Saturday, September 23, 2017

कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी ...

     मोठमोठ्या कंपन्या आपल्या एंप्लॉइजला प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी अप्रेजल आणि बोनस देत असते. परंतु, खरच! एंप्लॉइजला चांगले प्रदर्शन करण्याच्या दिशेने प्रोत्साहित करण्यासाठी केवळ पैसाच कामी येतो का?अन्य कशाची गरज नाही का? असं नाही आहे, कारण असं असतं तर कमी बजेटच्या छोट्या कंपन्यांचे एंप्लॉइ कधीच मेहनत घेऊन केले नसते.अर्थात पैसा कर्माचार्यांसाठी महत्त्वाचा नाही असे नाही.पण दर महिन्याला त्यांच्या हातात मोटीवेट करण्यासाठी धनादेश दिला जाऊ शकत नाही.त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम करतं ते त्यांचं केलं जाणार कौतुक! त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक झाले तर एंप्लॉइ आणखी वेगाने चांगले काम करू शकतो. लोक कौतुकाचे भुकेले असतात,पैशाचे नाही.

एंप्लॉइजचे कौतुक करा
एकादी व्यक्ती आपल्या कामात निराश होते,त्याला अनेक कारणे आहेत. त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या कामाला ओळख न मिळणे. पूर्ण मन लावून काम करूनही त्याच्या कामाचे कौतुक झाले नाही तर तो निराश होतो. कौतुकाच्या दोन शब्दांची त्याला गरज असते. त्यामुळे मालकांनी आपल्या एंप्लॉइज मंडळींना अशा महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर ठेवू नये. त्यांच्या कामाचे अगदी मोकळेपणाने कौतुक करा.
जबाबदारी सोपवा
कर्मचारी अशा कामांवर अगदी जीव तोडून मेहनत घेतात,जे त्यांच्यावर सोपवलेले असते. त्यांना वाटत असते की, या आपल्यावर सोपवलेल्या कामाचे यश अथवा अपयश याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवा.जर तुम्ही जबाबदारीच सोपवली नाही तर तुम्हाला कसे कळणार की, कोणत्या कर्मचार्यामध्ये कोणती खुबी आहे.
निर्णय प्रक्रियेत घ्या
जर माणसाला फक्त आदेशच मिळत राहिले तर तो कंटाळतो, तो स्वत: ला बंदीवान समजायला लागतात,हा माणसाचा स्वभाव गुणधर्म आहे.असे एंप्लॉइ काहीही नवीन करण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीतून कंपनीला वाचवण्यासाठी आपल्या एंप्लॉइज मंडळींना कोणत्या ना कोणत्या स्तरावरच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या. त्यामुळे त्यांना आनंद वाटेल. आणि मोठ्या उत्साहाने काम करतील.
थोडी सवलत द्या
कडक नियम आणि कायद्यामुळे हुकूमशक्ती चालू शकते,मात्र वर्कस्पेसची क्रिेटीविटी अशा वातावरणात प्रभावीत होते. एंप्लॉइजना कंपनीमध्ये काही गोष्टीत सवलत द्यायला हवी. यात वर्क फ्रॉम होम, त्यांना सवलत देणारी शिफ्ट, आवडीचा वीकली ऑफ आदींचा समावेश आहे.
याशिवाय एंप्लॉइज मंडळींना प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही त्यांच्या उर्वरित कुटुंबांच्या सदस्यांसमवेत एकाद्या पार्टीचे आयोजन करू शकता. आणि त्याठिकाणी चांगले काम करणार्या एंप्लॉइजला गिफ्ट देऊ शकता. आपल्या लोकांसमोर मिळालेला पुरस्कार त्यांना स्फुर्ती देऊन जातो. घरच्या लोकांसमोरही त्यांची इमेज सुधारण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment