Saturday, September 30, 2017

खेळा,मजा करा आणि फिट रहा

'तैने चारों खाने चित कर देगी,तेरे पुरजे फिट कर देगी। ऐसी धाकड है,धाकड है... ऐसी धाकड है।'
बरोबर ओळ्खलत तुम्ही.प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अमिरखानच्या दंगल चित्रपटातले गाणे आठवले ना! हा चित्रपट भिवानी जिल्ह्यातल्या बलाली गावच्या,हरियाणाच्या पराक्रमी मुलींच्या जीवनावर बेतलेला आहे. खर्या आयुष्यातही गीता फोगाट आणि बबीता फोगाट धाकडच आहेत. धाकड होण्यासाठी चांगले आरोग्य असावे आवश्यक आहे. गीता फोगाट हरियाणा पोलिसमध्ये डीएसपी आहे. बबीता फोगाट हरियाणा पोलिस खात्यात सब इन्स्पेक्टर आहे. गीता आणि बबीता सामान्य कुटुंबातल्या सामान्य मुली होत्या,पण त्यांच्या असामान्य जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्या आज सामान्यच्या खास बनल्या आहेत.

गीता आणि बबीता फोगाट
गीता आणि बबीता यांनी लहानपणापासूनच एकत्र कुस्तीचा सराव केला. त्यांचे वडील महावीरसिंह हेच त्यांचे पहिले गुरू. ते त्यांच्या काळातले प्रसिद्ध पैलवान होते.28 वर्षांची गीता आणि 26 वर्षांची बबीता दोघा बहिणींच्या आवडी-निवडीदेखील एकसमान आहेत.कुस्तीत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत.गीताने 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावून ऑलिम्फिक क्वालिफाय करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.बबीताने 2014 मध्ये ग्लासगोच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तिला पदकांचा वर्षाव होत राहिला. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
गीता आणि बबीता दोघी बहिणींना जंक फूड खाऊन कित्येक वर्षे लोटली आहेत. त्या मोड आलेली धान्ये, फळे,भाज्या,सोयाबीन,दही,चिकन आदी खातात. फारच इच्छा झाली तर आलू-पराठा खातात. गीताला नटायला,सजायला आवडतं. गेल्याच वर्षी तिचा विवाह पैलवान पवन सरोहाशी झाला आहे.
बबीताला सामान्यांसारखे राहायला आवडते.त्यांना भारतीय पोशाख आवडतो.तिला स्वयंपाक करायला आवडतं. गीता आणि बबीता लहानपणी भल्या पहाटे पैलवानकीचा सराव केला नसता तर त्यांना हे दिवस पाहायला मिळाले नसते.त्या स्वत:चं आणि देशाचं नाव कमवू शकल्या नसत्या. त्यांना आपल्या आजीचं फार अप्रूप वाटतं. शाकाहारी भोजन, दूध,दही,तूप आणि पौष्टीक अन्न खाणारी आणि खूप कष्ट करणारी त्यांच्या आजी 92 व्या वर्षीदेखील चष्मा वापरत नाहीत. त्यांचे दातही बळकट आहेत.दात पडले नाहीत.त्या चहा पित नाहीत. त्या आठ तासांची पूर्ण झोप घेतात.वय झालं असूनही त्या अद्याप स्वत:ची कामं स्वत: करतात.त्या कुणावरही अवलंबून राहात नाहीत.डाळ-भाजी उकडून टोमॅटो-कांदा घालून बनवलेला पदार्थ खातात. दूध पितात आणि रोटी,भात व सलाद खातात.
गीता आणि बबीताला कसल्याच गोष्टीची भिती वाटत नाही. मग ती आग असो, पाणी असो अथवा उंच भाग असो कारण त्या त्या शारीरिकदृष्ट्या अगदी मजबूत आहेत. त्या अज्नूनही पूर्ण जोशाने सराव करतात. कारण देशासाठी आणखी पदकांची लूट करायची आहे.
टेरेंस लुईस

