पाकिस्तानी
सैनिक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आणि भारतीय
सीमेत हिंसा घडवित आहेत. अशा 286 घटना आतावर
घडल्या आहेत. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत
26 जणांचा मृत्यू झाला असून, यात 14 जवानांचा समावेश आहे. परवाच्या पाकच्या भ्याड हल्ल्यात
तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. पाकड्यांनी एका जवानाच्या मृतदेहाची
विटंबनाही केली. या आधीदेखील पाकने भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची
विटंबना केली होती. पाकच्या कुरापती सुरूच आहे.एकीकडे बोलणी करायची तर दुसरीकडे कुरापती करायच्या असा दुटप्पीचा खेळ पाक आजपर्यंत
खेळत आलेला आहे. याचा प्रत्यय भारताला वारंवार आला आहे.
इकडे पाकिस्तानच्या डीजीएमओने संवादासाठी संपर्क साधला तर दुसरीकडे पाकिस्तानने
पुन्हा भारताला धमकी दिली. पाकिस्तानचे सैन्य कोणत्याही आक्रमणाला
सडेतोड उत्तर देण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानची
वळवळ सुरूच आहे. पाकिस्तान दररोज सीमेवर तणाव निर्माण करत आहे.
भारतीय सैनिक त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. बास झाले आता, हे एवढेसे आता पुरे नाही. पाकची ही वळवळ कुठंवर सहन करायची? भारतीय सैन्याने कुठेवर
सडेतोड उत्तर द्यायचे? हा तात्पुरता इलाज आता थांबवला पाहिजे,
आणि एकदाचा तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे.त्यांचा
कायमचा काटा काढला पाहिजे. पाक दुटप्पी नीती वापरत आहे,
आपणही या नितीचा वापर करत पाकचा कायमचा बदला घ्यायला हवा. त्याशिवाय त्यांची वळवळ थांबणार नाही. पाकच्या हल्ल्यात
आपले सैनिक मारले जात आहेत. आपण अजून किती निष्पाप सैनिकांना
गमविणार आहोत? पाकची नागमोडी चाल, पाकचे
कपट, पाकच्या कुरापती, अणुबाँम्बचा बागुलबुवा,
पाकस्थित दहशतवाद, पाकचे काश्मीरविषयक धोरण हे
भारतासमोर फार मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आता पाकिस्तान विषयक धोरणात बदल घडवून आणला पाहिजे.
अधिक आक्रमक पाऊल उचलत पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देवून पाकला कायमचा
धडा शिकविला पाहिजे. पाकिस्तानला ’संवाद’ची भाषा कळत नाही. पाकिस्तानच्या नापाक हरकतीला
’जशास तसे’ उत्तर हाच पर्याय सध्या उरला आहे.
No comments:
Post a Comment