कामाचा सततचा असणारा ताण आणि प्रत्येक बाबतीत आपण पुढे असावे, यासाठी तरुणांची असणारी धडपड यांमुळे २५ ते ३५ या वयात रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक तक्रारीत वाढ होत आहे.
तरुणांना तासन् तास एका जागेवर बसून करावे लागणारे काम, कामानिमित्त होणारा प्रवास, ऑफिसमधील एसीची हवा आणि विशिष्ट टार्गेट पूर्ण करण्याचा असणारा ताण यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा प्रकारे दीर्घ काळ एसीमध्ये काम केल्याने डी ३ आणि बी १२ जीवनसत्त्वांची कमतरता होणार्या रुग्णांची दवाखान्यात सध्या गर्दी आहे.
त्याचबरोबर, अतिरिक्त ताणाने उद्भवणार्या रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्णही २0 ते ३0 टक्के असतात. विविध शिफ्टमध्ये काम करावे लागणार्या तरुणांमध्ये पचनाच्या विकारांचे प्रमाणही मोठे असते.
एसीमध्ये बरेच तास बसल्याने श्वसनाचे विकार, दीर्घ काळ टिकणारा सर्दी-खोकला असे विकार आढळतात. तसेच एसीची हवा ही नैसर्गिक नसल्याने त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व सामान्य वातावरणात गेल्यावर रुग्णाला त्या हवेशी जुळवून घेणे अवघड जाते. त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण या लोकांमध्ये मोठे असते. मोकळ्या हवेत शरीराची नैसर्गिकपणे होणारी वाढ एसीच्या वातावरणामुळे खुंटते. या सगळ्यावर उपाय म्हणून काही देशांत दिवसातील ठराविक काळ उन्हात काम करण्याची पद्धत अवलंबली जाते.
तसेच, सतत एका जागेवर एकाच अवस्थेत बसून राहिल्याने सांध्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. एसीची असणारी अतिगार हवा व बाहेरील सामान्य हवा यांमुळे सांधेदुखीच्या तक्रारी असणारे रुग्ण वाढतात. तसेच, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊन आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात. दीर्घ पल्ल्याचा दुचाकीवरील प्रवास हाही पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतो. बराच काळ खुर्चीवर कॉम्प्युटरसमोर बसणे आणि व्यायामाचा अभाव यांमुळेही सांधेदुखीच्या तक्रारींत वाढ होत असल्याचे चिन्ह आहे.
अशा प्रकारच्या कामाच्या ताणामुळे नातेसंबंध आणि मानसिक तणावांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ होते. यासाठी ताणाचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे असते. तसेच, ताणाचा मनावर तर परिणाम होतोच; पण शरीरावरही दीर्घकालीन परिणाम होतो. एसीमध्ये बरेच तास बसल्याने श्वसनाचे विकार, दीर्घ काळ टिकणारा सर्दी-खोकला असे विकार आढळतात. तसेच एसीची हवा ही नैसर्गिक नसल्याने त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व सामान्य वातावरणात गेल्यावर रुग्णाला त्या हवेशी जुळवून घेणे अवघड जाते. कामाच्या ताणामुळे रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या विकारांना सामोरे जावे लागते. त्याशिवाय हा ताण जर अति झाला, तर पॅरालिसिसचा अँटॅक येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्या क्षमता ओळखून त्यानुसार काम करणे अतिशय महत्त्वाचे असते. अशा प्रकारे ताणाने ग्रासलेले लोक एकलकोंडे होण्याचीही शक्यता असते. या ताणाचा त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावरही अतिशय वाईट परिणाम होतो. मागील काही दिवसांत अशा रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे.

No comments:
Post a Comment