चायनीज पदार्थ आता खेड्यातदेखील पोहचलं आहे. या पदार्थांवर सर्वाधिक उड्या पडताहेत त्या लहान मुलांच्या. अगोदर अक्काबाई पोटात रिचवणार्या मंडळींना याची चव तोंडात रेंगाळायची, पण आता चायनीज घराघरात पोहचले आहे. बाहेरचे खायचे नाही, असा सज्जड दम मुलांना देणारे पालक चिकन मंचुरियन, गोबी मंचुरियन घरात करून देत आहेत. त्याचा मसाला आता बाजारात सहज आणि मोठ्या प्रमाणात मिळत आहे. अर्थात गाड्यावरच्या चिकन पदार्थांची चव वेगळीच असते, पण सुगरणी महिला(आई) किंवा सुगरण पुरुष (बाबा) बर्यापैकी चवीचे पदार्थ करून मुलांना घालत आहेत. इतके हे चायनीज पदार्थ आता भारतीय खाद्यसंस्कृतीत मिसळले आहेत.
जतच्या यल्लमा यात्रेत या चायनीज पदार्थांच्या स्टॉलंना असलेली गर्दी त्याची क्रेझ किती मोठी आहे, हे दाखवते. सर्वस्तराचे लोक या पदार्थांवर तुटून पडताना दिसतात. गरीब-श्रीमंत, सर्व जाती-धर्माचे लोक यचे चाहते आहेत. लहान मुलांना कधी एकदा जतची यात्रा येते आणि चायनीज पदार्थांवर ताव मारू असं होतं. जतमध्ये सुरुवातीला रज्जाक नगारजी यांचा एकमेव गाडा होता. आता अनेक गाडे, स्टॉल लागलेले आपल्याला दिसतील. वडापावच्या गाड्यांबरोबर चायनीज पदार्थांचे गाडे, स्टॉल उभे आहेत.
मोठ्या कढईत वेगवेगळ्या भाज्यांचे बारीक तुकडे चर्रर्र आवाज करत व्हिनेगार, चिली सॉसमध्ये घोळवून राइस, नूडल्स तयार होताना पाहणं गमतीदार असतं. पदार्थ बनवणार्याच्या हाताची चलाखी आपल्याला मोहवून जाते. की डिश प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये गरमागरम समोर येते, तेव्हा त्याची चटकदार चव तोंडात पाणी आणतं. त्या चवीच्या लोभानं आपण चटकन चिकनचा तुकडा तोंडात टाकायला बघतो आणि जिभेला चटका देऊन बसतो. पण तरीही चयनीज पदार्थ चवीने खातो.
चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहेच. त्यापाठोपाठ चिनी पदार्थांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर आक्रमण केले आहे. म्हणूनच आसेतू हिमालय कुठेही जा तिथे चिनी खद्यखुणा आपल्याला पाहायला मिळतील.गाव तिथे एसटीच्या धर्तीवर गाव तिथे चयनीज गाडी इथवर चिनी खाण्याने आपल्या खाद्य प्रांतात घुसखोरी केली आहे. या चायनीज खाण्यात अजिनोमोटो नावाचा एक घटक चवीसाठी घातला जातो. हा घटक आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. त्याच्या अतिसेवनाने हाडं ठिसूळ बनतात.शरीरात अनावश्यक कॅलरी वाढतात. असं सांगितलं तरी आपल्याकडचे लोक चिनी पदार्थ खायचं सोडत नाही. अजिनोमोटोसारख्या ङ्गिजुल गोष्टीसाठी चिनी खाणं बंद करावं असं कुणाला वाटत नाही. कारण तेवढं वेडच चिनी खाण्याने आम्हा भारतीयांना लावली आहे.
चीन आपला कट्टर शत्रू आहे.त्यांच्या भारतीय प्रांतावरच्या अतिक्रमाणाच्या बातम्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला त्यांचा प्रचंड राग येतो. भारतापेक्षा सर्वच स्तरावर चीन बलाढ्य आहे, याची कल्पना आपल्याला आहे, पण बाजारात जातो तेव्हा सर्वात पहिली नजर आपली चिनी वस्तूंवर पडते. रस्त्याकडेलाच वस्तूंचा बाजार मांडलेला असतो. किंवा रस्त्यावरून जाताना चिनी पदार्थांचा चटकदार, घमघमीत वास नाकाला झोंबतो, तेव्हा तोंडाला नक्की पाणी सुटतं. अशावेळा चिनी लोकांबाबत संताप येत नाही. चिनी मोबाईलने तर तरुणांना वेडच लावलं आहे. स्वस्तात अनेक ङ्गंक्शन असलेले मोबाईल तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.
चायनीज पदार्थ ङ्गारसे नाहीत. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे आहेत. उच्चभ्रू हॉटेलमधल्या पदार्थांची चव एखाद्यावेळेस या मंडळींनी घेतली नसेल, पण चायनीजची चव न चाखलेला क्वचितच आढळेलं. चिकन चिली. हाका नुडल्स,चिकन मंचुरियन, व्हेज मंचुरियन, शेजवान सॉस, चिकन सूप ही नाव आता आपल्या तोंडात सहज रुळली आहेत. पण आज आपण चायनीजपदार्थ खातो, ते अस्सल चायनीज नाही, याची ङ्गारसी कुणाला कल्पना नाही. ते आहे फ्युजन झालेलं भारतीय चायनीज आहे. थोडक्यात काय तर चिनी आणि भारतीय खाद्यसंस्कृतीच्या मिलाङ्गातून तयार झालेलं नव्या पद्धतीचं खाणं. भारतीयांना तिखट,तेलकट, मसालेदार खाणं आवडतं. चायनीजवाले चिनी सॉसबरोबर भारतीय मसाले वापरतात. की चटकदार चव भारतीयांच्या खास पसंदीचे असते. खरे मूळ चिनी जेवणवेगळेच असते. ते ङ्गारच मिळमिळीत असतं. आणि या जेवणात वापरले जाणारे घटकदेखील वेगळेच असतात. जतमधल्या रामराव महाविद्यालयातले प्राध्यापक डॉ. श्रीकांत कोकरे सर आपला एक प्रबंध वाचन्यासाठी चीनला गेले होते. तिथे ते चार-पाच दिवस होते. त्यांना तिथलं खाणं अगदीच बेचव,वेगळंच आणि कसं तरी वाटल्याचं सांगितलं होतं. त्यांना इथे ये ईपर्यंत कधी एकदा आपल्या भारतीय पदार्थांवर ताव मारू असं झालं होतं. त्यामुळे चायनीज चाहत्यांनी एक लक्षात ठेवायला हवं की, आपल्याकडडे लोकप्रिय झालेले मंचुरियन किंवा चिली चिकन चिनी नव्हेत तर ते अस्सल भारतीय आहेत. भारतीय पदार्थांमधला चटकदारपणा अन्य कुठल्या देशात सापडणं अशक्यच आहे.
No comments:
Post a Comment