डान्स गुरु आणि कोरियोग्राफर टेरेंस लुईसला पाहिल्यावर अंदाज बांधणं अवघड जातं की ते 42 वर्षांचे आहेत. डान्सच्या नियमित सरावामुळे मस्त आणि फिट आहेत. आजच्या काळात जो फिट तो हिट समजायचं. डान्स इंडिया डान्स ची 1,2 आणि 3 सत्रे तसेच नच बलिए मध्ये ते जज बनले होते. आता ते स्वत:ची डान्स कंपनी चालवतात. महत्त्वाची गोष्ट ते डान्स शिकवतात पण त्यांनी अगोदर डान्सचे प्रशिक्षण घेतले नव्हते.पुढे 26 वर्षाचे झाल्यावर त्यांनी अमेरिकेतून प्रशिक्षण घेतले. भारताकडून स्कॉलरशीप मिळाल्यावर त्यांनी प्रशिक्षण घेतले. ते स्वत: फिट आहेत, त्यामुळेच त्यांनी खतरों के खिलाडी या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होतात्यांना साहस खूप भावतं.
ख्रिश्चन कुटुंबातील टेरेंस लुईस प्रत्येक गोष्टीचा अर्थ स्पष्ट करतात, त्यांना जे सांगायचे आहे, ते का सांगायचे आहे, हे त्यांच्या डोक्यात असते.त्यांनी मायक्रो बायलॉजीचे शिक्षण घेतले आहे.त्यांना डॉक्टर बनायचे होते. त्यांचं म्हणणं असं की, रात्री आठनंतर कुठलेही फळ खाल्ले जाऊ नये. रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट अजिबात नसायला हवं. नाश्त्याला किंवा दुपारच्या भोजनात भरपूर कार्बोहायड्रेट असले तरी चालू शकते.प्रोटीन, भाज्या आणि खूपच कमी मात्रेत फॅट घ्या. रात्रीचे भोजन रात्रीच्या दहापर्यंत कसल्याही परिस्थितीत घ्या, असा त्यांचा सल्ला आहे.
सकाळी कोमट पानी लिंबूसोबत घ्यायला हवं.मग 20 ते 25 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करा. सकाळी रिकाम्या पोटी फिरणे आणि व्यायाम यासाठी फायद्याचं आहे, कारण आपल्या शरीरातील प्रोटीन,विटामीन इत्यादी आपल्या शरीरात जमा होतात. सकाळी व्यायामाच्यावेळी शरीरात जो फॅट जमा झाला आहे, तो वापरला जातो. दिवसा व्यायाम करतो, तेव्हा आपण आपल्या रक्तात जमा झालेला ग्लुकोज वापरतो. त्वचेवर साचलेला फॅट वापरलाच जात नाही,त्यामुळे या वेळी केला गेलेल्या व्यायामाचा परिणाम दिसत नाही.नंतर मग नाश्ता करायला हवा. फिट राहायला जितका व्यायामावर लक्ष केंद्रित करतो, तितकेच लक्ष खाण्यावर असायला हवे.
पाणी खूप प्यायला हवे. आणखी एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, ते म्हणजे व्यायाम करण्यासाठी फ्लोरिंग चांगली असायला हवे. नाही तर गुडघे आणि पाठीला नुकसान पोहचण्याची शक्यता असते.फिट् राहण्यासाठी मनाची तयारी करायला हवी.पण मोठमोठी स्वप्ने पाहू नका. आता एका महिन्यात सडपातळ होईन, असे म्हणायला जाऊ नका.लक्षात ठेवा, जादू वगैरे असे काही नसते.हळूहळू सगळ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो. तुमचे वजन वीस किलो अधिक आहे, तर वीस किलो कमी करण्याचा विचार करून काही होणार नसतं.एका महिन्यात एक किंवा अर्धा किलो वजन कमी करण्याचे टारगेट ठेवायला हवे.
जंकफूड तर अजिबात खाऊ नये. फिजी ड्रिंक,ज्यूस,चिप्स आदी गोष्टी पाहिल्यावर स्वत:वर  ना बोलण्याची सवय घालून घ्यायला हवी.जंकफूड खाण्याची इच्छा झाली तर स्वत:लाच ना बोलण्याची सवय लावा, आरोग्य खूप चांगले राहील.प्रिजर्व केलेले पदार्थ घेऊ नका, जसं की,जॅम,मामलेट, सॉस इत्यादी. मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करायला हवे.मिठाईपासूनही दूर रहा.सोया मिल्क,ब्राउन राइस, अंडे, ब्राउन ब्रेड खाऊ शकता.घरी असे पदार्थच आणायला हवेत, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. घरात आवश्यकतेपेक्षा अधिक पदार्थ नसतील तर खाल्लेही जाणार नाहीत.
जर तुम्हाला चांगला डान्सर बनायचे असेल तर रोज तीन तास डान्सचा सराव करायला हवा. एखाद्या अनुभवी गुरुच्या देखरेखीखाली डान्स शिकायला हवे. कुठल्या हिरोला वगैरे पाहून सिक्स पॅक बनवण्याची सगळ्यानाच गरज नाही. तो त्यांचा पोटा-पाण्याचा प्रश्न आहे.त्यांचा व्यवसाय आहे.त्यामुळे त्यांना सिक्स पॅकची गरज आहे.
बजरंग पूनिया

