Tuesday, September 12, 2017

निसर्गाच्या सानिध्यात जा,तणावमुक्त व्हा

     तुम्ही कधी फॉरेस्ट बेदिंगबाबत ऐकलं आहे का? फॉरेस्ट बेदिंगचा अर्थ जंगलात स्नान करणे, असा अजिबात होत नाही. फॉरेस्ट बेदिंग हा जपानी शब्द शिनरिन-योकूपासून आला आहे. याचा तात्पर्य असा की, जंगलाच्या वातावरणात प्रवेश करणे. फॉरेस्ट बेदिंगमध्ये मुख्यत्त्वे करून जंगलातील झाडे-रोपे आणि तिथल्या नैसर्गिक वातावरणात अधिकाधिक काळ व्यथित करायचा असतो. असे केल्याने आरोग्यावर कित्येक प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. यासाठी निश्चित असा काळ नाही. जेव्हा कधी तुमच्या मनात येईल, तेव्हा तुम्ही नैसर्गिक वातावरणात जाऊ शकता. जंगलात, झाडांच्या सानिध्यात दोन-तीन तास घालवल्याने तुमच्या मनाला शांतता आणि आरामपणा वाटेल.फॉरेस्ट बेदिंग मानसिक तणाव आणि समस्या दूर करण्याचा सोपा उपाय आहे.असं सांगतात की, या पद्धतीची सुरुवात जपानमध्ये 1980 दरम्यान झाली. यासाठी तुम्हाला जंगलातच जावे लागेल, असे काही नाही. घराजवळ असलेल्या बागेत किंवा जिथे कुठे उंच उंच झाडे आहेत,हिरवळ आहे,तिथे एक-दोन तास घालवा.स्वत:मध्ये तुम्हाला बदल नक्कीच जाणवेल.एका हॉरेस्ट बेदिंग एक्सपर्टनुसार 30 वर्षाच्या आत योगासारखेच ही पद्धतीदेखील स्वीकारली जाऊ लागेल.
     तणाव होतो दूर-फॉरेस्ट बेदिंगवर जपानमध्ये काही संशोधन झाले आहेत. जपानस्थित चिबा युनिवर्सिटीतील संशोधकांनी 300 युवकांवर एक अभ्यास केला. त्यांना पहिल्यांदा शहरात फिरायला आणि एक दिवस जंगलात हिरवळीच्या सानिध्यात घालवायला सांगण्यात आलं. परिणाम चकीत करणारे होते. शहरात आपल्या घराच्या आजूबाजूला आणि रस्त्यावर चालण्याच्या तुलनेत फॉरेस्ट बेदिंगचा त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. त्यांचा स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल,पल्स रेट,रक्तदाब आणि तणाव कमी झाल्याचं दिसून आलं. असाच निष्कर्ष कियोटो युनिवर्सिटीद्वारा केलेल्या संशोधनात आढळून आला आहे.शहरी परिसरात फिरणे किंवा फेरफटका मारणे यापेक्षा झाडांच्या सानिध्यात वेळ घालवल्याने तणाव बराच कमी झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
     आजार होतो दूर- जे लोक फॉरेस्ट बेदिंगसाठी बाहेर पडतात,ते कित्येक प्रकारच्या जीवघेण्या जसे कॅन्सरसारख्या रोगांपासून स्वत:ला वाचवू शकतात. जितका तुम्ही झाडांच्या आजूबाजूला किंवा नैसर्गिक वातावरणात वेळ घालवाल,तितका तुमचा इम्यून सिस्टम अधिक बूस्ट होईल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने शरीराबरोबरच मेंदूलादेखील फायदा मिळतो. अमेरिकेतल्या एका संशोधनानुसार नेचर वॉक आपल्या डोक्यातले विचार कमी करतं. एका युरोपीयन स्टडीनुसार झाडांच्या सानिध्यात राहिल्याने पुरुषांच्या मृत्यू दरात 16 टक्क्यांनी घट होऊ शकते.शिवाय निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तणावापासून मुक्तताही मिळते.फोकस आणि क्रिेटिविटी बूस्ट होते आणि पहिल्यापेक्षा अधिक आनंदी असल्याचे जाणवते.
     कसे कराल?- जिथे कुठे खूप हिरवीगार झाडं आहेत,तिथे जा. कमीत कमी दोन तास तिथे फेरफटका मारा. घाईगडबडीत नाही तर निवांतपणे फिरत आजूबाजूचे वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करा.उंच-उंच झाडे, आजूबाजूचा निसर्ग पाहण्याचा आनंद लुटा. दीर्घ श्वास घ्या. फिरताना मधी- मधी बसत चला. झाडांना-पानांना आपल्या हातांनी स्पर्श करा. लवकरच तुम्हाला जाणवायला लागेल की, तुमचे निसर्गावर प्रेम जडले आहे आहे.
     यातले तज्ज्ञ सांगतात की, दिवस-रात्र आपण टेक्नोलॉजी जसे की, मोबाईल, टीव्ही,गॅझेट्स,कॉम्प्युटर, काँक्रिटचे जंगल,प्रदूषण यांनी पूर्ण घेरलेलो असतो. या वस्तूंमध्ये जीव नसतो. ज्यावेळेल्या यांच्यापासून निघून निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारचा वेगळा असा उत्साह जाणवतो. त्यामुळे फॉरेस्ट बेदिंगचा स्वीकार करणं कोणालाही एक अमृतसमान आहे. जर तुम्ही एक किंवा दोन दिवस झाडांच्या-निसर्गाच्या सानिध्यात राहिलात तर तणावाबरोबरच शरीरातील आजारदेखील बाहेर येतील. मेंदू ताजा टवटवीत राहील. यामुळे शरीर आपले रिचार्ज होईल.जीवनसंबंधातल्या समस्या समजून घ्यायला सोपे जाईल. मेंदू सक्रिय राहील. तो चांगल्याप्रकारे काम करायला लागेल. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याने इलेक्टॉनिक वस्तूंच्या वायब्रेशनपासून आपली सुटका होते.निसर्गाच्या वायब्रेशनमुळे शारीरिक आणि मानसिकरित्या आपण ताजेतवाणा होऊ

No comments:

Post a Comment