नवं वर्ष, नवा उल्हास आणि नवा विचार घेऊन येत असतो. प्रत्येक माणूस विचार करत असतो की,जर वर्षाचा पहिला दिवस चांगला असेल ,उल्हासित,उत्साहित असेल तर तशाच प्रकारे संपूर्ण वर्ष जाईल. हा विचार चांगलाच आहे,कारण ज्यावेळेला आपण आपल्या मनाला एक शक्तीशाली संकल्प देतो. तेव्हा त्यानुसारच आपल्या सगळ्या शक्ती काम करायला लागतात.
प्रत्येक दिवस माना नवीन वर्ष
नव्या वर्षाचा पहिला दिवस कसल्याही परिस्थितीत चांगाल जावा, यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कित्येकदा भांडखोर व्यक्तीदेखील हा दिवस स्वत:ला विवादात न टाकण्याचा प्रयत्न करतो. पण दुसर्याच दिवशी सगळम काही सामान्य हो ऊन जातं. मग आपण फक्त नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचाच का विचार करावा? आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस हा नवा असतो. दररोज सूर्य आपल्या नव्या लालसर.सोनेरी छटांसह उगवत असतो.निसर्ग रोज आपल्याला नव-नवी सुंदरता प्रदान करत असतो. कारण आपण आनंदी राहावं, उल्हासित राहावं आणि जीवनाचा घेत राहावं. जर निसर्ग आणि त्याचे पाचही तत्त्व रोज आपल्याला नवं काही देण्याचा प्रयत्न करत असतील, तर मग आपण का नाही आनंद घ्यायचा? कारण फक्त हेच आहे की, आपण त्याचा सन्मान करत नाही. त्याचा स्वीकार करत नाही. आपण रोज आपल्या मनाला नव्या विचाराचा, नव्या उल्हासाचा गृहपाठ द्यायला हवा. त्यानुसार काम करत त्याला पुढे न्यायला हवं. आपण 24 तासाची दिनचर्या एका सिस्टीममध्ये बांधण्याचा आणि त्याला मूर्तरूप देण्याचा प्रयास करायला हवा. मग आपल्या लक्षात ये ईल की, हळूहळू आपल्या जुन्या सवयींमध्ये सुधारणा होत आहेत.हा प्रयत्न काही दिवस करीत राहिल्यास आपल्याला जाणवायला लागेल की,सगळं काही ठिक हो ऊ लागलं आहे.
समस्या खंबीर बनवतात
स्वामी विवेकानंद म्हणतात की, जर आपले जीवन सहज,सरळ चालले असेल, त्यात कुठल्याही प्रकारच्या समस्या येत नसतील तर लक्षात घ्यावं की आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत. कारण यशाचा रथ समस्या, अडचणींना चिरडल्याशिवाय एक पाऊलदेखील पुढे सरकू शकत नाही. सत्यता हीच की,कुठल्याही यशामागे समस्यांचं असणं अनिवार्य आहे. त्यामुळे समस्यांना कधी घाबरून जाऊ नये. उलट मनाला स्थीर ठेवून त्याचं समाधान पाहा. वास्तविक, समस्या आपल्याला खंबीर बनवण्यासाठी येत असतात. त्यावेळेला आपली सगळी कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये अधिक सक्रिय होतात.ज्याच्याने अनुभव आणि बुद्धीचा विकास होतो.
नकारात्मक विचाराला रामराम
ज्याप्रकारे शरीराला अन्नाची आवश्यकता असते, त्याचप्रकारे आत्मा निरोगी राहावा, यासाठी सकारात्मकऊर्जेची गरज असते. त्यामुळे नेहमी सकारत्मक गोष्टींचाच विचार करा. नकारात्मकतेला मनात अजिबात आणू देऊ नका. असं माना की, जे काही जीवनात घडत आहे, त्यामागे काही ना काही प्रयोजन ठरलं आहे, काही तरी चांगलं दडलं आहे. असं एकदा मन बनलं की,मग नकारात्मक विचार त्याकडे फिरकतसुद्धा नाहीत. जीवनात छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या भूमिका निभावत असतात.व्यावहारिक जीवनात आणि व्यक्तिगत जीवनातदेखील या गोष्ती महत्त्वाच्या आहेत. जे लोक या गोष्टींकडे लक्ष पुरवतात, त्यांच्यासाठी यशाची शक्यता अधिक असते. या सगळ्यांव्यतिरिक्त देवाविषयीचा दृढविश्वास दगडातदेखीव जीव ओतू शकतो. मनाची जर ही खात्री झाली की, माझ्या प्रत्येक कामात ईश्वरीय मदत मिळते आहे, तर त्याचा आत्मविश्वास इतरांपेक्षाही आणखी वाढतो. अशी माणसे कधीही निराश आणि हताश होत नाहीत. त्यांच्यांमध्ये नेहमी उल्हास आणि उत्साहाचा स्तर अन्य लोकांपेक्षा अधिक असतो.
No comments:
Post a Comment