Tuesday, September 26, 2017

हृदयाच्या तंदुरुस्तीचा फॉर्म्युला मित्रांनाही सांगा

     29 सप्टेंबरला आहे वर्ल्ड हार्ट डे. याखेपेला याची थीम आहे, शेयर द पावर. म्हणजे आपण जो फॉर्म्युला हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी अंगिकरला आहे, तो फॉर्म्युला दुसर्यांसोबत शेयर करणे. यामुळे हृदय आजाराने पिडित आहेत,त्यांना त्याचा लाभ होईल आणि त्यांचेही आरोग्य चांगले राहिल.त्यामुळे या वर्षभरात आपण आपल्या हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी जो फॉर्म्युला वापरला आहे तो शेयर करायला हवा. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अंग आहे, ते म्हणजे आपल्या छातीत धडधडणारं हृदय.यात थोडी जरा गडबड झाली तर हृदयासंबंधीचे अनेक आजार जन्माला येतात. आजकाल ज्या प्रकारे लोकांची लाइफस्टाइल बदलली आहे,त्यात हार्ट डिजीजने होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.एका संशोधनानुसार जगभरात हार्ट अटॅकने मरणार्यांची संख्या ही अन्य आजाराने मरणार्यांच्या तुलनेत अधिक आहे. हृदयासंबंधी मोठ्या प्रमाणात संशोधन, अभ्यास केला जात आहे,त्याकडे जातीने लक्ष देऊन आपल्या हृदयाचे आरोग्य कसे चांगले राहिल, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

     हृदय रोग व्हायला सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे, धुम्रपान. आज युवकांमध्ये हार्ट डिजीज व्हायला मुख्य कारण धुम्रपान आहे. मग त्यानंतर डायबिटीज, हायपरटेंशन, सिडेंट्री लाइफस्टाइल, लठ्ठपणा, डाइट, फॅमिली हिस्ट्री इत्यादी कारणांमुळे  हृदय रोग वाढतो. पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत हार्ट डिजीज होण्याची शक्यता अधिक असते. महिलांमध्ये मेनोपॉज झाल्याने मग याचा धोका वाढतो. विदेशातल्या तुलनेत भारतात दहा वर्षे अलिकडेच  लोकांना हृदय रोगाच्या समस्या पाहायला मिळत आहेत. याचे कारण म्हणजे डाइटमध्ये एंटी-ऑक्सिडेंटसची मोठ्या प्रमाणात कमतरता. जर विदेशात लोकांना 55 ते 65 वय वर्षाच्या दरम्यान हार्ट दिजीज होत असेल तर भारतात ते 45 ते 55 दरम्यानच्या वयात होते. महिलांनी  डायबिटीज आणि हायपरटेंशनसाठी रुटीन चेकअप करायला हवे. आपल्या भोजनात फॅटी फूड आणि हाय कॅलरीयुक्त आहाराचा समावेश केला जाऊ नये. यामुळे लठ्ठपणा वाढतो. ॅक्टीव्ह राहा. आठवड्यातून पाच दिवस जवळपास 40 मिनिटे चालत राहा. एक्सरसाइज करा. यामुळे हृदय रोगापासून तुम्ही लांब राहाल.
      तुम्ही नेहमी तणाव,चिंता, बैचेनी या समस्यांनी घेरलेले असाल तर सांभाळून राहा.जितक्या लवकर स्वत:ला या मानसिक समस्येतून बाहेर काढाल, तितके तुमच्या फायद्याचे आहे. कारण एका संशोधनानुसार तणावामुळे आपले हृदय वेगाने धडधडते. त्यामुळे हृदयसंबंधी रोग होण्याची शक्यता वाढते.नियमित स्वरुपात असणारा तणाव महिलांच्या हृदयावर प्रतिकूल परिणाम करतो.सक्रिय जीवनशैली,पौष्टीक अन्नाचे सेवन आणि धुम्रपानापासून दूर राहून तणाव कमी करून हृदयाचे आरोग्य व्यवस्थितरित्या ठेवू शकतो.
     जर तुम्हाला आपले हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल तर नियमितपणे पालकाचे सेवन करा. असे अमेरिकेच्या कोलोराडो स्टेट युनिवर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनात सांगण्यात आले आहे. मेटाबॉलिक सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी जर नियमितपणे पालक खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. संशोधनामध्ये 45 ते 65 वय वर्षे असलेल्या 50 जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. यात काहीजण मेटाबॉलिक सिंड्रोमग्रस्त होते. अभ्यासानुसार या रुग्णांचा रक्तदाब आणि हृदय यात बरीच सुधारणा झाली असल्याचे आढलून आले.
      जर तुम्ही रोज तीन-चार कप कॉफी पित असाल तर तुम्ही खरेच समजूतदार आहात असे म्हणावे ललगेल. पोर्तुगिजमधील एका विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार रोज तीन-चार कप कॉफी प्यायल्याने हृदयरोग(सीवीडी)ने मरण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो. याच्या सेवनाने टाइप-2 डायबिटीजचा धोकादेखील जवळजवळ 25 टक्क्यांपर्यंत कमी होतो.डायबिटीज रुग्णांमध्ये हृदयरोगाने होणार्प्या मृत्यूची शक्यता  असते. हार्वर्ड युनिवर्सिटीच्या तज्ज्ञांनुसार कॉफी कार्डियोवॅस्कुलर रोगांपासूनही बचाव करते. मात्र अधिक प्रमाणात कॉफीचे सेवन नुकसानकारक आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
     पांढर्या केसांकडे लक्ष ठेवा- आज अगदी कमी वयातही केस पांढरे होऊ लागले आहेत. याची अनेक कारणे असू शकतात मात्र इटलीच्या काहिरा युनिवर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार तरुणपणात केस पांढरे होत असतील तर ते हृदयासंबंधी रोगांकडेदेखील इशारा करतात. एथेरोस्केलेरोसिसची निर्मिती धमन्यांमधल्या सामग्रीमुळे होते आणि केस पांढरे होणे या दोन्हीत काही प्रमाणात समानता आहे. बिघडलेला डीएनए, ऑक्सीडेटीव तणाव, सूज,हार्मोनमध्ये बदल इत्यादी या दोन्हींची कारणे आहेत

No comments:

Post a Comment