
आपल्या केंद्र
सरकारमधील अनेक विभागात लाखो पदे रिक्त पडली आहेत. या रिक्त पदांमुळे देशात विस्कळीतपणा आला आहे.अव्यवस्था निर्माण झाली आहे. लोकांची वेळेत कामे होईनात.
अपघात होत आहेत.या विविध स्तरांवरील कामात सुसूत्रता
येण्यासाठी नोकरभरती आवश्यक आहे.अलिकडेच जे रेल्वे अपघात झाले,त्यानिमित्ताने रेल्वे विभागात लाखो पदाच्या जागा रिक्त पडल्या असल्याचे समोर
आले आहे. रेल्वेच्या धावपट्ट्या दुरुस्ती,देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे खात्याला एक प्रकारची अवकळा आली आहे. अशीच अवस्था आपल्या लष्कराची आहे. सैन्यदलात तब्बल
52 हजार पदे रिक्त आहेत. पोस्ट कार्यालयातही काही
हजार पदे रिक्त आहेत. एफसीआय आणि दूरसंचार विभागातही अशीच अवस्था
आहे.या जागा फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध विभागाता
आहे. राज्यांचा प्रश्नच वेगळा आहे. जर केंद्र सरकारने मनात आणले आणि
या जागांसाठी काश्मिरी युवकांना संधी देण्याला प्राधान्य दिले तर देश तोडण्याचा जो
प्रयत्न पाकिस्तान किंवा दहशतवादी करत आहेत, त्याला आपोआपच आळा
बसेल.
काश्मिरी तरुणांना
रोजगार उपलब्ध झाला तर ते जे पैशासाठी देशात किंवा काश्मिरमध्ये आपल्या कार्यकृत्याने
अशांतता निर्माण करत आहेत, आपल्याच देशाचे आर्थिक,सामाजिक,भावनिक नुकसान करत आहेत, ते आपोआप थांबेल. शिवाय नोकरभरती झाल्याने आपल्या देशातल्या विविध विभागात जी अव्यवस्था निर्माण
झाली आहे,तीही कमी होईल आणि लोकांना तत्पर आणि चांगल्या सुविधा
उपलब्ध होतील. नोकरभरती करताना काही मापदंड लावता येईल,
पण काश्मिरी तरुणांना रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे. काश्मिर अशांत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. काश्मिर आपल्या देशाचे नाक आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेला
प्रदेश आहे. तिथे पर्यटकांना सुरक्षा मिळाल्यास पर्यटन वाढणार
आहे, शिवाय तिथल्या तरुणांना रोजगारही मिळणार आहे.काश्मिरी तरुणांच्या हाताला काम दिल्यावर त्यांच्या हातात दगड कसे येतील? प्रत्येकाला आपल्या पोटाची आग शमवायची
आहे. ती आग चांगल्या कामातून, चित्त शांत
ठेवून शमत असेल तर हे तरुण वाईट मार्गाला का लागतील?
No comments:
Post a Comment