Sunday, September 24, 2017

नवरात्रात उपवास करा,पण आरोग्याची काळजीही घ्या

    नवरात्रात कुणी उपवास धरला असेल त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.नऊ दिवसाच्या व्रत काळात बेफिकिरपणा आपले आरोग्य बिघडवू शकतो.काही नियम आणि न्यूट्रीशियन्स डाइटसोबत नऊ दिवसाचा उपवास करणे म्हणजे शरीराचे डीटॉक्सिफिकेशन.पूर्णपणे शरीराची स्वच्छता.  बहुतांश आजार हे अनावश्यक आणि अनहेल्दी अन्न खाल्याने होतात. उपवासादरम्यान तेल-मसाले आणि अनहेल्दी अन्न खाण्यापासून दूर राहण्याबरोबरच फळे आणि काही भाज्यांचे सेवन आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांमध्ये विविध प्रकारचे विटामिन,मिनरल्स, फायटोन्यूट्रीएंटस आणि फायबर असतात. परंतु,काहीजण बाहेरचे किंवा घरी बनवलेले नवरात्र स्पेशल पदार्थांचे सेवन करतात.हे पदार्थ हाय कॅलरीचे असतात. यात बटाटा चिप्स,साबुदाणा पकोडे किंवा वडे,तळललेले साबुदाणे अशा पदार्थांचा समावेश असतो. असे पदार्थ सलग नऊ दिवस खाल्ल्याने कॅलरी वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे कॅलरी वाढणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.

     काही लोक वेट लॉसचा उद्देश ठेवून नवरात्र व्रत करतात. नऊ दिवस उपवास केल्याने वजन कमी होते,मात्र ते कायम ठेवण्यात असमर्थ ठरतात. वास्तविक या दरम्यान शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते,पण फॅटवर अधिक परिणाम होत नाही. उपवास सुटल्यावर म्हणजे नऊ दिवसांनंतर पुन्हा पहिल्यासारखे खाने सुरू होते,त्यामुळे पुन्हा वजन वाढायला लागते. व्रत केल्यानंतरही नियमित डाइट ठेवताना तेल-मसाले पदार्थ टाळायला हवेत. शिवाय एक्सरसाइज करून कमी झालेले वजन कायम ठेवता येते.
     नवरात्र डाइटमध्ये समावेश असलेल्या पदार्थांमधले सगळे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक ठरत नाहीत.वास्तविक फास्ट फूडवाले बहुतांश फूड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा अधिक आणि प्रोटीनची मात्रा कमी असते.त्यामुळे न्यूट्रीशनिस्ट उपवासादरम्यान प्रोटीन डाइटवर फोकस करण्याचा सल्ला देतात.त्याचबरोबर कमी फॅट असलेले पदार्थ जसे की दूध,दही,नट्स आणि कडधान्ये खाण्यावर भर द्यायला सांगतात.कंडेंस्ड दूध किंवा जास्त फॅटचे दूध ज्यात सॅचुरेटेड फॅट आणि कॅलरीची मात्रा अधिक असते, अशा पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला देतात.
     जर तुम्हा तुमची त्वचा उजळवायची असेल आणि शरीराच्या टॉक्सिन्सपासून सुटका करून घ्यायची असेल तर अधिक प्रमाणात हलक्या पदार्थांचे सेवन करायला हवे.हे इलेक्ट्रोलाइटचे असंतुलन बरे करण्याबरोबरच त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करतात.थोड्या थोड्या वेळाने हलके खाल्याने मेटाबॉलिज्मदेखील वाढते. दूध आणि दुधाच्या पदार्थांपासून कॅल्शियमची मात्रा मिळते आणि प्रोबायोटिकचे स्त्रोत दहीने पचनतंत्र सुधारते.
     उपवासदरम्यान बरेच लोक काही काही तास काहीच खात-पित नाहीत. अशी परिस्थिती डायबिटीज लोकांसाठी लो शुगर किंवा हायपोग्लाइसिमीयाचे कारण बनू शकते. याशिवाय उपवासदरम्यान काही लोक आपली नियमित औषधे घेण्याचे टाळतात.त्यामुळे ब्लड प्रेशर,थायएआइड,ब्लड शुगर इत्यादी संबंधित समस्या वाढतात.त्यामुळे आपली नियमित औषधे घेतली जायला हवीत व थोड्या थोड्या अंतराने काही ना काही खायला हवे.काहीजण व्रत काळात मीठाचे सेवन टाळतात.यामुळे बीपी सामान्यापासून खाली येण्याची शक्यता असते. अशा काळात सैंधव मीठाचा वापर करावा. अर्थात सैंधव मिठाची अधिक मात्रा शरीरासाठी हानिकारक असते. क्रॉनिक किडनीच्या रुग्णांनी आणि सीरम पोटॅशियमच्या लोकांनी याचे अधिक सेवन करू नये.
आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा
डायबिटीज,ब्लड प्रेशर,ॅनिमिक किंवा प्रेग्नेंट महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्रत करावे. उअपवासादरम्यान पाण्याची कमतरता भासवू देऊ नये. पाण्याच्या कमतरतेमुळे कॅल्शियम किंवा यासारखे पोषक तत्त्व जमा होतात. मूत्रपिंडामध्ये खड्याची समस्या होऊ शकते. लिंबूपाणी, अननसाचा रस, नारळाचे पाणी,विटामिन ए युक्त फळे आदींचे सेवन करायला हवे. हृदय,किडनी,फुफ्फुससंबंधित आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा. यादरम्यान अधिक आंबट फळांचे सेवन करू नये कारण यामुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. सैधव मीठ आणि साखरेची मात्रा मर्यादित ठेवा. शिवाय तळलेल्या पदार्थांपासून लांब राहा. शरीराची ऊर्जा कायम ठेवण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने काही ना काही खात राहा.
व्रत केल्याने फायदे अनेक
कधी कधी उपाशी राहणे किंवा उपवास करणे आपल्या शरीराला फायद्याचे असते. यादरम्यान अन्न न खाल्याने आपल्या पचन इंद्रियांना आराम, विश्रांती मिळते. त्याचबरोबर आपल्या शरीरात ऊर्जा साठवलेली असते,ती नियमित भोजनाने वापरली जात नाही. अशा वेळेला आपले शरीर फॅट सेल्सकरवी ती ऊर्जा घ्यायला सुरुवात करते. त्याचबरोबर आपल्या लिव्हरमध्ये साठलेले हिमोग्लोबीनदेखील या दरम्यान उपयोगात आणले जाते.उपवासादरम्यान संतुलित अन्न खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.व्रत काळात नियमानुसार खाल्याने कफ,गॅस,अपचन,डोकेदुखी इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर एकाग्रता आणि फिटनेस स्तरदेखील वाढते.

No comments:

Post a Comment