हरियाणातील खुदान (झज्जर)चा राहणारा 23 वर्षांचा बजरंग याने आशियाई रेस्लिंग चॅम्पियनमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.नंतर अर्जून पुरस्कारासह अनेक पदके पटकावली आहेत. ज्यावेळेला तो सात वर्षाचा होता,त्यावेळेपासून त्याने कुस्तीचा सराव सुरू केला होता. आता तो हरियाणा पोलिसमध्ये डीएसपी आहे. आता तो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी सराव करतो आहे.तो इतके मन लावून सराव करतो की, त्याला कधी कधी कळतच नाही की, कधी सण-उत्सव आला आणि गेला.सरावादरम्यान त्याला कशाचीच सुद राहत नाही.
बजरंग पूनिया फास्टच्या विरोधात आहे. त्याचं म्हणणं असं की, दूध-दही, भाजीपाला,चिकन,सुखा मेवा इत्यादी खायला हवे.प्रत्येक मुलाने रोज अडीच ते तीन तास बाहेर जाऊन आवश्य  खेळले पाहिजे.झोप पूर्ण घ्यायला हवी. मोठ्यांची गोष्ट ऐकली पाहिजे.सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेतली पाहिजे.त्यामुले व्यायामालादेखील वेळ मिळतो.नियमित व्यायाम केल्याने आणि खेळल्याने वेग वाढतो. शक्ती येते आणि स्टॅमिना वाढतो. त्यामुळे मेंदूही व्यवस्थित काम करतो.जगाला हरवायचे असेल तर कुस्ती खेळताना डोके वेगाने चालले पाहिजे,तरच समोरचा चीत होतो.
उन्मुक्त चंद

मूळचा पिथोरागढचा असलेला 24 वर्षाचा प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद अंडर 19 विश्वचषक विजेता आहे.दिल्ली रणजी चषक संघात कर्णधार राहिलेला उन्मुक्त दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजचा विद्यार्थी होता. चार वर्षाचा असल्यापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो मुख्यत्वे करून फलंदाज आहे.त्याने विश्वचषक जिंकून स्वत:ला सिद्ध केले.
उन्मुक्त चंदचे म्हणणे असे की, फिट राहण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाच्या शरीराची क्षमता,ठेवण वेगवेगळी असते,त्यानुसार त्याने व्यायाम करायला हवा. क्रिकेटपटूला योग करण्याची आवश्यकता नाही. आपल्या इच्छेनुसार त्याने व्यायाम प्रकार करावा. काही का व्यायाम करा,पण फिट राहा, असा सल्ला तो देतो.
क्रिकेटमध्ये कित्येक तास फिल्डमध्ये खेळावे लागते. त्यामुळे पौष्टीक भोजनाची आवश्यकता असते. फिल्डमध्ये खेळताना द्रव पदार्थ अधिक मात्रेत घ्यायला हवेत. जंकफूडपासून दूर राहायला हवे.संपूर्ण दिवस फिल्डमध्ये फक्त उभे राहूनही चालत नाही. आपल्याला माहित पाहिजे की, आपण काय करतो आहोत? चांगला सराव कमी वेळेतदेखील होऊ शकतो.यासाठी एका चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता आहे.
प्रत्येकाला आठ तासाची झोप आवश्यक आहे.झोप पूर्ण झाल्याने रिकवरी होते. दुसर्यादिवशी चांगल्याप्रकारे खेळू शकता.क्रिकेटपटू बनायचे असेल तर किमान नऊ-दहा वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली पाहिजे. क्रिकेटपटू बनायचे असेल तर त्याच्याबरोबर दुसरा खेळदेखील खेळता आला पाहिजे. त्यामुले कौशल्य वाढते. खेळ कोणताही असो, काम कुठलेही करायचे असेल, स्वत:ला फिट ठेवणे सगळ्यांसाठी आवश्यकच आहे. मग उशीर कशाला आजपासूनच तयारीला लागा. खेळा,मजा करा आणि फिट राहा.

No comments:

Post a Comment