्या काठी वसलेले आहे. काशीच्या
बाबतीत स्कन्द पुराणात काशीखण्ड नावाचा एक अध्याय आहे. या शहराला
बारा नावं असल्याचे सांगितले गेले आहेत.
रॉक कट टेम्पल
हिमाचल प्रदेशच्या
काँगडा जिल्ह्यातल्या रॉक कट टेम्पलच्या गर्भगृहात अजूनही श्रीराम,माता सीता आणि लक्ष्मणसोबत विराजमान
आहेत. हे मंदिर 15 मोठे डोंगर कापून बनवण्यात
आले आहे. हिमालयीन पिरॅमिड या नावाने प्रसिद्ध उत्कृष्ट कलेचा नमुना असलेले आणि
पुरातत्त्व विभागाने आठव्या शतकात बनवण्यात आल्याचे मान्यता देण्यात आलेले उत्तर भारतातील
एकुलते एक मंदिर आहे. या मंदिराचा शोध सर्वप्रथम 1913
मध्ये एचएल स्टलबर्थ या इंग्रजाने लावला. वास्तविक
दगडावर असे सुंदर नक्षीकाम करणे, मोठे कठीण काम आहे. ही कारागिरी करण्यासाठी खूप दूरवरून कारागीर बोलवण्यात आले होते, पण ही कारागिरी कोणी केली,याबाबत निस्चित पुरावा मिळाला
नाही. या रॉक कट टेम्पलला अजिंठा-वेरुळ
ऑफ हिमाचल असेही संबोधले जाते. अर्थात हे मंदिर अजिंठा-वेरुळपेक्षा जुने असल्याचे मानले जाते. डोंगर कापून गर्भगृह,मूर्ती, पायर्या आणि दरवाजे बनवण्यात
आले आहेत. मंदिराच्या अगदी समोर मसरूर सरोवर आहे. यामुळे मंदिराच्या सौदर्यात आणखी भर पडली आहे. सरोवरात
मंदिराच्या काही भागांचे प्रतिबिंब पडल्याचे पाहायला मिळते. उत्तर
भारतात हे अशा प्रकारचे एकमेव मंदिर आहे. कित्येक वर्षांपासून
चालत आलेल्या दंतकथेनुसार या मंदिराची निर्मिती पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात असताना
केल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या समोर जे सुंदर सरोवर आहे,
ते त्यांची पत्नी द्रोपदी हिच्यासाठी बनवले होते.
No comments:
Post a Comment