Tuesday, September 12, 2017

मक्याचे दहा फायदे

     पावसाळ्यात मक्याचे कणीस आगीच्या आरावर भाजून खाणे,याची मजा काही औरच असते. काही घरांमध्ये कणीस मीठाच्या पाण्यात शिजवून खातात. याची चवदेखील झकास असते. मात्र मक्याचे कणीस  भाजून खावा किंवा शिजवून. आपल्या आरोग्यासाठी एक नंबर आहे.याचे फायदे अनेक आहेत. एका वेबसाइटवर यासंबंधीची माहिती वाचायला मिळाली.त्यातले महत्त्वाचे,प्रमुख फायदे आपण पाहणार आहोत.
1.मका म्हणजे कॅलरीचे मोठे भांडार आहे. डायटिंग करणार्यांना याचे सेवन लाभकारक आहे.यात आढळून येणार्या झिंक,फॉस्फरस, आयर्न इत्यादी आरोग्यासाठी फायद्याचे आहेत.आयरन,कॉपर,फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असल्याकारणाने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
2. मक्यामध्ये फायबरची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. फायबर आपली पचनक्रिया मजबूत करते आणि पोटाच्या तक्रारी जशा की, अपचन, कफ,गॅस दूर होण्यास मदत होते.

3.मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असते, जे कॅन्सरसंबंधी रॅडिकल्सशी लढते.यात फेरुलिक आम्लदेखील असते,ज्यामुळे स्तनाच्या कॅन्सरपासून बचाव होतो.
4. मक्याच्या तेलात कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रित करण्यासंबंधी एंटीएथरोजेनिक लक्षणे मिळून येतात.हे हृदयाचा आजाराचा धोका कमी करण्याचे काम करते.
5. यात असलेल्या थायमिन मेंदूसंबंधी आजार अल्जाइमरपासून वाचवतो. यात विटामिन ए,बी आणि सी आढळून येतात.याच्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.यात असलेले आयर्न शरीरातील नव्या रक्ताच्या कोशिका बनवण्यामध्ये प्रभावी खनिज पदार्थासारखे काम करते.यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.
6.हा थायमिनचा मुख्य स्त्रोत आहे.याच्या कमतरतेमुळे मेंदूत होणार्या क्रिया बाधित होतात. ज्यात अल्जाइमरसोबतच कित्येक अन्य  आजार होऊ शकतात.मक्यातील विटामिन सी,कॅरोटिनॉईड आणि बायोफ्लेविनॉइड शरीरातील बल्ड सर्क्युलेशन चांगले करते,ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवन्यात मदत मिळते.
7. यात कॅरोटेनॉएडस नावाचे तत्त्व असते. जे रेटिनावर लाभदायक प्रभाव टाकतात. यामुळे डोळ्यांच्या प्रकाशामध्ये सुधारणा होते.विटामिन ए दृष्टीदोषापासून वाचवते.
8. यात फेनोलिक फायटीकेमिकल्सची मात्रा मिळून आली आहे. यामुळे मधूमेह नियंत्रित करण्यास मदत मिळते. मधूमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मक्याचे कणीस खाणे आवश्यक आहे.
9.फोलिक अॅसीडचे भांडार असल्या कारणाने गर्भवती महिलांसाठी मका फायद्याचा आहे.याच्या कमतरतेमुळे मूल कुपोषित आणि कमकुवत बनू शकते.
10. मक्याचे गरम तेल केसांना लावल्याने केस मऊ-मुलायम बनतात.यात ओमेगा 3 आंइ ओमेगा 6 फॅटी आम्ल आढळून येते.शरीरावर सूज आली असेल तर ते नियंत्रित करण्याचं काम करतं.



No comments:

Post a Comment