शिक्षण पद्धती अधिक भक्कम करण्यासाठी मुळात शिक्षकांना असमाधानी, दडपणाखाली ठेवण्याचे प्रकार चुकीचे आहे. स्मार्ट शिक्षणासाठी शिक्षकांनाही काम करण्याची मोकळीक, स्थैर्य मिळायला हवे, "काळाबरोबर शैक्षणिक क्षेत्र, शैक्षणिक धोरणे, मुलांची गुणवत्ता बदलत आहे. यात टिकून शैक्षणिक क्षेत्राची बैठक भक्कम करण्याचे आव्हान आहे. सोशल मीडियाचा प्रसारही वेगाने होत आहे; मात्र या वेगवान मीडियाच्या फायद्यांबरोबरच काही दुष्परिणामही समोर येत आहे. नव्या शिक्षण धोरणाविषयीही चांगल्याबरोबरच वाईट मतप्रवाहही आहेत. पालकांचीही काय भूमिका असायला हवी हा घटक महत्त्वाचा आहे. या सगळ्यामध्ये नेमके काय व्हायला हवे, हे शिक्षकच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. शिक्षकांनी नेमके काय व्हायला हवे, सध्याच्या धोरणात शिक्षकालाच त्याच्या सेवेची, पदाची खात्री देता येत नाही. त्यांच्यावर इतर कामांचा बोजा वाढला आहे. त्यामुळे मुळात शिक्षकच समाधानी नसेल, तर तो चांगले शिक्षण कसे देणार ? यासाठी शिक्षकांना काम करण्याची मोकळी द्यायला हवी. अनावश्यक दबाव, गळचेपी थांबायला हवी आजच्या शिक्षण पद्धतीत आणि जुन्या शिक्षण पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना चॅलेजिंग शिक्षण देणे काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाने योग्य तो प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
काही वर्षांपूर्वी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षण पाठ शिकविले जात असत. त्याचा फायदा मुलांना रोजच्या जीवनात होत असे; मात्र सध्याच्या आधुनिक शिक्षणात हा महत्त्वाचा भाग मागे पडला असून, त्याची जागा इंटरनेट, सोशल मीडियाने घेतली आहे. हा उपक्रम पुन्हा सुरू व्हावा, त्या माध्यमातून मुलांचे पुस्तक वाचन सुधारण्यास मदत होणार आहे.
मुले इंटरनेट आणि सोशल मीडियावर जास्त वेळ राहत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; मात्र पूर्वीच्या काळीही गुन्हे होत होते. त्यामुळे नाहक आधुनिक शिक्षणाला दूषण न देता इंटरनेटचा वापर सकारात्मकदृष्ट्या कसा होईल आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होईल, याचा अभ्यास शिक्षकांनी करणे गरजेचे आहे.
सद्यःस्थितीत शिक्षकांना विद्यार्थी घडविण्याचे किंवा ज्ञानदानाचे काम सोडून शाळाबाह्य कामे मोठ्या प्रमाणात दिली जातात. परिणामी दिड ते दोन महिने शिक्षक शाळेबाहेर असतात. त्याचा संबंधित शिक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होता. त्यांच्या जीवनाचा कोणी विचार करत नाही. आधुनिक शिक्षण पद्धतीने सर्व काही नियम शिक्षकांवर लादण्यात आले आहेत; मात्र पालक आणि विद्यार्थ्यांना तसे कोणत्याही नियम ठेवण्यात आलेले नाहीत. परिणामी त्याचा फटका शिक्षकांना बसत असून, आपण कोठे तरी सुरक्षित नाही, अशी भावना शिक्षकांच्या मनात निर्माण होत आहे.

No comments:
Post a Comment