लहान वयाची मुलं नेहमी
पोटदुखीची तक्रार करत असतात.ती हलक्यावरी घेऊ नका.कदाचित त्यांच्या पोटातील
जंत त्यांना त्रास देत असतील.मुलांच्या पोटात तीन प्रकारचे जंत आढळून
येतात.एक-हुक कृमी .दुसरा-विप कृमी आणि तिसरा राऊंड कृमी.या कृमी मुलांच्या
आरोग्याला नुकसानकारक आहेत.
असेही दुष्परिणाम
पोटात जंत असल्याने मुलांमध्ये
रक्ताची कमतरता,कुपोषण आणि मानसिक आजार
बळावतात.आतड्यांमध्ये असलेले हे जंत पोषण तत्त्व खावून टाकतात.त्यामु़ळे मुलांना
जेवण केल्याचा काहीच फायदा होत नाही.शरीर तंदुरुस्त न राहिल्याने मुलांच्या मानसिक
विकासावरही त्याचा परिणाम होतो.मुलांची मानसिक एकाग्रतासुद्धा राहत नाही.याचा
त्याच्या शिक्षणावरदेखील वाईट परिणाम होतो.
या गोष्टी स्वीकारा
स्वच्छतेच्याबाबतीत सतर्क
राहायला हवे.घरात कीटकनाशकांचा वापर ठराविक अंतराने पण नियमितपणे करायला
हवा.जेवायला बसण्यापूर्वी स्वतः मुलांसमोर साबणाने स्वच्छ हात धुवून
घ्यावेत.मुलांकडूनही समक्ष स्वचा हात धुवून घ्यावेत.जेवणापूर्वी, शौचास जाऊन आल्यावर,खेळून आल्यावर
मुलांना हात स्वच्छ धुवून घेण्याची सवय लावावी.मुलांना स्वच्छ ठिकाणी बसवावे किंवा
झोपी घालावे.मोठ्या मुलांना बाहेर जाताना चप्पल किंवा बूट घालून जाण्याची सवय
लावावी.हुक कृमी नावाचा जंत पायाच्या त्वचेतून शरीरात प्रवेश करतो.
उपचार
पोटात जंत झाल्याने डॉक्टर 1-2वर्षांच्या मुलांना एलबेनडीजोल 400 मिलीग्राम
अर्धी टॅब्लेट गोळी पाण्यात मिसळून देतात.2पेक्षा अधिक
वर्षांच्या मुलांना हीच गोळी पूर्ण स्वरूपात चोखून खायला किंवा चावून खायला देतात.
No comments:
Post a Comment