प्रवास काहींच्यासाठी
आराम मिळवण्याचा एक मार्ग असू शकतो. नवीन ठिकाणी जाण्यामागचा हेतूदेखील काहींचा स्पष्ट असतो.
कारण त्यामुळे शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या आराम मिळावा. काही लोकांना प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जाण्यापेक्षा लहान पण दंगा-गोंगाट यांच्यापासून लांब असलेली ठिकाणं आवडत असतात. म्हणजे प्रमुख टुरिस्ट ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मागच्या-पुढच्या ठिकाणी राहण्यामागचा उद्देश म्हणजे अशा ठिकाणी शांतता, आराम मिळून जातो. सृष्टीसौदर्य जवळून न्याहळता येतं.
लोक आणि तेथील संस्कृती पाहता येते. अशी भरपूर
ठिकाणं आहेत. परदेशात असा अनुभव शोधणार्यांना स्वित्झर्लंडमधील ज्युरिख शहर फार आवडतं.
लेक ज्युरिख
किनारी वसलेलं हे शहर फारच सुंदर आहे. बर्फांनी आच्छादलेले पहाड
पाहाताना चित्रपटातले सौंदर्यदृश्य आठवल्याशिवाय राहणार नाही. या ज्युरिख शहरात जवळपास 50 पेक्षा अधिक म्युझियम आहेत
आणि 100 पेक्षा जास्त आर्ट गॅलरिज आहेत.यामुळे हे शहर आपल्या कला आणि संस्कृतीची जपणूक करणारं आहे,याची साक्ष देतं. शिवाय या शहरात आपल्याला जुन्या आणि
नव्या गोष्टींचा संगम अनुभवयाला मिळतो.ज्युरिखचं नाईटलाईफ फारच
रोमांचित करतं.या शहरातील मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे नदी आणि
सरोवरांच्या काठी असलेली स्नानगृहं. पहाडावर असलेला रेल्वे टनल्सदेखील
काहींच्या आवडीचा आहे. आपण नेहमी पाहत असतो की, पहाडांवर जाण्यासाठी रस्ता बनवताना पहाडी इलाक्याचा किनारी भाग कापला जातो.
मात्र इथे असे काही करण्यात आलेले नाही. इथे पहाडाच्या
आतून बोगदे तयार करण्यात आले आहेत.या शिवाय इथल्या रेल्वेंना
काचेसारख्या मोठमोठ्या खिडक्या लावलेल्या असतात.यामुळे आपल्याला
पहाडाचे सौंदर्य मनसोक्त पाहता येते. हा अनुभव मनाला अगदी स्पर्शून
जातो.ज्युरिखमधले रहिवाशीदेखील या शहराला खास बनवण्यात महत्त्वाची
भूमिका निभावताना दिसतात. इथले लोक चैतन्यशील आहेत.पाहुणचार करण्यात कुठलीच कसर बाकी ठेवत नाहीत. भारतानंतर
अतिथी देवो भव चा अनुभव फक्त इथे गेल्यावर मिळतो, असे म्हणायला हरकत नाही.(अभिनेता हेमंत चौधरी याच्या हिंदी मुलाखतीवर आधारित)
No comments:
Post a Comment