Saturday, December 24, 2016

सेंकड हँड स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी...


      तुम्ही सेकंड हँड स्मार्टफोन विकत घ्यायचं प्लॅनिंग करत असाल तर  काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल
आजकाल काही लोक नवा स्मार्टफोन थोड्या दिवसांसाठी वापरून लगेच विकून टाकतात. तुम्ही कमी किंमतीत सेकंड हँड फोन विकत घेऊन वापरू शकता, पण यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे. फोन खरेदी करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्या.
बील आणि बॉक्स घ्या
     सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करतेवेळी बील घेणं यासाठी आवश्यक आहे की,यामुळे आपल्याला हा फोन चोरीचा तर  विकला जात नाही ना, हे आपल्याला कळेल.जर आपल्याला भविष्यात हा हँडसेट पुन्हा विकायचा असेल किंवा रिप्लेस करायचा असेल तर हे बील आपल्या कामी येईल.फोनसोबतच बॉक्स घेतल्याने तुम्ही आयएमईआय नंबरची खात्री करू शकाल.लक्षात ठेवा की, विकणारा तुम्हाला एक्सेसरीज देत नसेल तर तुम्ही किंमत आणखी कमी करू शकता.
चोरीचा फोन
     कित्येकदा लोक चोरीचा स्मार्टफोन विकतात. जर तुम्हाला अशा प्रकारचा संशय असेल तर बिलासोबत बॉक्सदेखील मागून घ्या. चोरीच्या स्मार्टफोनसोबत बॉक्स असण्याची शक्यता फारच कमी असते.बॉक्समध्ये लिहिलेला आयएमईआय नंबर आपल्या स्मार्टफोनच्यावर*#06# डायल करून दिसणार्या नंबरशी पडताळून पहा.हा नंबर जुळला माही तर काही तरी गडबड आहे, हे लक्षात येईल.सोबतच imeidetective.com सारख्या वेबसाइटसवर हा क्रमांक टाकून तपासा. कारण चोरीचा स्मार्टफोन ट्रेकिंगसाठी तर या वेबसाईटवर टाकला नाही ना,हेही लक्षात येईल.
2 जीबी रॅम
     10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनचे आता 2 जीबी रॅम सामान्य झाले आहेत.त्यामुळे सेकंडहँड स्मार्टफोनमध्ये कमीत कमी 2 जीबी रॅम असणं आवश्यक आहे. प्रोसेसरदेखील चेक करून पाहायला हवं. एक वर्ष जुने मिडियाटेक प्रोसेसर स्मार्टफोनचे परफॉर्मेंस चांगले राहत नाही.क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन चिपचे स्मार्टफोन चांगले असतात.
हार्डवेअरवर लक्ष द्या
     स्मार्टफोनची बॉडी लक्षपूर्वक तपासा.कुठे तो फुटला तर नाही ना, ते पहा.सोबत लॅपटॉप आणि यूएसबी केबल आवश्य घेऊन या. तो योग्यप्रकारे चार्ज होतो की नाही ते पहा. शिवाय फाईल्स योग्यप्रकारे ट्रान्सफर होतात की नाही ते चेक करा. त्यात सिमकार्ड टाकून नेटवर्क योग्यप्रकारे चालतो का पाहतानाच इंटरनेट सुरू करून अॅप्सदेखील रन करा.
वॉरंटी तपासा
     कित्येकदा लोक नवीन स्मार्टफोन घेतात आणि आपला जुना स्मार्टफोन विकतात. कित्येकदा लोक फोन खरेदी करताना स्मार्टफोनच्या वॉरंटी कालावधीकडे पाहत नाहीत.वॉरंटी कालावधी पाहण्याचे कारण म्हणजे यामुळे कदाचित हा तुमचा फायद्याचा व्यवहार ठरू शकतो. यामुळे कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास आपण त्याला ऑफिशियली सर्विस सेंटरकडे जाऊ शकतो



1 comment:

  1. उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद सरजी...

    ReplyDelete