Wednesday, December 14, 2016

बँक कर्मचार्‍यांवर कारवाई व्हायला हवी


      नोटाबंदीमुळे जो काही चलनकल्लोळ सुरू आहेतत्यात सामान्य माणूस होरपळून गेला आहेपणबडे धेंडे मात्र बँक कर्मचारीअधिकारी यांच्या मेहरबानीने ऐशोआराम जीवन जगत आहेतबँकांनी अशा आपल्या मोठ्या खातेसादारांसाठी पायघड्या अंथरल्याचे दिसून आले आहेधनदांडग्यांना आणि काळापैसा बाळगणार्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बँकांनी मदत केली आहे.यात बँकांच्या कर्मचार्यांनी मोठा हात धुवून घेतला आहे आणि आपले घर भरून घेतले आहे.त्यामुळे काळा पैसा बाळगणार्यांना कसलीच चणचण भासली नाहीबँकवाले लोक अशा लोकांना मदत करणार हे गृहीत धरून अर्थमंत्रालयाने  देशातील सरकारी व खाजगी अशा 500 बँकांमध्ये अर्थमंत्रालयाकडून स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  बँकांमधील कर्मचारी आणि अधिकारी बड्या खातेदारांना मदत केली आहे,करत आहेत,याला कारणेही तशीच आहेतत्यांच्या लमसम व्यवहारांवर या बँकांचे ’ट्रॅन्झॅक्शन’ फुगत असतेत्या आधारावर या बँकांची पतही वाढत असतेदेशात अनेक खाजगी क्षेत्रातील बँका अशा आहेत की ते दिवसभरात कितीही पैसे खात्यात टाकले तरी खातेदारांना स्रोत विचारत नाहीयाच सुविधेमुळे खातेदारही त्या बँकेला पसंती देतातनोटाबंदीनंतर मात्र बँकांनी अशा ग्राहकांना बेमालूमपणे नोटा जमा करण्याची खास सोय करून दिली असल्याच्या तक्रारी होत्यानोटाबंदीनंतर देशभरातील 500 बँकांमध्ये स्टिंग ऑपरेशन सरकारने सुरू केले होतेत्यात ते स्पष्ट झाले आहेआता शासनाने देशातल्या सगळ्याच बँकांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासायला हव्यातकारण हा गोरखधंदा मोठा आहेगरीब प्रामाणिक माणूस दिवसदिवसभर उन्हातान्हात ताटकळत,बिनाअन्न-पाण्यावाचून दोन हजार रुपयासाठी उभा होतामात्र बडे धेंडे मात्र सहिसलामत बँक व्यवहार करून मोकळे होत होतेत्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बँक कर्मचारीअधिकार्यांवर कारवाई करणे गरजेचे आहेकाळा पैसा बाहेर काढण्याच्या सरकारच्या धोरणाला या मंडळींनी अडकाठी घातली आहेबाहेर आयकर विभागाला छाप्यात जो काही पैसा सापडत आहेत्यात नव्या करकरीत 2000 हजाराच्या नोटांचा समावेश आहेसामान्य लोकांना तासनतास रांगेत उभारून एकच दोन हजाराची नोट मिळत असताना अशा बड्या लोकांकडे मात्र लाखो-कोट्यवधीच्या नव्या नोटा सापडत आहेतत्यामुळे सामान्य माणूस चक्रावून गेला आहेकालपर्यंत अहोरात्र काम करणार्या बँक कर्मचार्यांचे कौतुक होत होतेआता त्याचे संतापात रुपांतर होत आहेअर्थात सगळ्याच बँक कर्मचार्यांनी किंवा सगळ्याच बँकांनी बड्या खातेदारांना साम्भाळले आहेअसे नाहीपण ज्या कोणी कर्मचार्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत्यांची हयगय करून चालणार नाहीत्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

No comments:

Post a Comment