कुक्कुटपालन व्यवसाय
किफायतशीर आहे.अंडी,मांस उत्पादन घेण्यासाठी उत्तम प्रतीचे पक्षी,त्यांच्या
प्रकार आणि वयानुसार आवश्यक संतुलित खाद्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे
आहे. पक्षांचे आरोग्य रक्षण आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
महत्त्वाच्या आहेत. साफसफाई, लसीकरण,जैविक सुरक्षा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पक्ष्यांना
त्यांच्या प्रकाराप्रमाणे , वयाप्रमाणे, उत्पादनक्षमतेप्रमाणे वेळोवेळी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे,त्या त्या गोष्टी
वेळच्यावेळी करायला हव्यात. महत्त्वाचे म्हणजे योग्य व्यवस्थापनाने
या गोष्टी करता येतात आणि त्यांचे आरोग्य सांभाळता येते. त्यांचे
आरोग्य चांगले राहिल्यास त्यांच्याकडून उच्चतम उत्पादन मिळते. फक्त रोगामुळे अकाली मृत्यू मात्र कुक्कुटपालकांना न परवडणारी गोष्ट आहे.
ज्या परिसरात पोल्ट्री
शेड आहे,त्या पाच मीटरपर्यंतचा परिसर मोकळा
आणि स्वच्छ हवा. शेडच्या बाजूने पावसाळ्यात पाणी साचून राहणार
नाही,याची दक्षता घ्यायला हवी.पोल्ट्री
शेडच्या छपरास छिद्रे असल्यास ती मुजवून घ्यायला हवीत,म्हणजे
पावसाचे पाणी आत येणार नाही.त्याचबरोबर खाद्याची भांडी कोरडी
राहतील,यादृष्टीने लक्ष द्यायला हवे. पावसाळ्यात
शेडमधील गादी (लिटर) दमट वातावरणामुळे ओलसर
होऊन कडक होते. त्यासाठी नवीन गादी थर द्यावा.(उदा.लाकडी भुसा).लाइम पावडरचा वैगेरे
वापर केल्यास लिटर कोरडे राहण्यास मदत होते,मात्र लिटरचा थर ओलसर
राहिला तर शेडमध्ये दमट वातावरण तयार होऊन कोंबड्यांना कॉक्सिडिओसिस, जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आठवड्यातून
एकदा लिटर हलवून घ्यायला हवे.
आरोग्य व्यवस्थापन
कोंबड्यांचे आरोग्य
उत्तम राहण्यासाठी आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे बुरशीजन्य
रोगास कोंबड्या बळी पडतात.पिले तर लवकरच त्याच्या कह्यात जातात.
हवा,पाणी आणि खाद्याच्या माध्यमातून बुरशी पक्ष्यांच्या
शरीरात प्रवेश करते. त्यामुळे पक्ष्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागतो.हे टाळण्यासाठी महत्त्वाचे
म्हणजे स्वच्छता. शेडच्या आसपास डास,माश्यांचा
प्रादुर्भाव होणार नाही,याची काळजी घ्यायला हवी. शिवाय खाद्यदेखील कोरडे असायला हवे.शेडमध्ये पुरेशी जागा
असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हवा खेळती राहते.
आहार व्यवस्थापन
कोंबड्यांना दिले
जाणारे खाद्य कोरडे असायला हवे. पावसाळ्यात आर्द्रता वाढते,त्यामुळे साठवून ठेवलेल्या
खाद्यावर अफ्लाटॉक्सिन बुरशी वाढते. ओलसर किंवा भिजलेले खाद्य
असेल तर त्यावर बुरशी लगेच वाढते.हे खाद्य कोंबड्यांना दिल्यास
त्यांना अफ्लाटॉक्सिस बुरशीची आणि माईकोटॉक्सिसची विषबाधा होते.याचा परिणाम अंडी उत्पादन कमी होण्यावर होतो.मांसल पक्ष्यांची
वाढ थांबते. तसेच लिव्हर ट्यूमरसारखे आजार होऊन कोंबड्या मरतात.
खाद्य गोणी जमिनीपासून
काही अंतरावर उंचीवर ठेवावेत.त्यासाठी खास सोय केल्यास उत्तमच! साधारण एक फुट उंचीवर
ती ठेवावीत. त्यासाठी लाकडी फ्लॅटफॉर्मवर तयार करावेत.
साठवलेली जागा ओली होणार नाही,याची काळजी घ्यायला
हवी. समजा दमट वातावरणामुळे खाद्य ओलसर झाल्यास ते बुरशी लागण्याअगोदरच
उन्हात सुकवून घ्यायला हवे.ओल्या बॅगेचा वैगेरे वापर साठवणुकीसाठी
करायला नको. महत्त्वाचे म्हणजे
खाद्यात योग्य प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट मिसळलेले असले पाहिजे. त्याचा परिणाम खाद्याची
टिकवण क्षमता वाढण्यास मदत होते.पावसाळ्यात अधिक प्रमाणात खाद्याचे
साठवण करू नका. खाद्यात गाठी झाल्यास ते कोंबड्यांना देणे हितकारक
नाही.
पाणी व्यवस्थापन
प्राणी असो किंवा
पक्षी त्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हायला हवा.त्यामुळे याकडे गांभिर्याने लक्ष द्यायला हवे.दूषित पाणी पिल्याने कोंबड्यांना कॉलरा,जुलाबसारखे आजार
होतात.पावसाळ्यात पाणी निर्जंतूक करून त्याचा वापर करा.
यासाठी तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घ्यायला हवा.
No comments:
Post a Comment