काला चणा संपूर्ण किंवा अंकुरित
दोन्हीही फायद्याची आहेत.कफ,डायबिटीज,ऍनिमिया,हृदय आदी आजारांसाठी काळा चणा लाभकारक
आहे.त्वचा उजळण्याचं आणि कोलोस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्याचं कामदेखील काळा चणा
करतं. काही संशोधनामध्ये असं सिद्ध झालं आहे की,काळ्या
चण्याच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.
काळ्या चण्यात आवश्यक विटामिन
आणि मिनरल्स असतात.यात जवळपास 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन असतात.यात मोठ्या प्रमाणात फायबर असते,ज्याची आपल्या शरीराला मोठी गरज असते.काळ्या चण्याच्या सेवनाने
शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.यासाठी ऍनिमीयाच्या रुग्णाने याचे
नियमित सेवन करणे आवश्यक आहे.
काळ्या चण्याचा सातू उन्हाळ्यात
खाल्ल्याने उन्हाळा बाधत नाही.उष्माघात होत नाही.ज्या पाण्यात चने भिजू घातले
जातात,ते पाणी सेवन केल्यानेदेखील फायदा
होतो.डायबिटीज रुग्णांनादेखील चण्याचे सेवन खूपच फायदेशीर आहे.
काळा चणा शरीरातील
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते,त्यामुळे
सर्दी-पडसेसारखे मोसमी आजार होत नाहीत.त्वचा उजळण्याचे व चेहरा तजेलदार बनवण्याचे
काम काळा चणा करतं.हृदय रोग्यांनी आपल्या जेवणात याचा उपयोग करायला हवा.
काळा चणा मिठात न घोळता चावून
चावून खाल्याणे स्किन हेल्दी आणि ग्लोइंग होण्यास मदत होते.खाज,रेशेज सारख्या स्किन समस्या दूर होतात.
चणे बॉडीमांस वाढवण्यासाठीदेखील
साहाय्यभूत ठरतात.नियमित याचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते आणि मांस पेशी
मजबूत होतात.काळ्या चण्यात फॉस्फरस असतो, जो
हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम राखण्यास मदत करतो.यामुळे किडनीतील अधिकचे मीठ बाहेर
पडते.काळा चना कोलोस्टोल कंट्रोल करतो.यामुळे हार्ट डिजिजचा धोका कमी होतो आणि
हृदय आरोग्यपूर्ण राहण्यास मदत होते.
No comments:
Post a Comment